मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. मूलतः शेअर बाजारातील स्थिती सकाळी परिणामकारक ठरल्याने बाजारात चढ उतार त्या तुलनेत कमी राहिले आहे.सकाळी शेअर बाजारातील सुरुवातीच्या सत्रात तुलनात्मक दृष्ट्या वाढ झाली होती. बाजारातील आकडे उच्च पातळीवर गेले नसले तरी बाजारातील पडझड नियंत्रित राहिली आहे. एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांकात १७.३९ अंशाने (०.०२ %) वाढत ७३८९५.५४ पातळीवर वाढ झाली आहे. तर निफ्टी ५० निर्देशांकात ३३.१५ अंशाने (०.१५%) वाढत २२४४२.७० पातळीवर निर्देशांक स्थिरावला आहे.
सेन्सेक्स बँक निर्देशांकात अखेरच्या सत्रात १२३.८९ (०.२२%) अंशाने वाढ होत ५५५३२.९८ पातळीवर पोहोचला आहे निफ्टी बँक निर्देशांकात २८.२५ अंशाने (०.०६%) घट होत निफ्टी बँक ४८८९५.३० पातळीवर पोहोचला आहे.बीएसई (BSE) मध्ये मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९९ व १.११ टक्क्यांनी घट झाली आहे तर एनएसई (NSE) मध्ये मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४२ व १.३४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रातही मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण झाली होती.आज वाढलेल्या समभागात ७ ते १० टक्क्यांवर वाढ झाली आहे तर घसरलेल्या समभागात ६ ते ८ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये सकाळप्रमाणे संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. सर्वाधिक वाढ रिअल्टी (२.७६%) समभागात झाली असुन प्रायव्हेट बँक (०.४३ %) हेल्थकेअर (०.६४%) एफएमसीजी (०.७१%) या समभागात वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण पीएसयु बँक (३.६६ %) मिडिया (२.१६%) समभागात झाली असून मेटल (०.९६%) फायनांशियल सर्विसेस (०.२५ %) या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
आज बीएसईत ४०९३ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १२९४ समभाग वधारले असून २६२७ समभागात घसरण झाली आहे. ५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकन २४२ समभागाचे वाढले असून २६ समभागांचे ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण ३२८ समभाग (Shares) आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ३५० समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
एनएसईत आज २७५८ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील ८४१ समभागात वाढ झाली असून १८०८ समभागात मात्र घसरण झाली आहे. त्यातील १४० समभागाचे मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वाधिक राहिले असून २१ समभागाचे मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण १०१ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १०७ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
सौदी अरेबियाने आशियाई बाजारात व्यापार केल्या जाणाऱ्या क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ करण्याचे स्पष्ट केल्याने तसेच ओपेक देशांनी क्रूड तेलाच्या उत्पादनात घट केल्याने बाजारातील क्रूड तेलाच्या निर्देशांक वधारले होते. इस्त्रायल हमास संघर्षाने पुन्हा डोके वर काढल्याने मध्य पूर्वेकडील तणावात वाढ झाली पर्यायाने क्रूड महागले आहे.
दुपारपर्यंत जागतिक पातळीवरील क्रूड तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. WTI Future क्रूड तेलाच्या निर्देशांकात १ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारत एमसीएक्स (Multi Commodity Exchange) क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.८७ टक्क्यांनी वाढ होत प्रति बॅरेल किंमत ६६०३.०० वर पोहोचली आहे.
सकाळी सोन्याच्या दरात कालप्रमाणे घट झाली असली तरी दुपारपर्यंत पर्यंत युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात वाढ झाल्याने पुन्हा सोन्याने तेजी राखली आहे. दुपारी युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर भारतीय एमसीएक्सवर सोन्याच्या निर्देशांकात ०.७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एकूण सोन्याच्या २२ कॅरेटमधील १० ग्रॅम सोन्याच्या दरात सरासरी २०० रूपयांनी वाढ झाली आहे तर २४ कॅरेटमधील सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २२० रुपयांनी वाढ झाली आहे.
बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) एकूण ४०३.४३ लाख कोटी होते तर एनएसईत कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ३९९.९९ लाख कोटी होते.
शुक्रवारी निवडणूकीनंतर कर प्रणालीत बदल होत वाढ होणार असल्याची अफवा पसरली होती. मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शक्यता फेटाळून लावत ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केल्याने यांचा परिणाम सकाळच्या सत्रात जाणवला होता. कालपर्यंत बीएसईत परदेशी गुंतवणूकदारांनी २३९१.९७ कोटींची गुंतवणूक बाजारातून काढली असून देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ६९०.५२ कोटींची गुंतवणूक केली होती. एनएसईतील परदेशी गुंतवणूकदारांनी २३९१.९८ कोटींची गुंतवणूक काढून घेत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ६९०.५२ कोटींची नेट गुंतवणूक केली होती. सकाळच्या सत्रात गिफ्ट निफ्टीत ११० अंकाने वाढ झाल्याने सकारात्मक संकेत बाजारात मिळाले होते.
आज प्रामुख्याने रिअल्टीमध्ये,आयटीमध्ये वाढ झाली असली तरी पीएसयु समभागात मोठी घसरण झाल्याने बाजारात रॅली नियंत्रित झाली आहे. मध्यपूर्वेतील दबाव वाढल्याने तसेच युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात लवकरच कोणताही बदल होण्याची शक्यता नसल्याने व आगामी आठवड्यातील अमेरिकतील इन्फ्लेशन इंडेक्स समोर येणार असल्याने बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी सावधतेचा पवित्रा घेतला आहे.किंबहुना आज भारतीय गुंतवणूकदारांनी 'नफा बुकिंग' चा पवित्रा स्विकारल्याची शक्यता अधिक आहे.
भारतीय बाजारातील सकारात्मक तिमाही निकाल, तसेच एचएसबीसी पीएमआय निर्देशांकातील एप्रिलमध्ये आलेल्या आकडेवारीने भारतात शेअर बाजारात भारतीय गुंतवणूकदारांमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्साह दिसला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील चांगले संकेत असताना देखील युएस बाजारातील रोजगाराचे व महागाईचे आकडे काय येतील यावर परदेशी गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केल्याने बाजारात चढ उतार पहायला मिळाली. विशेषतः पीएसयु बँकेच्या समभागात घसरण झाल्याने फार मोठी वाढ होऊ शकली नाही. विशेषतः बाजारातील VIX (Volatility Index ) १३.८७ टक्क्यांवर पोहोचल्याने बाजारात मोठी चढ उतार झाली होती.
आरबीआयने पीएसयुवर प्रोजेक्ट फायनान्स कर्ज पुरवठयात घातलेल्या नव्या निर्बंधाने पीएसयु समभागात ३ ते ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरल्याने अखेरीस ८३.४० रुपयांवर प्रति डॉलर किंमत स्थिरावली होती. एकूणच बाजारात वाढ झाली असली तरी अपेक्षित वाढ होउ शकली नाही.
बीएसईत कोटक महिंद्रा, टीसीएस, एचयुएल, एम अँड एम, सनफार्मा, जेएसडब्लू स्टील, इंडसइंड बँक, टाटा स्टील, इन्फोसिस, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, एचसीएलटेक, विप्रो, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, एशियन पेंटस, टाटा मोटर्स या समभागात वाढ झाली आहे तर टायटन कंपनी, एसबीआय, एनटीपीसी, पॉवर ग्रीड, लार्सन, बजाज फायनान्स, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी या समभागात घसरण झाली आहे.
एनएसईतील ब्रिटानिया, कोटक महिंद्रा, टीसीएस, एचयुएल, एम अँड एम, सनफार्मा, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, एचसीएलटेक, जेएसडब्लू स्टील, इन्फोसिस, टाटा स्टील, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, टाटा मोटर्स, विप्रो, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, एशियन पेंटस, नेस्ले या समभागात वाढ झाली आहे तर टायटन कंपनी, अदानी एंटरप्राईज, कोल इंडिया, बीपीसीएल, एसबीआय, अदानी पोर्टस, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्स, ओएनजीसी, पॉवर ग्रीड, हिंदाल्को, ग्रामीम, लार्सन, बजाज फायनान्स, रिलायन्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, हिरो मोटोकॉर्प, डॉ रेड्डीज, बजाज ऑटो, मारूती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, सिप्ला, आयशर मोटर्स या समभागात घसरण झाली आहे.
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की, शुक्रवारी बाजार करेक्शन मोड मधे आला होता.आज तो सर्व ग्रुपमध्ये करेक्शन करत 'फॅट' कमी करत आहे.आज ४०९३ ट्रेड झालेल्या शेअर्सपैकी २६२५ शेअर खालावले आहेत व १२९६ वाढले आहेत. वरवर जरी बाजार फ्लॅट दिसला तरी सर्व स्तरावर नफा वसुली सुरू आहे .
नफा हा वेळोवेळी घरी घेऊन जाणे हे खूप महत्त्वाचे आहे. आणि अशा करेक्शन प्रत्येक नवीन उच्चांकानंतर अपेक्षित असतात, त्या त्या वेळी काही टक्के नफा व मुद्दल घरी नेणे अपेक्षित असते व त्याच वेळी कोणते शेअर्स तेजीत अजिबात सहभागी झालेले नाहीत. या करेक्शनमध्ये अजिबात कमीही होत नाहीत. अशा शेअर्सच्या निकालावर लगेच निर्णय घेता येतो. त्याची यादी तयार ठेवून त्यावर अँक्शन अपेक्षित असते.पुढील तेजीत केमिकल क्षेत्र येऊ शकेल.भारतीय बाजार आपली दिशा स्वतः ठरवत आहे. अमेरीकेन फेड रिझर्व्हच्या व्याज दर कपातीनंतरच्या तेजी करीता बाजार तयार करीत आहे.'
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना, असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हीपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च एनालिस्ट निरज शर्मा म्हणाले,'माध्यम, ग्राहकोपयोगी वस्तू आणि पीएसयू क्षेत्रातील तोट्यामुळे गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे सोमवारी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांकांवर विक्रीचा दबाव होता. भारत VIX १३% पेक्षा जास्त असल्याने शेवटी अस्थिरता मजबूत राहिली.निफ्टी २२४४२.७० वर नकारात्मक नोटवर बंद झाला.
तांत्रिक दृष्टिकोनातून, निर्देशांक वाढत्या चॅनल पॅटर्नमध्ये एकत्रित होत आहे. दैनंदिन स्तरावर,निर्देशांकाने मंदीचा गुंफणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केला आहे, त्यानंतर आजची लाल मेणबत्ती कमकुवतपणा दर्शवते. निफ्टी २२३४० च्या खाली गेल्यास, नजीकच्या भविष्यात स्लाईड २२१००-२२००० च्या पातळीवर चालू राहू शकते.'
निफ्टी बँक निर्देशांक एका अंतरासह उघडला परंतु उच्च स्तरावर टिकू शकला नाही, दिवसाचा दिवस नकारात्मक नोटवर 48,895 वर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाने साप्ताहिक स्केलवर शूटिंग स्टार मेणबत्ती तयार केली आहे.अशाप्रकारे, 49,975-50,000 निर्देशांकासाठी अल्पकालीन अडथळा म्हणून काम करतील. जर निर्देशांक 48,300 पातळीच्या खाली टिकून राहिला तर तो पुन्हा 47,500-47,000 स्तरांवर जाऊ शकतो. अल्प मुदतीसाठी, 48,500 आणि 48,300 समर्थन बिंदू म्हणून काम करतील, तर 49,500 आणि 50,000 प्रतिरोधक बिंदू म्हणून काम करतील.'
आज शेअर बाजारातील हालचालीविषयी प्रतिक्रिया देताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले,'आज निफ्टी ०.१५% ने नकारात्मक नोटवर बंद झाला तर सेन्सेक्स सपाट होता. निफ्टी रिॲल्टी आणि निफ्टी एफएमसीजी अनुक्रमे २.७६% आणि ०.७१% ने सर्वोच्च कामगिरी करणारे क्षेत्रीय निर्देशांक होते.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिपक्व होणाऱ्या २००००कोटी रुपयांच्या कर्जाचा काही भाग पुनर्वित्त करण्यासाठी, शापूरजी पालोनजी (SP) समूहाने $१.२ अब्जपर्यंत सुरक्षित करण्यासाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) शी बोलणी सुरू केली आहेत.Indegene Ltd IPO ला सबस्क्रिप्शनसाठी उघडले आहे आणि बिडिंगच्या १ दिवसात आधीच ७२ टक्के सबस्क्राइब केले आहे. गुंतवणूकदारांनी २.२९ कोटी समभागांच्या एकूण इश्यू आकाराच्या तुलनेत २.८ कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लावली, असे स्टॉक एक्सचेंज डेटा दर्शविते. निफ्टीमध्ये ब्रिटानिया, कोटक महिंद्रा,टीसीएस, एचयुएल आणि एम अँड एम यांचा सर्वाधिक फायदा झाला तर टायटन कंपनी,अदानी एंटरप्रायझेस, बीपीसीएल, कोल इंडिया, एसबीआय या समभागात घसरण झाली आहे.'
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,
'विकासाधीन प्रकल्पांना कर्ज देण्याबाबत आरबीआयच्या कठोर नियमांमुळे PSU बँकांच्या कमी कामगिरीमुळे देशांतर्गत निर्देशांकांनी श्रेणीबद्ध पद्धतीने व्यवहार केले. मूल्यांकनाच्या चिंतेमुळे आणि नफा बुकिंगमुळे व्यापक निर्देशांकांवरही विक्रीचा मोठा दबाव दिसून आला. जागतिक स्तरावर, कमकुवत यू.एस. पेरोल डेटामुळे संभाव्य FED दर कपातीची अपेक्षा वाढली आहे गुंतवणूकदार या आठवड्याच्या FED स्पीकर्सचे भविष्यातील चलनविषयक धोरणावर बारकाईने निरीक्षण करत आहेत.'
सोन्याच्या हालचालीवर व्यक्त होताना एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी करन्सी व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले,' मध्य पूर्वेतील नवीन संघर्ष आणि कमकुवत यूएस नोकऱ्यांच्या डेटामुळे MCX मध्ये सोन्याच्या किमती ५०० रुपयांहून अधिक वाढून ७१२०० वर पोहोचल्या. या डेटामुळे पूर्वीच्या यूएस व्याजदर कपातीची अपेक्षा वाढली, जी सोन्याच्या किमतींसाठी सकारात्मक आहे. सोन्यासाठी अंदाज आहे. नजीकच्या भविष्यात ७००००ते ७२५०० च्या श्रेणीत व्यापार करू.'
रुपयाच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी करन्सी व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, 'चालू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे रुपया डॉलरच्या तुलनेत ०.०६ रुपयेनी ८३.५० पर्यंत कमकुवत झाला.गेल्या आठवड्यात अमेरिकेतील नॉनफार्म पेरोल आणि बेरोजगारी डेटा, जे अनुक्रमे कमी आणि जास्त आले होते, यामुळे डॉलर निर्देशांक कमकुवत झाला. सार्वत्रिक निवडणुका चालू असताना, रुपयाची घसरण झाली आहे. रुपयाची श्रेणी ८३.५० -८३.६५ च्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे.'
बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेड एसव्हीपी अजित मिश्रा म्हणाले, 'बाजाराने आठवड्याची सुरुवात शांतपणे केली आणि संमिश्र संकेतांच्या प्रभावाने थोडासा बदल झाला. सुरुवातीच्या वाढीनंतरही, निफ्टीने त्वरीत नफा सोडला आणि बंद होईपर्यंत एका अरुंद श्रेणीत व्यवहार केला, २२४४२.७० स्तरांवर समाप्त झाला. विविध क्षेत्रांनी संमिश्र कामगिरी पाहिली,रिॲल्टी आणि आयटीने माफक नफा दाखवला तर ऊर्जा आणि धातू क्षेत्रांमध्ये घसरण झाली.०.५% ते १.५०% पर्यंतचे नुकसान अनुभवत, व्यापक निर्देशांकांनी बेंचमार्कपेक्षा कमकुवत कामगिरी केली.
अस्थिरता निर्देशांकातील लक्षणीय वाढ, इंडिया VIX, भावनेवर परिणाम करू लागली आहे, निफ्टी जसजसा वाढतो तसतसे त्यावर दबाव आणणे चालू ठेवते. जरी यूएस बाजारातील पुनर्प्राप्ती आणि काही हेवीवेट्सच्या लवचिकतेमुळे आतापर्यंत काही नुकसान कमी झाले असले तरी, निफ्टीमध्ये २२४०० च्या खाली स्पष्ट ब्रेकमुळे तेजीची भावना कमी होऊ शकते. '