शेअर बाजार विश्लेषण: एक्झिट पोलपूर्वी आठवड्याची अखेर शेअर बाजारवाढीने ! सेन्सेक्स ७५.७१ व निफ्टी ४२.०५ अंशाने वाढला

बँक,मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ तर आयटी, मिडिया समभागात घसरण

    31-May-2024
Total Views | 46

Stock Market
 
मोहित सोमण: आज आठवड्याची अखेर चांगली झाली असं म्हणता येईल. सलग चार दिवसांच्या पडझडीनंतर बाजारातील डोलारा पुन्हा एकदा सांभाळला गेला आहे. निकालपूर्व काळातील वाढीमध्ये अनेक गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला असला तरी चढउताराचे आव्हान कायम राहिले आहे. सेन्सेक्स निर्देशांक आज ७५.७१ अंशाने वाढत ७३९५१.३१ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ४२.०५ अंशाने वाढत २२५३०.७० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात सकाळी घसरण झाली असताना सत्र अखेरीस सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही बँक निर्देशांकात वाढ झाली आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांक २७३.११ अंशाने वाढत ५५८७६.९६ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३५९.१० अंशाने वाढत ४८०४१.४५ पातळीवर पोहोचला आहे. दोन्ही बँक निर्देशांकात अनुक्रमे ०.४९ व ०.७४ टक्क्यांनी वाढ झाल्याने बाजारात रॅली होण्यास एकप्रकारे मदत मिळाली आहे.आज बीएसई (BSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१२ व ०.८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसई (NSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४४ व ०.५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात सकाळप्रमाणेच संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. सर्वाधिक वाढ बँक (०.६२%),फायनां शियल सर्विसेस (०.५६%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.५७%), मेटल (१.८७%),पीएसयु बँक (१.२८%) समभागात वाढ झाली आहे तर सर्वाधिक नुकसान आयटी (१.८७%), मिडिया (१.३९%), फार्मा (०.९२%) मिडस्मॉल हेल्थकेअर (०.७०%) सम भागात झाले आहे.
 
आज बीएसईत एकूण ३९१५ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १८४५ समभागात वाढ झाली असून १८४५ समभागात घसरण झाली आहे. त्यातील १३१ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ७९ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण २६३ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर २८३ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
एनएसईत आज एकूण २७२९ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १२८१ समभागात वाढ झाली असून १३२४ समभागात घसरण झाली आहे. ५४ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ६१ समभागांच्या मूल्यांक नात ५२ आठवड्यातील सर्वाधिक नुकसान झाले आहे. एकूण ९४ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १०१ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
आज बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४१२.५५ लाख कोटी रुपये होते तर एनएसईतील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४०६.३९ लाख कोटी रुपये होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाल्याने रुपया ८५.२० प्रति डॉलर पोहोचला आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या दरात संध्याकाळपर्यंत किरकोळ वाढ झाली होती. तसेच भारतातील सोन्याच्या दरात बदल झालेला नाही. यापूर्वी सोन्याच्या किंमतीत किरकोळ घसरण झाली होती. अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील आगामी निर्णयावर अमेरिकन महागाई दराचे मळभ उभे राहिल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या निर्देशांकात किंचित वाढ झाली तरी संध्याकाळपर्यंत सोन्याची ' जैसे थे ' होती.
अमेरिकन बाजारात युएस गोल्ड स्पॉट दर निर्देशांकात ०.०२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.०८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. भारतातील एमसीएक्स निर्देशांकात ०.१५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. भारतातील प्रति १० ग्रॅम सोने दर ७२७६० पातळीवर स्थिरावले आहेत.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रूड (कच्च्या) तेलाच्या मागणीत घट व पुरवठ्यात वाढ झाल्याने बाजारात पुरेसा साठा उपलब्ध आहे. आगामी ओपेक राष्ट्रांच्या बैठकीत तेल उत्पादनातील कपातीची संख्या जाहीर केली जाऊ शकते ज्यामुळे 'बुलिश ' वातावरण असताना देखील आज किंमतीत कपात झाली आहे. मध्यपूर्वेतील हमास इस्त्राईल दबाव कायम असताना रेड सी प्रकरण पुन्हा उफाळून आल्याने आगामी काळात आणखी दरवाढ तीव्रतेची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात इतक्यात कपात होण्याची चिन्हे नसल्याचे विधान फेडरल रिझर्व्हकडून करण्यात आल्याने तत्काळ कमी वेळासाठी का होईना तेलातील किंमतीत घसरण झाली आहे. यावरून बाजारात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
 
WTI Future क्रूड निर्देशांकात ०.०१ टक्क्यांनी घसरण व Brent क्रूड निर्देशांकात ०.११ टक्क्यांनी वाढ संध्याकाळपर्यंत झालेली आहे. एमसीएक्सवरील क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.२९ टक्क्यांनी वाढ झाली असून तेलाची पातळी ६५०७.०० रुपये प्रति बॅरेलवर पोहोचली आहे.
 
आज बीएसईत टाटा स्टील, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक,पॉवर ग्रीड, इंडसइंड बँक, लार्सन, आयटीसी, एसबीआय, एम अँड एम,आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, सनफार्मा, विप्रो या समभागात वाढ झाली आहे तर नेस्ले,टीसीएस, मारूती सुझुकी, इन्फोसिस, एक्सिस बँक, एचयुएल, कोटक महिंद्रा, टेक महिंद्रा,टायटन कंपनी, भारती एअरटेल, एशियन पेंटस, टाटा मोटर्स समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत अदानी एंटरप्राईज,अदानी पोर्टस, श्रीराम फायनान्स, कोल इंडिया, टाटा स्टील, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक,पॉवर ग्रीड, इंडसइंड बँक, लार्सन, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, बजाज फिनसर्व्ह,विप्रो, सनफार्मा या समभागात वाढ झाली आहे तर नेस्ले, टीसीएस, मारूती सुझुकी, भारती एअरटेल, इन्फोसिस, डिवीज, ग्रासीम, टेक महिंद्रा, ओएनजीसी, आयशर मोटर्स, हिंदाल्को, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, कोटक महिंद्रा, सिप्ला, हिरो मोटोकॉर्प, एशियन पेंटस, एनटीपीसी, एचडीएफसी लाईफ, डॉ रेड्डीज, टाटा मोटर्स या समभागात घसरण झाली आहे.
 
आज बाजारातील परदेशी गुंतवणूकदारांच्या अस्थिरतेचे सावट कायम असताना भारतीय गुंतवणूकदारांनी अखेरच्या सत्रात
'बुलिश' वातावरण कायम राहत बाजारात वाढ झाली आहे. आजही वीआयएक्स निर्णायक स्थितीत राहिला आहे.सकाळच्या सत्रात वीआयएक्स (VIX) Volatility Index २४ वरील पातळीवर कायम राहिला होता. सत्र सुरू झाल्यावर ५.३८ टक्क्यांपर्यंत निर्देशांक राहून खालच्या बाजूला २२.८७ पातळीवर पोहोचला होता तर अखेरच्या सत्रात १.७४ टक्क्यांवर पोहोचत वरच्या बाजूला २४.६० पातळीवर वीआयएक्स पोहोचला होता.
 
युएस ट्रेझरीत (कोषात) युएस अर्थव्यवस्थेबाबत अपेक्षित वाढ न झाल्याने घसरण झाली होती. आता गुंतवणूक युएस मधील पर्सनल कंझमशन एक्स्पेंडिचर (PCE) आकडेवारीची प्रतिक्षा करत आहे. मात्र ते अजून समोर आल्याने आशियाई बाजारात त्याचा परिणाम जाणवला नाही. किंबहुना फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची लवकर शक्यता नसल्याचे फेडने म्हटल्यावर त्यावर बाजारात संमिश्र प्रतिसाद येत आहेत. आगामी काळात युरोप व युएस बाजारातील व्याजदरात कपात होईल का या शक्यतेवर भाकीत सुरू झाल्याने बाजारात साधारण वाढ झाली आहे. तसेच मध्यपूर्वेतील दबाव कायम असल्याने क्रूड तेलाच्या किंमतीत चढ उतार सुरू असल्याने त्याचा परिणाम अमेरिकन डॉलरवर होत आहे.
 
दुसरीकडे बाजारातील आगामी निवडणूक निकालावर अनेक तज्ञांनी भाजपा परत सत्तेत येणार असे निश्चितपणे सांगितले असले तरी निकाल जाहीर होईपर्यंत अस्थिरतेवर बाजार वीआयएक्स मार्फत मार्गक्रमण करत आहे. जून १ ला अखेर मतदान फेरी असल्यामुळे शेअर बाजारात तोपर्यंत मोठी चढ उतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार निकालानंतर परतण्याची शक्यता असली तरी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतल्याने बाजारात अस्वस्थता टिकून राहिली आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च ऋषिकेश येडवे म्हणाले,'देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक, निफ्टीने दिवसभरात एक रोलरकोस्टर राईड अनुभवली आणि जूनच्या पहिल्या दिवसाची मुदत २२५३१ स्तरांवर सकारात्मक नोंदीवर स्थिरावली. तांत्रिकदृष्ट्या, दैनंदिन प्रमाणात निर्देशांकाने होमिंग पिजन कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे, पुढे लोकसभा निवडणुकीसाठी एक्झिट पोल 50-DEMA (डेज एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज) २२३९० च्या जवळपास ठेवण्यात आले आहेत, आणि २२३९० आणि २२००० हे अल्प-मुदतीचे समर्थन बिंदू म्हणून काम करतील. निर्देशांक, तर २२८०० आणि २३११० अल्पावधीत महत्त्वपूर्ण अडथळे म्हणून काम करतील.'
 
बँक निफ्टी निर्देशांक सकारात्मक नोटेवर उघडला आणि दिवसभर व्याज खरेदीचा साक्षीदार झाला, शेवटी दिवस सकारात्मक नोटवर 48,984 वर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाने गुरुवारी एक छेदन रेषेची मेणबत्ती तयार केली आहे, जी शक्ती सूचित करते. जर निर्देशांक 49,050 च्या वर टिकून राहिल्यास बँक निफ्टी 49,690 आणि 50,000 च्या पातळीवर वाढू शकेल."
 
बाजारातील परिस्थितीविषयी व्यक्त होताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' निवडणुकीच्या निकालाची भीती आणि जगभरातील प्रतिकूल भावना यामुळे देशांतर्गत बाजारात पाच दिवसांची घसरण झाली आहे. गुंतवणूक दार बाजारात आशावादी होते कारण त्यांना विश्वास होता की एनडीए पुन्हा सत्ता मिळवेल. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या बेंचमार्क मध्ये ४ जून, निवडणूक निकालाच्या दिवशी लक्षणीय चढ-उतार होऊ शकतात, उच्च आणि तोटा दोन्ही अपेक्षित आहेत.
 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आपल्या वार्षिक अहवालात FY25 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७% ने वाढेल असा अंदाज वर्तवला आहे. २०२३-२४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था मजबूत दराने वाढली, मध्यवर्ती बँकेनुसार, वास्तविक जीडीपी वाढ मागील वर्षीच्या ७ टक्क्यांवरून ७.६ टक्क्यांवर गेली, सलग तिसऱ्या वर्षी 7 टक्के किंवा त्याहून अधिक वाढ झाली.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, 'निवडणूकपूर्व व्यापार धोरण संपुष्टात आले आहे, आणि पुढील कारवाईसाठी सर्वांचे लक्ष एक्झिट पोलच्या प्रकाशनाकडे असेल. प्रादेशिक वळण, किरकोळ कमी मतदान आणि सध्याच्या श्रेणीतील तीव्र प्रतिकार यामुळे गुंतवणूकदारांना सावध भूमिका घेण्यास प्रवृत्त होत आहे.ते त्यांच्या गुंतवणूकीचे संरेखन मूलभूतपणे मजबूत क्षेत्रे आणि स्टॉक्सच्या दिशेने करत आहेत जेणेकरुन बाजारातील कोणत्याही आकस्मिक प्रतिक्रियांपासून बचाव करण्यासाठी, यूएस कडून चलनवाढीचा डेटा जारी केला जातो, नजीकच्या काळात जो जागतिक बाजारातील भावनांवर परिणाम करू शकतो. '
 
रुपयातील घसरणीवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, 'रुपया ०.११ रुपयांनी कमजोर होऊन ८३.४३ वर बंद झाला. ५ जून २४ मंगळवार रोजी सार्वत्रिक निवडणुकीच्या घोषणेच्या महत्त्वपूर्ण स्थानिक कार्यक्रमासह, RBI च्या प्रयत्नांमुळे रुपयाची अस्थिरता श्रेणीबद्ध आणि स्थिर राहिली आहे. सट्टेबाजीच्या अनुपस्थिती मुळे रुपयाचे व्यवहार ८३.००-८३.५५ च्या विस्तृत श्रेणीत ठेवले आहेत.'
 
तरी अखेरच्या मतदान फेरीपूर्वी व एक्सिट पोलपूर्वी बाजारात वाढ झाली असून आगामी काळात गुंतवणूकदारांचे लक्ष युएस बाजारातील घटनांवर व भारतीय निवडणूक निकालाकडे लागले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र

पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र

मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121