शेअर बाजार विश्लेषण: बाजारात रॅली! आंतरराष्ट्रीय बाजार कोमात भारतीय शेअर बाजार जोमात सेन्सेक्स २०४.३३ अंशाने वाढत ७६८१०.९० पातळीवर बंद

मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये, रिअल्टीत वाढ कायम तर एफएमसीजी बँक समभागात घसरण

    13-Jun-2024
Total Views | 20

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ कायम राहिली आहे. सेन्सेक्स व निफ्टीमध्ये सकाळप्रमाणेच अखेरच्या सत्रात वाढ कायम राहिली आहे. भारतातील किरकोळ महागाई दरातील आकडेवारी जाहीर झाल्यानंतर तसेच युएसमधील फेडरल रिझर्व्हची माहिती आल्यानंतर बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. बाजारातील उत्साह कायम राहत आज सेन्सेक्स व निफ्टीत वाढ झाली आहे. सेन्सेक्स २०४.३३ अंशाने वाढत ७६८१०.९० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ७५.९५ अंशाने वाढत २३३९८.९० पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७९ व ०.८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईतील मिडकॅप व स्मॉल कॅपमध्ये व‌‌‌ अनुक्रमे ०.७९ व ०.७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात सकाळच्या वाढीनंतर अखेरच्या सत्रात घसरण झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ५८.७३ अंशाने घसरत ५६७४९.३७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्दे शांक देखील सकाळच्या सत्रात वाढलेला असताना अखेरच्या सत्रात ४८.४० अंशाने घसरत ४९८४६.७० पातळीवर पोहोचला आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Sectoral Indices) मध्ये संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. निफ्टी बँक (०.७०%), एफएमसीजी (०.६६%), मिडिया (१.०९%), पीएसयु बँक (०.०७%), प्रायव्हेट बँक (०.१९%) समभागात घसरण झाली आहे तर सर्वाधिक वाढ रिअल्टी (२.२४%), हेल्थकेअर (०.६९%), आयटी (१.०३%), फार्मा (०.५०%), ऑटो (०.७०%) समभागात झाली आहे.
 
बीएसईत आज एकूण ३९८४ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २३५१ समभाग वधारले असून १५३४ समभागात घसरण झाली आहे. २९५ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक वाढ झाली आहे तर १६ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. ३७३ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १६८ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
एनएसईत आज एकूण २७७० समभागाचे ट्रेडिंग झाले असताना १६८४ समभाग वधारले असून १००४ समभागात घसरण झाली आहे. १९० समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ९ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठव ड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. आज १६० समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ३३ समभाग लोअर सर्कि टवर राहिले आहेत.
 
आज बीएसईत एम अँड एम, टायटन कंपनी, लार्सन, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, विप्रो, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले,टीसीएस, इन्फोसिस, कोटक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, एचसीएलटेक, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, एशियन पेंटस, रिलायन्स या समभागात वाढ झाली आहे तर एचयुएल, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, पॉवर ग्रीड, एनटीपीसी, आ यटीसी, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, मारूती सुझुकी, जेएसडब्लू स्टील या समभागात घसरण झाली आहे. बीएसईतील कंपन्यां चे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४३१.७१ लाख कोटी रुपये ठरले आहे.
 
आज एनएसईत श्रीराम फायनान्स, एचडीएफसी लाईफ, डिवीज, एम अँड एम, टायटन कंपनी, लार्सन, इंडसइंड बँक, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, हिंदाल्को, बीपीसीएल, अदानी पोर्टस, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल, नेस्ले, इन्फोसिस, हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी बँक, एचसीएलटेक, ओएनजीसी, ग्रासीम, सनफार्मा, सिप्ला, बजाज ऑटो, अदा नी एंटरप्राईज, जेएसडब्लू स्टील, एशियन पेंटस, रिलायन्स या समभागात वाढ झाली आहे तर एचयुएल, ब्रिटानिया, एक्सिस बँक, पॉवर ग्रीड, आयशर मोटर्स, आयसीआयसीआय बँक, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, भारती एअरटेल, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, कोल इंडिया, सिप्ला, टाटा मोटर्स, ओएनजीसी, ग्रासीम, जेएसडब्लू स्टील, मारूती सुझुकी या समभागात घसरण झाली आहे.ए नएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल ४२८.१४ लाख कोटी रुपये राहिले आहे.
 
आज डॉलरच्या तुलनेत रुपया जैसै थे राहिले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सकाळी झाली असताना संध्याकाळी रु पया ८३.५० प्रति डॉलरवर स्थिरावला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या दरात सकाळी वाढ झाली होती. विशेषतः युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या चर्चेला युएस फेडने केलेल्या विधानामुळे पूर्णविराम मिळाला होता. यावर्षी चार वर्षां च्या ऐवजी एकदाच व्याजदर कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने अमेरिकन बाजारातील डॉलर व यील्ड मध्ये वाढ झाल्याने सोन्याच्या दरात परिणाम झाला. त्यामुळे कालपर्यंत स्वतः झालेल्या सोन्या किंमती वाढल्या आहेत.
 
संध्याकाळपर्यंत युएस गोल्ड स्पॉट दरात ०.२७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.८९ टक्क्यांनी घसरण झाली होती. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात सोन्याच्या निर्देशांकात ०.५६ टक्क्यांनी घसरण होत सोने ७१५७०.०० पातळीवर पोहोचले आहे. भारतातील २२ व २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम कोणताही बदल संध्या काळपर्यंत झालेला नसून भाव जैसे थे राहिले आहेत. २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ६६१५० पातळीवर व २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅ म दर ७२१६० पातळीवर राहिले आहेत.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या (Crude) तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात डिसेंबर पर्यंत कपात न करण्याच्या निर्णयामुळे तेलाच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या साठ्यात पुरेशी भर पडली असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तेलाच्या निर्देशांकात वाढ होतानाच मागणीतही वाढ होत असल्याने बाजारात कच्च्या तेलाचे भाव वधारले आहे.
 
संध्याकाळपर्यंत WTI Future क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.८८ टक्क्यांनी घसरण झाली आहे तर Brent क्रूड तेलाच्या निर्देशांका त ०.७९ टक्क्यांनी घसरण झाली आहे. भारतातील एमसीएक्स कच्च्या तेलाच्या निर्देशांकात ०.९८ टक्क्यांनी घसरण होत तेलाची किंमत ६४९७.०० रुपये प्रति बॅरेलवर पोहोचली आहे.
 
आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र वातावरणात भारतात मात्र रॅली झाली आहे. मुख्यतः भारतातील १२ महिन्याच्या कालावधीत किरकोळ महागाईत सर्वाधिक घट झाली असल्याने बाजारातील अपेक्षित प्रतिसाद गुंतवणूकदारांनी दिला. दुसरीकडे युएस फेड रल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता असली तरी महागाईचे दर नियंत्रणात आल्याने अमेरिकेत बाजारात व डॉलरच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यामुळे आशियाई बाजारातही भारताच्या अर्थव्यवस्थेतील कामगिरीमुळे रॅली शक्य झाली आहे.
 
भारतातील महागाई दर आटोक्यात आल्याने भारतातही आरबीआयकडून व्याज दरात कपात होईल का या शक्यतेने बाजारात पातळी संतुलित राहिली होती. दुसरीकडे बँक निर्देशांकात अखेरच्या क्षणी घसरण झाली असली तरी मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये झालेल्या वाढीचा आधार लार्ज कॅप समभागात मिळाला आहे. काल परदेशी गुंतवणूकदारांनी २३४ कोटींची बाजारात गुंतवणूक केली आहे. दुसरीकडे अमेरिकन बाजारातील रेट कटचा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याने युरोपातील बाजारात गुरुवारी घसरण झाली आहे. बँकेच्या समभागात लोकांनी नफा बुकिंग केल्याची शक्यता असल्याने बँक निर्देशांकात घट दिसली आहे. ‌
 
आज बीएसईतील कंपन्यांनी बाजार भांडवलाचा नवीन विक्रम नोंदविला आहे. प्रथमच बीएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल ४३१ लाख कोटीहून अधिक पोहोचले आहे. रिअल्टी समभागात वाढ झाल्याने बाजारात रॅली शक्य झाली होती. दोन दिवसांच्या प्राईज करेक्शननंतर बाजारात पुन्हा रॅली झाल्याने आगामी काळातील बाजारातील हालचाल पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' २०२४-२५ हंगामासाठी साखरेच्या किमान विक्री किंमतीत (MSP) संभाव्य वाढीच्या अहवालानंतर आज साखर कंपनीचा साठा १५% पर्यंत वाढला. केंद्र सरकार १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या या हालचालीवर विचार करत आहे. नफा मिळवणाऱ्यां पैकी बलरामपूर चिनी (३.९२% वर), दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज (७.२८%), मगध शुगर अँड एनर्जी (८.०८%%) यांचा समावेश आहे.राणा शुगर्स (८.३७%) आणि मवाना शुगर्स (१३.७८%). सध्याचा एमएसपी (MSP) ३१ रुपये प्रति किलोग्राम आहे आणि २०१९ पासून तो कायम आहे.
 
Larsen & Toubro (L&T) ने दमण अपसाइड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट-वेलहेड प्लॅटफॉर्म्स अँड पाइपलाइन्स (DUDP-WP) साठी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) कडून महत्त्वपूर्ण ऑफशोर करार मिळवला आहे. L&T ने आज ही घोषणा केली. L&T Energy ला देण्यात आलेल्या या करारामध्ये अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम, स्थापना आणि चार वेलहेड प्लॅटफॉर्म, १४० किमी पाईपलाईन आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ असलेल्या तापी दमण ब्लॉकमध्ये संबंधित टॉपसाइड सुधारणांचा समावेश आहे.'
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, ' देशांतर्गत इक्विटी बेंचमार्कने माफक नफा मिळवून व्यापार केला, देशांतर्गत CPI डेटा दर्शवितो की महागाई कमी होण्याच्या मार्गावर आहे.यूएस CPI मध्येही असाच ट्रेंड नोंदवला गेला आहे, ज्याने बाजाराची अपेक्षा CY24 मधील २ दर कपातीवरून १ पर्यंत खाली आणली, ज्याचा जागतिक बाजारांवर संमिश्र परिणाम होत आहे. देशांतर्गत व्यापक बाजारपेठेत, परवडणाऱ्या घरांच्या विभागाला पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारी पुढाकारांमुळे रिअल्टी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रांनी आघाडी घेतली.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना व्यक्त होताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले, ' बाजार आणखी एका दिवसासाठी श्रेणीबद्ध राहिले, सध्याच्या ट्रेंडच्या अनुषंगाने किरकोळ उच्च पातळीवर बंद झाले. सुरुवातीच्या गॅप-अपनंतर, निफ्टी एका अरुंद बँडमध्ये चढउतार झाला, शेवटी २३३९९.९५ वर स्थिरावला. क्षेत्रानुसार, संमिश्र कल कायम राहिला, रिअल्टी आणि आयटी क्षेत्रे आघाडीवर आहेत तर एफएमसीजी आणि ऊर्जा क्षेत्रे मागे आहेत. विस्तृत निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली, प्रत्येक अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढला.आम्ही निफ्टी निर्देशांकात वेळोवेळी सुधारणा पाहत आहोत, सध्याचा कल कायम राहील असे संकेत देत आहेत. विशेषत: शेतीशी संबंधित, साखर, रसायने आणि लाँग पोझिशन्ससाठी निवडक संरक्षण साठा यासारख्या थीममध्ये, स्टॉक-विशिष्ट व्यापारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही आमच्या शिफारसीचा पुनरुच्चार करतो.'
 
सोन्याच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले,'७१४०० च्या जवळ ५०० रुपयेपेक्षा जास्त खाली असलेल्या गॅप डाउन ओपनिंगसह सोन्याचा व्यवहार कमकुवत झाला कारण २२०४ मध्ये एका दरात कपात करण्याचे संकेत दिल्यानंतरही फेडचे धोरण अधिक चकचकीत बाजूने होते जे सप्टेंबरच्या आसपास असू शक ते कारण CPI महागाई गेल्या काही निकालांमध्ये घसरत आहे. २०२५ मध्ये १०० bps ची कपात होण्याची अधिक शक्यता दिसली त्यामुळे २०२५ हे वर्ष व्याजदर कपातीचे वर्ष म्हणून पाहिले जाईल त्यामुळे जवळचा टर्म आउटलूक अस्पष्ट राहिला आहे ज्याला सोने चांगले घेतले गेले नाही. सोन्याचा कल अल्पावधीत ७००००-७२५०० दरम्यान अस्थिर आहे. एकूण ६८००० हा अपट्रेंड चालू ठेवण्यासाठी मुख्य आधार आहे.'
 
अग्रलेख
जरुर वाचा
जेएनयूत निनादला परिवर्तनाचा शंखनाद; विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अभाविपने रचला इतिहास

जेएनयूत निनादला परिवर्तनाचा शंखनाद; विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अभाविपने रचला इतिहास

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत केंद्रीय पॅनेलच्या सहसचिव पदावर प्रचंड विजय मिळवला. अभाविपचे उमेदवार वैभव मीणा यांनी सहसचिव पदावर विजय मिळवत डाव्या संघटनांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. त्याचबरोबर १६ शाळा आणि विविध संयुक्त केंद्रांमध्ये एकूण ४२ पैकी २४ समुपदेशक पदांवर विजय मिळवून अभाविपने 'लाल किल्ल्यावर' भगवा फडकवला आणि अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या तथाकथित डाव्या विचारसरणीचा पाडाव केल्याचे दिसून आले. ABVP in JNU Election Result..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121