"पब्लिसिटी हेच आव्हाडांचं अंतिम ध्येय!"

प्रविण दरेकरांचा घणाघात

    31-May-2024
Total Views | 40


Jitendra Awhad 
 
मुंबई : पब्लिसिटी हेच जितेंद्र आव्हाडांचं अंतिम ध्येय आहे, असा घणाघात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. महाड येथे मनुस्मृतीला विरोध करताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता. यावरून आता प्रविण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "जितेंद्र आव्हाडांची नौटंकी राज्यातील जनतेच्या समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनुस्मृतीसंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. मनुस्मृतीचा असा कोणत्याही प्रकारचा समावेश केला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. परंतू, केवळ राजकीय नौटंकी करायची. जितेंद्र आव्हाड यांनी समाजातील लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या विषयाचा मी मोठा काही वाली आहे अशा प्रकारचे ढोंग मनुस्मृतीच्या निमित्ताने घेतले होते. त्यांची पोलखोल झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपने उत्स्फूर्तपणे आंदोलन केले आहे. राज्यातील जनतेने जितेंद्र आव्हाडांचा बुरखा टराटरा फाडला आहे. जितेंद्र आव्हाड हे भंपकपणाचे दुसरे नाव आहे. पब्लिसिटी हेच त्यांचे अंतिम ध्येय्य आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  मंत्री लोढा वाराणसी दौऱ्यावर! 'एक भारत-श्रेष्ठ भारत' कार्यक्रमात मोदींना निवडून देण्याचे आवाहन
 
ते पुढे म्हणाले की, "जागावाटपाचे अंतिम स्वरूप ठरायचे आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार उभा करत असतो. जसा लोकसभेला एकोप्याने, समन्वयातून मार्ग काढला तशाच पद्धतीचा विधानपरिषदेलाही महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची चर्चा होऊन मार्ग निघेल. विधानपरिषदेवरून आमच्यात कुठल्याही प्रकारचे वितुष्ट होईल असे वाटत नाही."
 
तसेच यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवारांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "गेला आठवडाभर विजय वडेट्टीवार कुठल्या बिळात लपले होते त्याचा शोध घ्या. महाराष्ट्रात एवढे विषय धगधगत आहेत आणि विरोधी पक्षनेत्याचे अस्तित्वच दिसत नाही. त्यांचे अस्तित्व शून्य आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121