नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या शेवटच्या टप्प्यासाठी दि. १ जून रोजी मतदान सुरु आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ४० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मतदान आजच्या टप्प्यात नोंदवले गेले आहे. तर बिहार मात्र पिछाडीवर आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरु आहे. टीएमसी कार्यकर्त्यांकडून मतदारांना धमकावण्याच्या आणि बॉम्बस्फोटाच्या घडवल्याच्या घटना समोर येत आहेत. पश्चिम बंगालमधील जयनगर लोकसभा जागेवर मतदानाजदरम्यान टीएमसीच्या गुंडांनी केलेल्या दगडफेकी.त एएनआयच्या पत्रकाराला गंभीर दुखापत झाली. पत्रकाराला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी संदेशखाली ते भांगडपर्यंत बॉम्बस्फोट घडवून आण्याचे कृत्य उघडकीस आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत मतदानांची बातमी कव्हर करणाऱ्या पत्रकार बंटी मुखर्जी यांचे दगडफेकीत डोके फुटले. दरम्यान टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष करण्यात आले. ज्यामुळे दगडफेकीत दुखापत झालेल्या कार्यकर्त्यांना गंभीर अवस्थेत कोलकाता येथील मेडिका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच बशीरहाट लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या संदेशखालीमध्ये टीएमसीच्या गुंडांमुळे तणावाचे वातावरण आहे. टीएमसी कार्यकर्ते प्रत्येक घरात घुसून मतदान करण्याची धमकी देत आहेत.