“माझा वाढदिवस ३ मे नाही तर यादिवशी...”, अजिंक्य देव यांनीच केला खुलासा

Total Views |
अभिनेते-निर्माते अजिंक्य देव लवककरच नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात महत्वपुर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
 

ajinkya deo  
 
रसिका शिंदे-पॉल
 
 
मुंबई : अभिनेते अजिंक्य रमेश देव यांना ३ मे रोजी सगळ्यांनी वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या खऱ्या. पण तुम्हाला माहित आहे का नेमकी त्यांचा वाढदिवस कधी असतो? तर स्वत: अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी त्यांच्या वाढदिवसाची गंमत ‘महाएमटीबी’च्या ‘Unfiltered गप्पा With कलाकार या पॉडकास्ट मध्ये सांगितली. अभिनेते सदाशिव अमरापुरकर यांचा एक शब्द मुलाखत देताना इकडचा तिकडे झाला आणि अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांचा वाढदिवस ३ मे रोजी आहे असं सगळीकडे पसरलं. काय आहे हा किस्सा जाणून घेऊयात...
 
अजिंक्य देव म्हणाले की, “एका चित्रपटात मी आणि सदाशिव अमरापुरकर एकत्र काम करत होतो. त्यावेळी त्यांची मुलाखत घेण्यासाठी कुणीतरी आलं होतं. त्यावेळी बोलताना त्यांनी आर्य देव ऐवजी अजिंक्य देवचा वाढदिवस असं म्हटलं आणि सगळीकडे बातम्या छापून आल्या की माझा वाढदिवस ३ मे रोजी आहे. पण खरं सांगू तर ३ मे रोजी माझा मुलगा आर्य देव याचा वाढदिवस असतो. आणि माझा खरा वाढदिवस हा १७ जानेवारी रोजी असतो. त्यामुळे मी वर्षातून दोनदा लोकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा घेतो असे गमतीत अजिंक्य देव म्हणाले.
 
पुढे ते असं देखील म्हणाले की, “बऱ्याच कलाकार मंडळींना माझा खरा वाढदिवस कधी असतो ते माहित आहे. पण नकळतपणे ३ मे रोजी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्याकडूनही दिल्या जातात. शिवाय इंटरनेटवरही मी ती चूक सुधारण्याचा प्रयत्न केला पण अजूनही माझा वाढदिवस ३ मे आहे असेच दाखवले जाते”.

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.