मुंबई: सेंट्रम फायनांशियल सर्विसेसच्या पाठिंब्यावर डिजिटल बँक असलेल्या 'युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीला १४३ कोटींचा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निव्वळ नफा तिमाहीत ३७४ टक्क्यांनी वाढत १४३ कोटींवर पोहोचला आहे. तर इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीला ४३९ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे.
बँकेचे उत्पन्न आर्थिक वर्ष २०२३ मधील २५९ कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष २४ मध्ये ५२१ कोटींवर पोहोचले आहे. बँकेच्या उत्पन्नात १०१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेच्या निव्वळ उत्पन्नात ३१ मार्च २०२३ मधील २१६ कोटींच्या तुलनेत ७७ टक्क्यांनी वाढत ३८३ कोटींवर पोहोचले आहे.
बँकेच्या निव्वळ नफ्यात मागील तिमाहीतील ५२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ३७४ टक्क्यांनी नफ्यात वाढ होत १४३ कोटींवर निव्वळ नफा झाला आहे. वार्षिक बेसिसवर बँकेच्या ठेवीत मार्च २०२३ मधील १७ कोटींच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढत मार्च २२०४ मध्ये १९ कोटींपर्यंत ठेवी पोहोचल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन (Net Interest Margin) मध्ये १०.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income) मध्ये मागील वर्षाच्या तिमाहीतील १८१ कोटींच्या तुलनेत २९८ टक्क्यांनी वाढ झाली असून हे निव्वळ व्याज उत्पन्न २८१ कोटीवर पोहोचले आहे.