शेअर बाजार विश्लेषण: सलग चौथ्यांदा घसरण, बाजारातील अनिश्चितता कायम सेन्सेक्स ६१७.३० व निफ्टी २१६.०५ अंशाने घसरला

बँक निर्देशांक वगळता मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण कायम ! मिडिया, प्रायव्हेट बँक समभागात वाढ

    30-May-2024
Total Views | 50

Stock Market
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. सकाळची घसरण अखेरच्या सत्रात कायम राहिली आहे. सेन्सेक्स निर्देशांक ६१७.३० अंशाने घसरत ७३८८५.६० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक २१६.०५ अंशाने घसरत २२४८८.६५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात सकाळ प्रमाणेच वाढ कायम राहिली असल्याने आणखी होणार असलेली घसरण मर्यादित पातळीवर राहिली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २९२.८७ अंशाने वाढत ५५६०३.८५ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांकात १८१.०० अंशाने घसरत ४८६८२.३५ पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे अनुक्रमे १.२१ व स्मॉलकॅपमध्ये १.३३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.३४ व १.६२ टक्क्यांनी घसरण झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात मिडिया (०.४८%), बँक (०.३७%), प्रायव्हेट बँक (०.३२%) समभागात वाढ झाली असून इतर सर्व समभागात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण आयटी (२.१९%), मेटल (३.०१%), फार्मा (१.८१%), हेल्थकेअर (१.८५%), एफएमसीजी (१.२६%) समभागात घसरण झाली आहे.
 
बीएसईत आज एकूण ३९१७ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील ११९० समभागात वाढ झाली आहे तर २६२२ समभागात घसरण झाली आहे. त्यातील एकूण १२६ समभागातील मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ५५ समभागातील मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण ५ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर लोअर सर्किटवर कुठलेही समभाग राहिले नाहीत.
 
एनएसईत एकूण २६९७ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील ७०३ समभाग वधारले असून १८९६ समभाग घसरले आहेत तर ५७ समभागांच्या मूल्यांकनात ५७ समभागात ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक वाढ झाली आहे तर ४७ समभागात ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक घसरण झाली आहे.८५ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ११० समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
बीएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४१०.३६ लाख कोटी रुपये होते. तर एनएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल ४०६.३९ लाख कोटी रुपये होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत रुपयाची घसरण झाल्याने प्रति डॉलर किंमत ८३.४२ रुपयांवर स्थिरावली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या मागणीत घट झाल्याने बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट दरात ०.०२ टक्क्यांनी घसरण झाली आहे तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.१९ टक्क्यां नी घसरण झाली आहे. भारतातील एमसीएक्स सोन्याच्या निर्देशांकात ०.२९ टक्क्यांनी घसरून ७२०६०.०० पातळीवर पोहोचला आहे.
 
'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतातील सोन्याच्या २२,व २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ४०० ते ४४० रुपयांनी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ७२७६० रुपयांवर पोहोचले आहे.ओपेक राष्ट्रांच्या बैठकीपूर्वी बाजारात काल क्रूड (कच्च्या) तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली होती. विशेषतः २ जूनला ओपेक राष्ट्रांच्या बैठकीपूर्वी कच्च्या तेलाच्या उत्पादन कपातीची निश्चिती करण्यात येणार असल्याने आणखी तेल महागू शकते. मात्र सध्या पुरवठ्याच्या मानाने मागणीत घट झाल्याने संध्याकाळपर्यंत क्रूड तेलाच्या निर्देशांकात किंचित घसरण झाली आहे. संध्याकाळी WTI Future क्रूड निर्देशांकात ०.०५ टक्क्यांनी घसरण झाली आहे तर Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.१७ टक्क्यांनी घसरण झाली.भारतातील एमसीएक्स क्रूड निर्देशांकात ०.२७ टक्क्यांनी घसरण होत तेल ६६०६.०० रुपये प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
 
आज भारतातील 'बुलिश' पर्व येऊ शकते असे वाटत असताना सलग चौथ्यांदा बाजारात घसरण झाली आहे. मुख्यतः बँक निर्देशांकाचा अपवाद वगळता बाजारातील लार्जकॅप, मिडकॅप , स्मॉलकॅपमध्ये घसरण झाल्याने बाजारात रॅली न होता मोठी घसरण झाली केवळ बँक निर्देशांकाचा आधार झाल्याने १००० अंशांची पातळी बाजाराने ओलांडली नाही.बँक निर्देशांक वाढल्याने त्याच्या आधार बाजाराला मिळाला असल्याने संपूर्ण घसरण झाली नाही. बाजारातील 'कंसोलिडेशन ' कायम असून आज गुंतवणूकदारांनी नफा बूकिंग केल्याची शक्यता आहे. दुसरीकडे बाजारातील आगामी युएस जीडीपी, पीसीई आकडेवारी येणार असल्याने त्याचा परिणाम बाजारात झाल्याची शक्यता आहे. तज्ञांनी जीडीपी, तसेच पर्सनल कंझमशन एक्स्पेंडिचर
आकडेवारीत अपेक्षित आकडे येण्याची शक्यता नसल्याने बाजारातील महागाईचा स्तर कायम राहण्याची चिन्हे होती.अखेरीस युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता जून जुलैमध्ये शक्य नसल्याने बाजारात अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे.परिणामी आशियाई शेअर बाजारात त्याचा परिणाम झाला .
 
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा विचार करता बाजारातील क्रूड तेलाचे दर महाग होत असल्याने शेअर बाजारात त्याचा परिणाम झाला आहे. भारतातील निवडणूक निकाल लागेपर्यंत असाच चढउतार राहणे अपेक्षित असल्याने बाजारात त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसली. यामुळेच बाजारातील वीआयएक्स (VIX) Volatility Index हा ११.३० टक्क्यांवर पोहोचला असल्याने बाजारातील चढउताराची स्फोटक स्थिती कायम राहिली आहे.
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च निरज शर्मा म्हणाले, ' बिअर्सने दिवसभर दलाल स्ट्रीटवर राज्य केले, खराब जागतिक संकेतांमुळे मदत झाली आणि निफ्टीने २२४८९ स्तरांवर दिवस संपवला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाने शीर्षस्थानी गडद ढग कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्नची निर्मिती आणि २२५६० जवळ २१-DEMA समर्थन पातळीचे उल्लंघन करून लक्षणीय नफा बुकिंग अनुभवले आहे. तथापि, निर्देशांकाला ५०DEMA(२२३८६) वर आधार मिळाला आणि फिनिशच्या दिशेने पुलबॅक झाला. अशाप्रकारे २२४०० -२२३८० निर्देशांकासाठी तात्काळ समर्थन क्षेत्र म्हणून काम करतील, त्यानंतर २२००० तर २२८०० आणि २३११० हे अल्पावधीत महत्त्वपूर्ण अडथळे म्हणून काम करतील.
 
बँक निफ्टी निर्देशांक नकारात्मक नोटेवर उघडला परंतु त्यानंतर मजबूत रिकव्हरी दिसून आली, शेवटी दिवस ४८६८२ वर सकारात्मक नोटवर स्थिरावला. आम्ही नमूद केल्याप्रमाणे, निर्देशांकाने ४८००० स्तरांवर समर्थनाचे रक्षण केले आणि पुनर्प्राप्ती पाहिली. तांत्रिकदृष्ट्या, बँक निफ्टीने ४८४०३ वर २१ DEMA च्या समर्थनाचा बचाव केला आहे आणि त्याला ४९००० -४९०५० स्तरांजवळ प्रतिकार आढळला आहे. जर निर्देशांक ४९०५० च्या वर टिकला तर रॅली ४९९६० आणि ५०००० च्या पातळीवर वाढू शकते.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, '४ जून रोजी जाहीर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालापूर्वी, विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) आणि वैयक्तिक व्यापारी निर्देशांक फ्युचर्सवर निव्वळ लांब आहेत. त्यात एनडीएला यश मिळण्याची दाट शक्यता असल्याचे दिसून येते. याव्यतिरिक्त, सध्याच्या बाजारात नफा बुकिंग दिसून येते कारण गुंतवणूकदार या उच्च अस्थिर बाजारपेठेत अनपेक्षित नुकसानापासून स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात.
 
एलआयसी, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफसह विमा समभागांमध्ये आज मोठी घसरण झाली. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अँड अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) मार्चच्या प्रस्तावावर पुनर्विचार करून विमा पॉलिसींचे सरेंडर मूल्य वाढवू शकते असे सूचित करणाऱ्या अहवालांमुळे हे घडले. एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स बीएसईवर १७% घसरून ६४ रुपयांच्या नीचांकी पातळीवर आले.
 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कंपनीला आर्थिक मालमत्ता संपादन करणे थांबवण्याचे निर्देश दिल्यानंतर Edelweiss Financial Services ला भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यवसायाच्या नियमित कोर्समध्ये घाऊक एक्सपोजरशी संबंधित (खाते परतफेड किंवा बंद करण्यापासून इतर) कोणत्याही संरचित व्यवहारांपासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई पर्यवेक्षी परीक्षांदरम्यान आढळलेल्या महत्त्वपूर्ण समस्यांवर आधारित आहे. या समस्या प्रामुख्याने समूह संस्थांच्या समन्वयित कृतींमधून उद्भवतात, ज्यामध्ये सदाबहार तणावग्रस्त ECL एक्सपोजरपर्यंत अनेक संरचित व्यवहारांमध्ये गुंतलेले होते.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी व्यक्त होताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, 'जाग तिक चलनवाढीच्या चिकटपणामुळे, केंद्रीय बँकेच्या व्याजदर कपातीच्या धोरणाला विलंब केल्यामुळे ट्रेझरी उत्पन्न वाढत असल्याने बेंचमार्क निर्देशांक अमेरिकन बाजाराकडून संकेत घेत आहेत. दरम्यान, व्यापक बाजाराने कमकुवत कल चालू ठेवला,नफा बुकिंगमुळे, यामुळे एक्झिट पोल वीकेंडला येणार असल्याने अल्पकालीन पदांवर स्वारस्य नसल्यामुळे मासिक मुदत संपुष्टात येत आहे.'
 
रुपयांच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले,' जागतिक बाजारातील चढ-उतारामुळे रुपया ०.०८ रुपयांनी वाढला,८३.३१ वर बंद झाला. आगामी निवडणूक निकालांचा अंदाज न आल्या ने भारतीय बाजारांनीही लक्षणीय अस्थिरता दर्शविली. रुपया ८३.०० आणि ८३.४५ च्या दरम्यान आहे कारण आरबीआयने महत्त्वाच्या घटकांकडे लक्ष दिले आहे. महत्त्वाच्या निवडणुकीच्या निकालामुळे, रुपयाला श्रेणीबद्ध अस्थिरता येत राहण्याची अपेक्षा आहे.'
 
सोन्याच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना जेएम फायनांशियल सर्विसेसचे ईबीजी कमोडिटी रिसर्च प्रणव मेर म्हणाले,
'कमोडिटीजचा गठ्ठा संपूर्णपणे नकारात्मक प्रदेशात व्यापार करत आहे, ज्याचे वजन मजबूत यूएस डॉलर आहे कारण व्यापारी यूएस जीडीपी डेटाच्या पुढे हलक्या स्थितीत राहणे पसंत करतात आणि उद्या युरो झोन आणि यूएस मधील चलनवाढ संख्या, ज्यामुळे काही संकेत मिळू शकतात. संबंधित मध्यवर्ती बँकांच्या वेळेनुसार दर कपातीवर. बाजार पुढील महिन्यात युरोपियन सेंट्रल बँकेकडून दरानुसार किंमत ठरवत आहे, तर यूएस फेडने दर कपातीला विलंब करणे अपेक्षित आहे.
 
तांत्रिकदृष्ट्या,गोल्ड ऑगस्ट फ्युचर्स बायस ७१७००/ पुढे ७१५०० पर्यंत सकारात्मक राहील,७१३००/७१५५०पर्यंत वरची रिकव्हरी अपेक्षित आहे.तत्सम, समर्थन ९३२०० वर चांदीचे होल्ड आहे, जोपर्यंत दिलेली पातळी टिकून राहते तोपर्यंत बायस सकारात्मक राहते.'
 
अग्रलेख
जरुर वाचा
मी नुसता एसंशी नाही तर...; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उबाठा गटाला सडेतोड उत्तर

"मी नुसता एसंशी नाही तर..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उबाठा गटाला सडेतोड उत्तर

मला 'एसंशि' नाव दिले आहे मात्र मी नुसता 'एसंशि' नसून महाराष्ट्रासाठी ‘एसंशियल’ म्हणजे 'गरजे'चा आहे, असे सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला दिले. विधानसभा निवडणुकीत कोकणवासीयांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्याबाबत आभार व्यक्त करण्यासाठी गुरुवार, २४ एप्रिल रोजी कुडाळ येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्त्या डॉ.ज्योती वाघमारे तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121