मुंबई: आशियाई बाजारात आयपीओ गुंतवणूकदारांसाठी भारताचे शेअर बाजार हे महत्वाचे हब बनले आहे. मागील अनेक दिवसात मोठ्या प्रमाणात मुख्य धारेतील व एसएमई अंतर्गत अनेक आयपीओंची नोंद झली आहे. आता निवडणूक निकालानंतर आणखी काही आयपीओची भर पडण्याची शक्यता आहे अशातच ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत हे आयपीओ उभारणीस महत्वाचे हब बनणार आहे.
भारताची तिसरी अर्थव्यवस्था बनवण्यात या शेअर बाजारातील गुंतवणूकीचा महत्वाचा वाटा असणार आहे. यावर्षी ३.९ अब्ज डॉलर्स आयपीओमार्फत भारतीय बाजारात उभे केले गेले आहेत. ब्लूमबर्गच्या बातमीनुसार ही रक्कम दक्षिण कोरिया व हाँगकाँग या दोन्ही राष्ट्रांनी एकत्रितपणे उभारलेल्या निधीहून अधिक आहे. आर्थिक वर्ष २०२४ मधील पहिल्या टप्प्यात १८.६४ अब्ज डॉलर्सपर्यंत निधी उभा केला गेला.
यात आता आणखी एका आयपीओची भर पडणार आहे. ती म्हणजे दक्षिण कोरिया कंपनी होंडाई कंपनीच्या भारतीय युनिटचे शेअर्स आयपीओ मार्फत विक्रीस उपलब्ध असून कंपनी यामार्फत निधी उभारणार आहे. तज्ञांच्या मते आगामी दोन वर्षांत आणखी २० अब्ज डॉलर्सचा निधी आयपीओमार्फत उभारला जाऊ शकतो. विशेषतः निवडणूकीचा निकालानंतर आयपीओत भलं पडू शकते. अदानी एंटरप्राईज लिमिटेड व अदानी एनर्जी आगामी काळात मोठा निधी (३.५ अब्ज डॉलर) उभे करू शकतात.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील भारताची दरवाढ ८ टक्क्यांपर्यंत वाढल्याने भारतात गुंतवणूकीसाठी अनेक गुंतवणूकदार इच्छुक आहेत. बजाज उद्योग समुह देखील जूनमध्ये आयपीओसाठी अर्ज दाखल करू शकतो. विशाल मेगामार्ट,अथेर एनर्जी, नोवेलीस या कंपन्या देखील आयपीओ बाजारात आणण्यासाठी इच्छुक आहेत. ब्लूमबर्गच्या बातमीनुसार, चीन, हाँगकाँग व आशिया देशा तील आर्थिक दबाव बघता गुंतवणूकदार,कंपन्या आयपीओ गुंतवणूकीसाठी भारताला प्राधान्य देतील अशी शक्यता आहे.कॉर्पो रेट्सपासून स्टार्टअप्सपर्यंत आणि त्यापुढील अधिक आयपीओसाठी ही आर्थिक वाढ सहाय्यक आहे.
खाजगी इक्विटी कंपन्या देखील भारतावर दुप्पट होत आहेत कारण ते पोर्टफोलिओ कंपन्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांनी अलीकडच्या काही महिन्यांत त्यांच्या आशिया धोरणांसाठी उभारलेल्या अब्जावधी निधीचा वापर करत आहेत. निवडणूक निकालानंतर बँकर, गुंतवणूकदार, कंपन्या, संस्था या आयपीओतून मोठी गुंतवणूक उभे करु शकतात अशी एकंदर चिन्हे आहेत.