
मुंबई: जिओ फायनाशिंयल कंपनीने वन क्लिक ॲप बाजारात लाँच केले आहे. डिजिटल खाते उघडण्यापासून बँक मॅनेजमेंट सुविधांसाठी जिओ फायनांशियल सर्विसेसने 'जिओ फायनान्स' (Jio Finance) नावाचे ॲप काढले आहे.गुगल अमेझॉनला टक्कर देण्यासाठी कंपनीने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. युपीआय, डिजिटल पेमेंट सेनेसह इतर सुविधांचा समावेश या ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे.जिओ फायनांशियल सर्विसेसचे आपल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, युपीआय व्यवहार, बिल सेटलमेंट, विमा अँडव्हायजरी, एकत्रित बचत व इतर खाते सुविधा अशा सगळ्या सेवेसाठी युजर फ्रेंडली अँप बाजारात आणले गेले आहे ' असे म्हटले गेले.
भविष्यात याहून अधिक आर्थिक सुविधा या ॲपमध्ये आगामी काळात मिळणार आहेत. भविष्यात म्युच्युअल फंडवर कर्ज, गृह कर्ज, इतर कर्ज व ग्राहकांच्या इतर आर्थिक गरजेसाठी या सुविधा कंपनीकडून मिळणार आहेत. संपूर्ण डिजिटल सेवा सुरळीतपणे देण्यासाठी कंपनीने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये 'जिओ पेमेंट बँक अकाऊंट' हे फिचर देखील ग्राहकांना मिळणार आहे. सध्या कंपनीकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, हे बेटा आवृत्तीचे ॲप असणार आहे.
याविषयी बोलताना,'ग्राहकांचे समाधान सुनिश्चित करण्यासाठी,'JioFinance' बीटामध्ये लॉन्च होईल, वापरकर्त्याच्या इनपुटला शुद्धीकरणासाठी आमंत्रित करेल.आमचे अंतिम उद्दिष्ट कर्ज, गुंतवणूक, विमा, देयके आणि व्यवहार यांसारख्या ऑफरच्या सर्वसमावेशक संचसह, सर्व डेमोग्राफिक मधील कोणत्याही वापरकर्त्यासाठी एकाच प्लॅटफॉर्मवर वित्त संबंधित सर्व गोष्टी सुलभ करणे आणि वित्तीय सेवा अधिक पारदर्शक, परवडणारे आणि अंतर्ज्ञानी बनवणे हे आहे.' कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड समुहाने आर्थिक सेवा पुरवण्यासाठी जिओ फायनांशियल सर्विसची स्थापना केली होती. गुंतवणूक, कर्ज पुरवठा, पेमेंट बँक, पेमेंट एग्रिगेटर, गेटवे सेवा अशा सेवा पुरवण्यासाठी या व्यासपीठाचे अनावरण करण्यात आले होते. कंपनीमध्ये ४९ टक्क्यांपर्यंत परदेशी गुंतवणूक (FDI) आणण्यासाठी कंपनी भागभांडवलधारकाचा पाठिंबा अपेक्षित करत आहे. यावर आगामी काळात निर्णय होऊ शकतो. कंपनी आरबीआयच्या अंतर्गत विना बँकिग वित्तीय संस्था (NBFC) म्हणून नोंदणीकृत आहे.