"बहिणीने जास्त दिवस भावाच्या घरी राहू नये!"

महादेव जानकरांचा सुप्रियाताईंना खोचक टोला

    04-May-2024
Total Views | 319
 
Supriya Sule
 
पुणे : लग्न झाल्यावर बहिणीने जास्त दिवस भावाच्या घरी राहू नये, असा खोटक टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंना लगावला आहे. ते सध्या महायूतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर आहेत.
 
शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना महादेव जानकर म्हणाले की, "बहिणीने लग्न झाल्यानंतर भावाच्या घरी जास्त दिवस राहू नये. त्यांनी त्यांच्या घरी जावं, अशी माझी सुप्रियाताईंना विनंती आहे," असा खोचक टोला त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावला. महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील परभणी लोकसभेची निवडणूक लढवली आहे.
 
हे वाचलंत का? -  नसीम खान काँग्रेसचा प्रचार करणार? पक्षश्रेष्ठींकडून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
 
ते पुढे म्हणाले की, "ज्यावेळी मी मंत्री होतो त्यावेळी आदिवासींच्या २२ योजना सुरु केल्या. काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी काहीही केलेलं नाही. त्या २२ योजनांना उद्धव ठाकरेंच्या सरकारने एकही रुपयाचं बजेट दिलं नाही. उद्या मी केंद्रात खासदार होणार आहे. त्यावेळी केंद्रातसुद्धा या योजना लागू करण्याची मोदी साहेबांना विनंती करणार. शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेऊन ज्यांनी ४० वर्ष राज्यकारभार केला त्यांनी धनगर समाजाला वंचित का ठेवलं?," असा सवालही त्यांनी केला. 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121