इंडी आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान कर; पुण्यात इस्लामिक संघटनेकडून फतवा जारी
07-May-2024
Total Views | 74
(Fatva about Mahavikas Aghadi)
मुंबई (प्रतिनिधी) : जमियत उलेमा-ए-हिंद ही भारतातील देवबंदी विचारसरणीशी संबंधित इस्लामिक विद्वानांची एक प्रमुख संघटना आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील केवळ महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचा फतवा या संघटनेने जारी केल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर धुमाकूळ घालत आहे.
सदर व्हिडिओमध्ये उपस्थित मुस्लिम बांधवांना एक मौलाना महायुतीच्या चारही उमेदवारांच्या विरोधात मतदान करण्यास सांगत असल्याचे दिसते आहे. लोकसभा निवडणुकीकरीता पुणे शहरातून काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर, शिरुर लोकसभा मतदार संघातून शरद पवाट गटाचे अमोल कोल्हे, बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे, मावळ लोकसभा मतदार संघातून उबाठा गटाचे संजोग वाघेरे हे उभे आहेत. तर या चार उमेदवारांना मतदान करून त्यांना जिंकून आणण्याचा फतवा काढल्याचे व्हिडिओद्वारे स्पष्टपणे दिसत आहे.
#Pune | Jamiyat-Ulema-E-Hind issues a fatwa to vote for the candidates of INDI Alliance parties namely Congress, NCP Sharad Pawar Faction, and Shiv Sena (UBT) pic.twitter.com/vIwKXVhaH6