मुंबई (समृद्धी ढमाले) : उत्तर भारताला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या एनएच-४४ महामार्गावर नागपूर ते शिवनी दरम्यान बांधण्यात आलेल्या वन्यजीव अंडरपासमध्ये बछड्यांसह वाघिणीचा वावर आढळून आला आहे (wildlife mitigation measures). हरित क्षेत्रामधून जाणाऱ्या महामार्गांमुळे वन्यजीवांच्या भ्रमणात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वन्यजीव अंडरपास तयार करण्यात येत आहेत (wildlife mitigation measures). एनएच-४४ महामार्गावरील नागपूर ते शिवनी दरम्यानच्या अंडरपासमध्ये 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांची छायाचित्र टिपण्यात आली आहेत (wildlife mitigation measures). त्यामुळे रस्ते प्रकल्पांमध्ये वन्यजीवविषयी केलेल्या अशा प्रकारच्या उपाययोजना यशस्वी ठरत आहेत. (wildlife mitigation measures)
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’कडून उभारण्यात आलेला ’एनएच-४४’ महामार्ग महाराष्ट्रामधून पेंचच्या जंगलाला छेदून जातो. त्यामुळे या मार्गाच्या उभारणीवेळी वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीच्या दृष्टीने त्यावर काही बांधकाम करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली होती. मुंबई उच्च न्यायालयानेही या मागणीची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाला वन्यजीवांच्या दृष्टीने काही बांधकाम उभारण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी प्राधिकरणाने 'भारतीय वन्यजीव संस्थान’मधील (डब्लूआयआय) तज्ज्ञांच्या मदतीने या महामार्गावर काही बांधकाम केले. यामध्ये ८० ते ७५० मीटर आकाराचे नऊ अंडरपास बांधण्यात आले. अंडरपास म्हणजे महामार्ग उन्नत स्वरूपाचा बांधून त्याखालून वन्यजीवांना सुरक्षित हालचाल करण्याची सोय निर्माण करून देणे. कान्हा ते पेंच राष्ट्रीय उद्यानादरम्यानचा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी बांधण्यात आलेले हे भारतातील पहिलेच 'अंडरपास’ आहेत.
'एनएच-४४' मधील अशाच एका अंडरपासमध्ये एक वाघीण तिच्या चार बछड्यांसह 'कॅमेरा ट्रॅप'मध्ये टिपली गेली आहे. यासंदर्भातील माहिती 'डब्लूआयआय'ने दिली आहे. या अंडरपासमधून वाघांसह अनेक प्रजातींचा वावर 'डब्लूआयआय'ने नोंदवला आहे. यासंदर्भात दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना 'डब्लूआयआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. बिलाल हबीब यांनी सांगितले की, "'डब्लूआयआय'ने सुचविलेल्या शास्त्रोक्त माहितीच्या आधारावर एनएच-४४ मधाल हा भाग उभा असून अनेक प्रजाती या अंडरपासचा वापर करताना दिसत आहेत. हे या प्रकल्पाचे यश असून अशा पद्धतीच्या आधुनिक वन्यजीवविषयक उपाययोजनांचा अधिकाधिक वापर व्हायला हवा, जेणेकरून शक्य तितक्या वन्यजीवांचा अधिवास आपल्याला वाचविता येईल आणि संरक्षित करता येईल."