मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला कोणती खाती? जाणून घ्या...

    11-Jun-2024
Total Views | 57

Cabinet 
 
नवी दिल्ली : मोदी सरकारचे खातेवाटप (Modi Cabinet) जाहीर झाले असून अनेक मंत्र्यांचे मागील खाते कायम राहिले आहेत. तर काही मंत्र्यांना नवीन खाती देण्यात आली आहेत. सोमवार, १० जून रोजी एनडीए सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं. दरम्यान, राज्यातील ६ मंत्र्यांचं खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे.
 
राज्यातील नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रतापराव जाधव, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे या ६ नेत्यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता त्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे खाते कायम ठेवण्यात आले आहे.
 
तसेच पीयूष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योगमंत्री तर रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा एकदा सोपवण्यात आली आहे. प्रतापराव जाधव यांना आयुष आणि आरोग्य, मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी वाहतूक तर रक्षा खडसे यांना युवक कल्याण आणि क्रीडा हे खाते देण्यात आले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121