मुंबई: आरबीआयने बजाज फायनान्स कंपनीच्या 'Insta Emi Card' व eCOM या उत्पादनांवरील बंदी उठवल्यानंतर कंपनीच्या समभागात ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.सकाळच्या सत्रात बाजारात समभागात ७ टक्क्यांनी उसळी मारल्यानंतर हा समभाग चांगलाच चर्चेत आला आहे. एनएसईत शेअर्सची किंमत ७.५१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटल्याप्रमाणे, बजाज फायनान्स या विना बँकिग वित्तीय संस्थेच्या (NBFC) कंपनीने आपल्या ईएमआय कार्डच्या माध्यमातून कर्ज पुरवठा सुरू करण्याची परवानगी मागितली होती. १५ नोव्हेंबरला आरबीआयने या संबंधित उत्पादनांवर बंदी घालून यांची विक्री थांबवण्याचे आदेश दिले होते. कंपनीने आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी आरबीआयने हा निर्णय घेतला होता. विशेषतः कंपनीने कर्ज पुरवठा करताना आपल्या ग्राहकांना 'Key Fact Statement' ची कागदपत्रे पुरवली नव्हती.परिणामी आरबीआयच्या निर्णयानंतर ही आर्थिक उत्पादन बंद करण्यात आलली होती.
बजाज फायनान्सने आपला आर्थिक तिमाहीतील निकाल जाहीर केला होता ज्यामध्ये कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर २१ टक्क्यांनी नफ्यात वाढ झाली होती. एकूण कंपनीला ३८२५ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.