सुप्रिया सुळेंना चित्राताईंचा खोचक टोला, म्हणाल्या, "तुमच्या बगलबच्च्या..."

    10-Jun-2024
Total Views | 200
 
Chitra Wagh & Supriya Sule
 
मुंबई : तुमच्या बगलबच्च्या कंत्राटदारांना दूर ठेवा, असा खोचक टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे. रविवारी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावर सुप्रिया सुळेंनी टीका केली होती. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "एका सर्वसामान्य घरातल्या शेतकऱ्याच्या मुलाला केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याचं तुमच्या पचनी पडलेलं दिसत नाही. मुरलीअण्णा तुमच्यासारखे घराणेशाहीच्या भांडवलावर नव्हे, तर पक्षनिष्ठा आणि जनतेच्या प्रेमाच्या बळावर राजकीय गरूडभरारी घेऊ शकलेत. मनाचा उमदेपणा दाखवून त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आनंद व्यक्त करायचा सोडून आपण आपल्या स्वभावाला साजेशी मळमळ मात्र व्यक्त केलीत."
 
हे वाचलंत का? -  अयोध्येतील 'महाराष्ट्र सदन' दोन वर्षांत पूर्ण होणार!
 
"पण मला खात्री आहे की, मुरलीअण्णांना संसदेत पहायची तुम्हाला लवकरच सवय होईल. तेव्हा ते फक्त पुण्यापुरताच नाही, बारामतीपुरताच नाही तर अवघ्या देशाच्या विकासाचे निर्णय घेताना तुम्हाला दिसतील. तुम्ही मात्र बारामतीच्या ग्रामीण भागातील जनतेला मागच्या १५ वर्षांपासून शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या आश्वासनावर झुलवत आलात, यावेळी किमान तेवढं तरी पूर्ण करायचं बघा. त्यासाठी तुम्ही तुमच्या बगलबच्च्या कंत्राटदारांना दूर ठेवा. नाहीतर बारामतीची जनता पुढल्या वेळी कंत्राटदारांसोबत तुम्हालाही दूर ठेवेल," असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121