सलग तिसऱ्यांदा सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. आरबीआयच्या 'प्रोजेक्ट फायनान्स' निर्बंधांमुळे निर्देशांकात घसरण सुरू झाली होती ती अजनूही कायम राहिली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ६०५.०८ अंशाने घसरत ५४९२९.२८ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ६०९.९५ अंशाने घसरत ४८२८५.३५ पातळीवर घसरला आहे. दोन्ही बँक निर्देशांकात अनुक्रमे १.०९ व १.२५ टक्क्यांनी घसरण झाल्याने बँक समभागात मोठी पडझड झाली.
बीएसई (BSE) मध्ये मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.९० व १.६५ टक्क्यांनी घट झाली आहे तर एनएसई ( NSE) मध्ये १.९८ व १.८९ टक्क्यांनी घट झाली आहे.
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये एफएमसीजी (२.२%) आयटी (०.७७%) वगळता इतर सर्व निर्देशांकात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण पीएसयु बँक (२.३१%) मिडिया (१.४५%) मेटल (२.३९%) रियल्टी (३.४९%) तेल गॅस (१.८८%) मिडस्मॉल हेल्थकेअर (२.२०%) या समभागात झाली आहे.
आज बीएसईत एकूण ३९३२ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १०८४ समभाग वधारले असून २७३९ समभागात घसरण झाली आहे. ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ १७९ समभागात झाली असून ३३५ समभागात आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. त्यातील २१८ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ३३५ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत.
एनएसईत २७२८ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील ६३६ समभाग (Shares) वधारले असून १९७९ समभागात आज घसरण झाली आहे. ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ ८१ समभागात झाली आहे तर ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण २५ समभागात झाली आहे. त्यातील ८६ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १२९ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
आज डॉलरच्या तुलनेत रुपया किंमतीत अंतिमतः कुठलाही फारसा बदल झालेला नाही. सकाळी रुपयांची किंमत ४ पैशाने वधारली असली तरी संध्याकाळपर्यंत १ पैसा वधारत ८३.४८ रुपयांवर स्थिरावला होता. भारतातील सोन्याच्या किंमतीत सकाळी प्रति १० ग्रॅम दरात ३३० रुपयांनी वाढ झाली असली तरी संध्याकाळपर्यंत युएस फ्युचर गोल्ड निर्देशांकात ०.४१ टक्क्यांनी घट झाली आहे तर भारतातील एमसीएक्स (Mutli Commodity Exchange) मध्ये संध्याकाळपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात ०.३३ टक्क्यांनी घसरण झाली असून सोन्याचे भाव ७११३०.०० रुपयांवर पोहोचले आहे.मुख्यतः जागतिक पातळीवरील सोन्याच्या दरात घसरण झाल्यावर एमसीएक्समधील दरात घसरण झाली आहे.
भारतात बीएसईतील एकूण कंपन्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ३९८.४३ लाख कोटी होते तर एनएसईत कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ३९५.१३ लाख कोटी होते.
जागतिक पातळीवरील क्रूड तेलाच्या निर्देशांकात कालपर्यंत वाढ झाली होती जी दुपारपर्यंत कायम राहिली होती. मध्यपूर्वेतील दबावामुळे व ओपेक देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट केल्याने ही दरवाढ झाली होती. परंतु संध्याकाळपर्यंत किंमतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. WTI Future क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.३६ टक्क्यांनी घट झाली आहे तर Brent Oil क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.३५ टक्क्यांनी घट झाली आहे तर भारतातील एमसीएक्स निर्देशांकातील कच्च्या तेलाच्या निर्देशांकात ०.०३ टक्क्यांनी वाढ होत क्रूड ६५४४ रुपये प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
आज मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक कालप्रमाणे आजही मोठ्या प्रमाणात कायम आहे काल परदेशी गुंतवणूकदारांनी एकूण २१६८.७५ कोटींची गुंतवणूक काढून घेतली होती तर एनएसईत परदेशी गुंतवणूकदारांनी २१६८.७५ कोटींची गुंतवणूक काढून घेतली होती.
प्रामुख्याने बाजारातील मूड नफा बुकिंगचा असला तरी बँक निर्देशांकातील घसरणीमुळे निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. पीएसयु, प्रायव्हेट बँक, रिअल्टी या समभागात घसरण झाली असताना गुंतवणूकदारांना एफएमसीजी समभागांचा आधार मिळाला होता. आजही निफ्टी VIX (Volatility Index) निर्देशांक पंधरा महिन्यातील सर्वाधिक पातळीवर पोहोचला आहे. हा निर्देशांक आज १७ टक्क्यांपर्यंत वाढल्याने बाजारातील चढउतार मोठ्या प्रमाणात झाली होती. १० टक्क्यांवरून हा निर्देशांक एप्रिलमध्ये ७० टक्क्यांपर्यंत वाढल्याने बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेअर बाजारात फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल ही आशा निर्माण झाल्याने रॅली झाली होती.
अमेरिकन बाजारातील DoW, S& P 500, NASDAQ तिन्ही बाजारात १ ते २ टक्क्यांनी वाढ झाली होती. युरोपातील FTSE 100, DAX, CAC 40 या समभागात १ टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती तर आशियाई बाजारातील NIKKEI, SHANGHAI बाजारात ० ते १ टक्क्यांनी वाढ झाली असून केवळ HANG SENG बाजारात ०.५३ टक्क्यांनी घट झाली होती.आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढ झाली असली तरी मात्र भारतीय गुंतवणूकदारांनी फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीकडे लक्ष न देता सावधानतेचा पवित्रा घेतला होता. तेच नेमके परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात केले होते.आगामी निवडणुका पाहता अनेक गुंतवणूकदारांनी नफा बूकिंगसाठी प्रयत्न केले होते.
निवडणूकीचा तोंडावर बाजारात कुठलीही नवी घटना न घडता मात्र नव्या चौथ्या तिमाहीतील निकालाबाबत गुंतवणूक प्रभावित झाले नसल्याचे चित्र आहे. एकूणच बाजारातील परिस्थिती पाहता आगामी बाजारातील चढ उतार,बँक निर्देशांकातील हालचाल पाहणे गरजेचे ठरणार आहे.
बीएसईत एचयुएल, टेक महिंद्रा, नेस्ले, टीसीएस, आयटीसी, कोटक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स या समभागात वाढ झाली आहे तर पॉवर ग्रीड, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, जेएसडब्लू स्टील, टाटा स्टील, एचसीएलटेक, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, रिलायन्स, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, सनफार्मा, एसबीआय, मारूती सुझुकी, टायटन कंपनी, एशियन पेंटस, भारती एअरटेल, बजाज फायनान्स या समभागात घसरण झाली आहे.
एनएसईत एचयुएल, टेक महिंद्रा, ब्रिटानिया, नेस्ले, टीसीएस, आयटीसी, कोटक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, आयशर मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल,बजाज फायनान्स, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट या समभागात वाढ झाली असून बजाज ऑटो,पॉवर ग्रीड, ओएनजीसी, इंडसइंड बँक, हिंदाल्को, टाटा मोटर्स, जेएसडब्लू स्टील, सिप्ला, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, एचसीएलटेक, टाटा स्टील, एम अँड एम, एक्सिस बँक, अदानी एंटरप्राईज,ग्रासीम, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, लार्सन, कोल इंडिया,बीपीसीएल, सनफार्मा, हिरो मोटोकॉर्प, एसबीआय, एशियन पेंटस, मारूती सुझुकी, एचडीएफसी लाईफ, टायटन कंपनी, अदानी पोर्टस या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,'सकारात्मक जागतिक संकेत असूनही, देशांतर्गत बाजारपेठ मजबूत होत राहिली. सध्याच्या निवडणुकांमध्ये कमी मतदान आणि प्रीमियम मूल्यांकनासह विविध कारणांमुळे देशांतर्गत बाजारात नफा बुकिंग होत आहे. तथापि अनुकूल मान्सूनच्या अपेक्षेमुळे ग्रामीण भागातील खंड वाढ सुधारण्याच्या अपेक्षेने प्रेरित,व्यापारसत्रात एफएमसीजी (FMCG) सर्वात मोठा क्षेत्रीय लाभकर्ता राहिला.'
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च हृषिकेश येडवे म्हणाले, 'मंगळवारी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक वर उघडले, अनुकूल जागतिक संकेतांमुळे मदत झाली. तथापि, सुरुवातीच्या काही गडबडीनंतर, बाजाराने मोठ्या प्रमाणात नफा बुकींग पाहिली, ज्यामध्ये अस्थिरता निर्देशांक (इंडिया VIX) सुमारे ६% ने उडी मारली.
नंतरच्या दिवसात, अस्थिरता कमी झाली आणि निर्देशांक २२३०२ वर बंद झाला तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाने मागील आठवड्यात मंदीची मेणबत्ती निर्माण केली, जे खाली स्थिरावलेले निर्देशांक, आणि ३४-दिवसीय एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज (DEMA) समर्थन दर्शवते. २२१००-२२०००पातळीवर निर्देशांकाला मजबूत समर्थन मिळेल. अल्पावधीत, २२१०० आणि २२००० ठोस समर्थन स्तर म्हणून काम करतील, तर २२५०० आणि २२८०० निर्देशांकासाठी अडथळे म्हणून काम करतील.
बँक निफ्टी तेजीच्या नोटेवर उघडला, परंतु मोठ्या प्रमाणात विक्रीच्या दबावामुळे निर्देशांक ४८२८५ वर नकारात्मक नोटवर संपला. तांत्रिकदृष्ट्या, साप्ताहिक आधारावर, निर्देशांकाने ४९९७५ च्या जवळ मजबूत प्रतिकार दर्शवत, त्याच्या सर्वकालीन उच्चाजवळ शूटिंग स्टार कँडलस्टिक तयार केले. शिवाय निर्देशांकाने मागील आठवड्यातील ४८३४२.७ चा नीचांक मोडला. जोपर्यंत निर्देशांक ४८३४० च्या खाली राहील तोपर्यंत कमजोरी ४८०००-४७७०० पर्यंत वाढू शकते. अल्पावधीत, ४८००० आणि ४७७०० समर्थन बिंदू म्हणून काम करतील, तर ४९००० आणि ५०००० प्रतिरोधक म्हणून काम करतील.'
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले की, 'आज निफ्टी ०.६२% घसरत २२३०२ वर बंद झाला तर सेन्सेक्स ०.५२% घसरून ७३५११ वर बंद झाला.या मंदीच्या बाजारपेठेत निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी आयटी अनुक्रमे २.२% आणि ०.७७% ने सर्वोच्च कामगिरी करणारे क्षेत्रीय निर्देशांक होते. वाढती आंतरराष्ट्रीय अनिश्चितता आणि भारतात चालू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रकाशात, भारत VIX आज २.५ % आणि या आठवड्यात १८% वाढला.२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालापर्यंत सतत अस्थिरता असेल.
Balmar Lawrie & Company Ltd. ची २८ मे २०२४ रोजी बोर्डाची बैठक आहे.लाभांश, त्रैमासिक कमाई ते बायबॅक, बोनस शेअर इश्यू आणि शेअर्सचे विभाजन यावर देखील चर्चा करतील. एचयूएल, टेक महिंद्रा, ब्रिटानिया, नेस्ले आणि टीसीएस हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले तर बजाज ऑटो, पॉवर ग्रिड कॉर्प, ओएनजीसी, इंडसइंड बँक आणि हिंदाल्को हे निफ्टीमध्ये सर्वाधिक तोट्यात होते.'
सोन्याच्या हालचालीवर व्यक्त होताना, एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, '७१५०० च्या अलीकडील रॅलीनंतर सोन्याच्या किमती ७१५०० च्या खाली राहिल्या. किरकोळ कमजोरी कायम राहिली, संभाव्यत: ७०७५० पर्यंत दर वाढेल. या आठवड्यात कोणताही महत्त्वपूर्ण डेटा नसल्यामुळे, सोन्याच्या किमती ७००००-७१७५० च्या अस्थिर श्रेणीमध्ये व्यवहार करू शकतात.'
रुपयाच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी करन्सी व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८३.५० च्या आसपास व्यवहार केला, डॉलर निर्देशांक १०५$ च्या जवळ स्थिर राहिला. क्रूडच्या किमती अलीकडे कमी झाल्या असल्या तरी, भांडवली बाजारातील विक्रीने रुपयावर काही दबाव आणला आहे,ज्यामुळे तो ८३.३० ते ८३.५० पर्यंत कमजोर झाला आहे. या आठवड्यासाठी कोणतेही मोठे डेटा रिलीझ शेड्यूल केलेले नसल्यामुळे, रुपयाने ८३.२०-८३.६५ च्या मर्यादेत कडेकडेने व्यवहार करणे अपेक्षित आहे.'
बाजारातील निफ्टीविषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले, 'तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांक २१EMA च्या खाली घसरल्याने ट्रेंड कमकुवत झाला आहे. तासाच्या चार्टवर हेड आणि शोल्डर्स पॅटर्न दिसत आहे, निर्देशांक सध्या नेकलाइनच्या खाली टिकून आहे, मंदीची निर्मिती दर्शवते. पुढील विक्रीचा दबाव अपेक्षित आहे, शक्यतो त्या दिशेने वाढेल,२१९८०-२२०००अल्पावधीत, जोपर्यंत ते २२४०० च्या खाली राहील."