मोठी बातमी! कोकणात कमळ फुलणार! नारायण राणेंच्या विजयाची शक्यता
01-Jun-2024
Total Views | 130
मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ करिता एक्झिट पोल जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी महायुतीला २४ जागा तर मविआला २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार नारायण राणे निवडून येण्याची शक्यता आहे.
नारायण राणे यांच्याविरोधात ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, एक्झिट पोलनुसार भाजप उमेदवार भाजप नेते तथा उमेदवार नारायण राणे आघाडीवर असून खा. विनायक राऊत पिछाडीवर असल्याचे एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर आले आहे. नारायण राणे यांचा विजय होत निवडून येण्याची शक्यता बळावली आहे.
भाजपकडून नारायण राणे यांना कोकणातून उमेदवारी देण्यासंदर्भात जोरदार तयारी केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, शिंदे शिवसेना गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी देण्यासाठी खलबतं झाली. कोकणाच्या जागेसाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, भाजपकडून नारायण राणेंना जाहीर करत या तिढ्याला पूर्णविराम देण्यात आला.