ठाकरेंना पैशाचा मोह! शिवसेनेच्या खात्यातून जनतेचे ५० कोटी रुपये काढले

    04-May-2024
Total Views | 114

Uddhav Thackeray  
 
मुंबई : उद्धव ठाकरेंना खुर्चीसोबतच पैशाचाही मोह असून त्यांनी शिवसेनेच्या खात्यातून जनतेचे ५० कोटी रुपये काढले आहेत, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आमच्यासोबत बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण आहे. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार, आचार आणि भूमिका सोडली त्यांची शिवसेना खरी शिवसेना होऊ शकत नाही. त्यांना शिवसेना आणि बाळासाहेब नको आहेत. त्यांना फक्त आणि फक्त पैसे हवे आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या खात्यातील शिवसैनिकांचे ५० कोटी रुपयेदेखील काढून घेतले आहेत. हा त्यांचा खुर्चीसाठी असलेला मोह आता पैशासाठी असल्याचे दिसून येत आहे," अशी टीका त्यांनी केली.
 
हे वाचलंत का? -  काँग्रेसला १२ आणि आम्हाला ९ जागा मिळतील : शरद पवार
 
"आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कुणी मोठा नाही आणि कुणी छोटा नाही. कुणी मालक नाही आणि कुणी नोकर नाही. परंतू, तिकडे (उबाठा) मालक नोकराप्रमाणे वागवत होते. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. पण आता सहकाऱ्यांना घरगडी समजलं जातं. लोकांना केवळ मानसन्मान हवा असतो बाकी काहीच अपेक्षा नसते."
 
ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीमध्ये आणि उबाठा गटामध्ये सावळा गोंधळ आहे. एका उमेदवाराला उमेदवारी दिल्यावर त्याचा प्रचार सुरु होतो. पण त्यानंतर दुसऱ्या उमेदवारालाही एबी फॉर्म दिला जातो. यावरुन पक्षात असलेलल्या गोंधळाच्या आणि संभ्रमाच्या परिस्थितीमुळे त्यांना जिंकण्याचा विश्वास नाही. श्रीकांत शिंदेंनी गेली १० वर्षे कल्याण लोकसभेत केलेली कामं लोकांच्या समोर आहेत. त्यामुळे आमच्याकडे जिंकण्याचा विश्वास आहे. यावरुन लोकांनी खासदार श्रीकांत शिंदेंची हॅट्रिक करायचं ठरवलं आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121