उद्योजिका प्रिया अग्रवाल यांना लंडनमध्ये वंशवादाचा करावा लागला सामना म्हणाल्या ' लंडनमध्ये..

एका मुलाखतीत अग्रवाल यांनी सांगितला आपला अनुभव

    31-May-2024
Total Views | 59

Priya Agarwal
 
 
मुंबई: वेगवेगळ्या कारणांनी वेंदाता समुहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल चर्चेत असतात आता त्यांच्या मुलीच्या विधानाने नवीन चर्चा सुरू झाली आहे. एका मुलाखतीत अग्रवाल यांनी कन्या प्रिया अग्रवालने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत 'लंडनमध्ये मी वंशवादाची व गुंडगिरीची शिकार झाली असताना असे शाळेत बरे वाईट अनुभव आले.' असे धक्कादायक विधान प्रिया अग्रवालने केले आहे. या मुलाखतीत तिने आपला प्रवास विस्तृतपणे सांगितला होता.
 
यामध्ये तिने म्हटले 'सात आठ वर्षांची असताना माझे पालक लंडनमध्ये स्थायिक झाले. त्यानंतर माझी रवानगी बोर्डिंग स्कूलमध्ये झाली. सुरूवातीला माझ्या शेजारी कोणी बसायला तयार होत नसे. काही मुली माझ्याकडे बघून हसत असतं. त्या कठीण काळातून मी गेले आहे.' असे तिने या मुलाखतीत म्हटले आहे.
 
अशा कठीण परिस्थितीत वडील अनिल अग्रवाल यांनी आम्हाला धीर देत महत्वाचा सल्ला दिल्याचे प्रिया अग्रवाल म्हणाल्या आहेत. ' नेहमी कठीण काळात आपला कंफर्टे' शोधावा. नवीन देशात जर लोकांना मी सर्वसाधारण वाटणे आवश्यक असल्यास इतरांहून २५ टक्के अधिक सकारात्मक राहणे महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले असल्याचे प्रिया अग्रवाल म्हणाल्या.
 
यानंतर प्रिया अग्रवाल यांनी मार्गक्रमण करत आलेल्या कठीण परिस्थितीचा नेटाने प्रतिकार केला.पुरूष प्रधान संस्कृतीत तिने वाटचाल केल्याचे या मुलाखतीत म्हटले आहे.“अस्वस्थतेमध्ये सांत्वन मिळवणे ही एक गोष्ट आहे जी मी घेतली आहे, आणि मी अवलंब केली आहे, आणि तेच मला खाणकाम सारख्या पुरुषप्रधान उद्योगात करायचे आहे. महिलांनी वर्चस्व गाजवावे अशी माझी इच्छा आहे,” अशी तिने पुष्टी मुलाखतीत केली आहे.
 
प्रिया अग्रवाल यांचे वडील अनिल अग्रवाल हे नावाजलेल्या वेदांता समुहाचे अध्यक्ष आहेत. फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार, अग्रवाल यांची संपत्ती २.१ अब्ज डॉलर्स होती. प्रिया अग्रवाल या देखील वेदांता समुहाच्या गैर कार्यकारी संचालक आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121