'टिपू सुलतान खरे स्वातंत्र्यवीर...'; पुण्यात अनिस सुंडकेंचे वादग्रस्त विधान
04-May-2024
Total Views | 133
मुंबई (प्रतिनिधी) : पुण्यात लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर टिपू सुलतानच्या (Tipu Sultan) उदात्तीकरणाचा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. टिपू सुलतान खरे स्वातंत्र्यवीर होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढत त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली; असे वक्तव्य एमआयएमचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडके यांनी केले. प्रचारानिमित्त निघालेल्या एका रॅलीदरम्यान त्यांनी हे विधान केले आहे.
पुण्यातील नागरीकांना विशेषतः तरुण पिढीला टिपू सुलतानच्या शौर्याची गाथा कळली पाहिजे या हेतूने पुण्यात टिपू सुलतानच्या नावे उद्यान बनवणार असून तिथे त्याचे भव्य स्मारक देखील उभारले जाणार असल्याचे सुंडके यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, आतापर्यंतच्या खासदारांनी अल्पसंख्यांक तसेच वंचित समाजाला दुर्लक्ष केले. फक्त वोट बँक म्हणून मुस्लिम समाजाचा वापर केला. भारतीय संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा हक्क दिला असून आगामी निवडणुकीत आपल्यालाच मत देण्याचे आवादन सुंडके यांनी केले आहे.
पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर, वंचिततर्फे वसंत मोरे, आणि एमआयएमकडून अनिस सुंडके मैदानात आहेत,