आता लघू मध्यम उद्योजकांना ४५ मिनिटांत कर्ज

एसबीआयची नवी योजना

    11-Jun-2024
Total Views | 153

SBI
 
 
मुंबई: गेल्या १० वर्षात मोदी सरकारने लघू , सूक्ष्म, मध्यम उद्योग (MSME) यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. या उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यापासून विविध आर्थिक सहाय्य सरकारने विविध योजनांतर्गत केले होते. आता एसबीआय (State Bank of India) ने पुढाकार घेतला असून छोट्या व मध्यम उद्योगांना कर्ज पुरवठा तत्काळ करण्याचे ठरवले आहे.
 
एमएसएमई उद्योगांना तत्काळ कर्जपुरवठा करण्यासाठी केवळ ४५ मिनिटांत कर्ज देण्याची योजना बँकेने आखली आहे. छोट्या उद्योजकांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी एसबीआयने आपल्या भागीदारांमार्फत क्यू आर कोड (QR Code) मार्फत ही योजना अंमलात आणली जाऊ शकते असे सांगितले जात आहे.
 
आजच एसबीआयने कर्ज वितरणासाठी संचालक मंडळामार्फत ४ अब्ज डॉलर्सचा निधी उभारण्यासाठी निर्णय घेतला होता.मु ख्यतः हा निर्णय कर्ज पुरवठा वाढीसाठी करण्यात आला होता. एसबीआयचा कर्जाच्या वाढत्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आ ल्याचे बँकेने म्हटले होते. आता एसबीआयने एमएसएमई व्यवसायांसाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करण्याची योजना आखली आहे.
 
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये बँकेच्या एसएमई (SME) कर्ज वाटप २० टक्क्यांनी वाढ होत ४.३३ लाख कोटींवर पोहोचले होते.आ र्थिक वर्ष २०२०-२१ तुलनेत ९.४३ टक्यांच्या तुलनेत यावर्षी ३.७५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. या नव्या कर्ज उत्पादनाचे ब्रँडिग 'A Significant Leap Forward' असे करण्यात आले आहे. याविषयी बोलताना बँकेचे चेअरमन दिनेश खरा म्हणाले,'एमएसएमई इकोसिस्टीम मध्ये यशस्वी फूटप्रिंट बनवत आम्हाला कर्जवाटप प्रकिया सुलभ व सुरळीत करायची आहे जेणेकरून आमची बँक एसएमई क्षेत्रातील कर्ज पुरवठा करणारी अग्रेसर बँक ठरेल.'
 
आरटीआर, जीएसटी रिटर्न, बँक स्टेटमेंट अशा कागदपत्रांची पूर्तता झाल्यास हे कर्ज सहज उपलब्ध होऊ शकते. याविषयी बँक क्रेडिट असेसमेंट करून १० सेकंदाच्या आत कर्ज पारित करू शकते असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. ५० लाखांच्या रक्कमेपर्यंत कर्ज हवे असल्यास अतिरिक्त फायनाशियल स्टेटमेंटची गरज भासणार नाही केवळ जीएसटी रिटर्न, व्यवहारांची पार्श्वभूमी केवळ तपासली जाऊ शकते.
 
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121