शेअर बाजार विश्लेषण: निवडणूक निकालपूर्वी 'नफा बुकिंग' सुरू बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स ६६७.५५ व निफ्टी १८३.४५ अंशाने घसरला !

बँक निर्देशांकात मोठी घसरण, फार्मा समभागात वाढ एफएमसीजी,फायनांशियल सर्विसेसमध्ये नुकसान !

    29-May-2024
Total Views | 38

bse
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. बाजारातील अस्थिरतेने आज नकारात्मक पवित्रा ठेवल्याने बाजारात पडझड झाली आहे. विशेषतः आज सकाळच्या सत्रातील घसरण अखेरपर्यंत कायम राहत बाजार घसरले आहे. सेन्सेक्स ६६७.५५ अंशाने घसरत ७४५०२.९० पातळीवर पोहोचले आहे. तर निफ्टी १८३.४५ अंशाने घसरत २२७०४.७० पातळीवर पोहोचला आहे.
 
सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकातही घसरण कायम राहिली असून त्याचा फटका बाजारात बसला होता. सेन्सेक्स बँक निर्देशांक ६४७.१९ अंशाने घसरत ७४५०२.९० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ६४०.८० अंशाने घसरत ४८५०१.३५ पातळीवर पोहोचला आहे. आज दोन्ही निर्देशांकात अनुक्रमे १.१५ व १.३० टक्क्यांनी घसरण झाली होती.बीएसई तील मिडकॅपमध्ये ०.३८ % घसरण तर स्मॉलकॅपमध्ये ०.२५ % ने वाढ झाली होती. एनएसईतील मिडकॅपमध्ये ०.३५ % घट झाली आहे व स्मॉलकॅपमध्ये ०.०८% वाढ झाली आहे.
 
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये बहुतांश समभागात घसरण झाली आहे. आज वाढ फार्मा (०.५५%), मेटल (०.२७%), हेल्थकेअर (०.४३%), मिडिया (०.१८%) समभागात वाढ झाली आहे तर सर्वाधिक नुकसान बँक (१.३०%), फायनांशियल सर्विसेस (१.६५%), फायनाशिंयल सर्विसेस २५/५० (१.७६%), एफएमसीजी (०.५४%), प्रायव्हेट बँक (१.३६%) समभागात झाली आहे.
 
बीएसईत (BSE) आज एकूण ३०२९ कंपन्याचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १६९३ समभाग वधारले असून २१२७ समभाग घसरले आहेत. त्यातील एकूण १५० समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ४३ समभागात ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण २५३ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर २८७ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत. आज बीएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल ४१५.०९ लाख कोटींवर पोहोचले आहे.
 
एनएसईत (NSE) आज एकूण २७१५ कंपन्याचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील ११२४ कंपन्याचे समभाग वधारले असून १४८१ समभागात घसरण झाली आहे. त्यातील ७४ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ४० समभागातील मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण १०७ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ९८ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत. एनएसईतील कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४११.१५ लाख कोटी होते.
 
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरल्याने अखेरीस रुपया प्रति डॉलर ८३.३२ रुपयांवर स्थिरावला होता.जूनमध्ये होणारी ओपेक राष्ट्राची बैठक व अमेरिकन लवकरच दोन जूनला येणारे वैयक्तिक खर्च निर्देशांक व सकल देशांतर्गत उत्पादनाची आकडेवारी येणार असल्याने सकाळी बाजारातील डॉलरमध्ये घसरण झाल्याने सोने निर्देशांकात वाढ झाली होती. पर्यायाने सोने महागले होते. संध्याकाळी ३.४५ पर्यंत सोन्याच्या युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात ०.६५ टक्क्यांनी घसरण झाली होती.युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.४४ टक्क्यांनी घसरण झाली होती. तर भारतातील एमसीएक्स सोने निर्देशांकात ०.१६ टक्क्यांनी घसरण होत सोने पातळी ७२०६६.०० पातळीवर पोहोचले होते.
 
'गुड रिटर्न्स' या संकेतस्थळावरील माहितीनुसार संध्याकाळपर्यंत भारतातील सोने प्रति १० ग्रॅम २५० ते २७० रुपयांनी महागले होते. दुसरीकडे रेड सी हल्ला, वाढलेला मध्यपूर्वेतील दबाव, व ओपेक राष्ट्रांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय व आगामी काळातील या राष्ट्राची उत्पादनात घट किती करणार यासाठी आयोजित केलेली बैठक यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रूड ( कच्च्या) तेलाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने तेल पुरवठ्याअभावी महागले आहे.
 
WTI Future क्रूड तेलाच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.८१ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent क्रूड निर्देशांकात ०.७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स क्रूड निर्देशांकात १.१८ टक्क्यांनी वाढ होत तेलाची भारतातील किंमत ६७१५.०० रुपये प्रति बॅरेलवर पोहोचली आहे. आगामी काळात याहून तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
 
आज बाजारातील घसरण सुरूच राहिली होती. विशेषतः भारतातील निवडणूक पूर्वीच्या शांततेचा बाजारात परिणाम दिसला. बाजारातील चढउतार कायम राहिल्याने बाजाराने आज कात टाकली होती.लार्जकॅप बरोबर मिडकॅपमध्ये झालेल्या घसरणीमुळे बाजारातील मूल्यांकन घटले आहे. जागतिक स्तरावरील संमिश्र वातावरणाचा फटका बाजारात बसला होता.अमेरिकन बाजारा तील वैयक्तिक वापर खर्च (Personal Consumption Expenditure)आकडे गुरूवारी जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्यावर गुंतवणूकदारांनी आपले लक्ष केंद्रित केले असण्याची शक्यता आहे. बाजारातील तज्ञांच्या मते आगामी PCE मधील आकडेवारी समाधानकारक असण्याची चिन्हे कमी असल्याने याचा परिणाम आगामी महागाई दर नियंत्रणात पडू शकतो. याचा अप्रत्यक्षपणे फरक आगामी काळात फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का यासाठी असल्याने जागतिक पातळीवरील संकेत स्थिर नाहीत.
 
भारतातही निवडणपूर्व वीआयएक्सची (VIX Volatility) निर्दशाकांची हालचाल अधिक असल्याने बाजारातील गुंतवणूकदारांनी बाजार चढण्यासाठी आवश्यक असलेली 'नफा बूकिंग' अथवा 'कंसोलिडेशन' असल्याची परिस्थिती पाहता बाजारात घसरण झाली आहे. जसजसा निकाल जवळ येईल तेव्हा वीआयएक्स मधील हालचाल पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे आज दोन्ही बँक निर्देशांकातही मोठी घसरण झाल्याने बाजारात पडझड झाली होती. परिणामी बाजारात रॅलीसाठी नवीन ट्रिगर नसल्याने बाजारात आणखी नुकसान झाले होते.
 
आज शेअर बाजारात हिंदाल्को, पॉवर ग्रीड, डिवीज, व नेस्ले इंडिया, सिप्ला यांसारख्या समभागात फायदा झाला असून एसबीआय इन्शुरन्स,आयसीआयसीआय बँक, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, टेक महिंद्रा या समभागात घसरण झाली होती.बीएसई त वाढलेल्या समभागात ८ ते १८ टक्क्यांनी वाढ झाली तर घसरलेल्या समभागात ५ ते १० टक्क्यांनी घसरण झाली होती.एनएसई त वाढलेल्या समभागात ०.९५ ते ३.५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर घसरलेल्या समभागात २.०४ ते २.९० टक्क्यांनी घसरण झाली होती.
 
बीएसईत आज पॉवर ग्रीड, सनफार्मा, नेस्ले, आयटीसी, भारती एअरटेल, इंडसइंड बँक या समभागात वाढ झाली आहे तर टेक महिंद्रा, एक्सिस बँक बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक या अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, रिलायन्स, एसबीआय, टायटन कंपनी, बजाज फायनान्स, एचयुएल, टीसीएस, एम अँड एम, लार्सन, कोटक महिंद्रा, एचसीएलटेक, जेएसडब्लू स्टील, टाटा मोटर्स, मारूती सुझुकी, एशियन पेंटस, टाटा स्टील, एनटीपीसी या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत हिंदाल्को,पॉवर ग्रीड, डिवीज, नेस्ले, सनफार्मा, सिप्ला, बजाज ऑटो, अदानी पोर्टस, डॉ रेड्डीज, अदानी एंटरप्राईज, आयटीसी, भारती एअरटेल, इंडसइंड बँक या समभागात वाढ झाली आहे तर एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय बँक, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, टेक महिंद्रा बीपीसीएल, एक्सिस बँक बजाज फायनान्स बजाज फिनसर्व्ह, ग्रासीम, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, इन्फोसिस, रिलायन्स, एसबीआय, एचयुएल,टीसीएस, कोटक महिंद्रा, ओएनजीसी, टायटन कंपनी, श्रीराम फायनान्स, हिरो मोटोकॉर्प, लार्सन जेएसडब्लू स्टील, आयशर मोटर्स, टाटा मोटर्स, ब्रिटानिया, एचसीएलटेक, एशियन पेंटस, टाटा स्टील, कोल इंडिया, मारूती सुझुकी, अपोलो हॉस्पिटल या समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, 'कमकुवत जागतिक संकेतांनी गुंतवणूकदारांना यूएस कोर PCE डेटाच्या पुढे नफा घेण्यास प्रवृत्त केले, जो महागाईचा एक महत्त्वाचा मापक आहे जो वाढण्याची अपेक्षा आहे. जपान आणि ऑस्ट्रेलियातील ताज्या ट्रेंडप्रमाणे जागतिक चलनवाढीची सतत वाढ नजीकच्या काळात यूएस फेड दर कपातीची गुंतवणूकदारांची अपेक्षा कमी करत आहे. वित्तीय आणि आयटी मधील प्रचंड कमी कामगिरीसह सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक आधारित कमजोरी लक्षात येते.'
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, 'हॉकिश फेड यूएस मधील आर्थिक डेटा बोलतो आणि उत्साहित करतो. युएस CB ग्राहकांचा आत्मविश्वास अनपेक्षितपणे मे २०२४ मध्ये १०२ विरुद्ध एप्रिल २०२४ मध्ये ९७ वर वाढला या घटकांचा गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला.हिंदाल्कोची उपकंपनी असलेल्या नोव्हेलिसने ४५ दशलक्ष शेअर्सच्या IPO साठी USD १८-२१ प्रति शेअर किंमत बँडची घोषणा केली.प्राइस बँडनुसार नोव्हेलिसचे मार्केट कॅप USD १०.८-१२.६ अब्ज आहे ज्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित केले आणि Hindalco ३.५२% ने वाढले. जरी ग्रे मार्केट प्रीमियममध्ये चढ-उतार होत असले तरी, Awfis Space Solutions, भारताच्या झपाट्याने विस्तारणाऱ्या वर्कस्पेस सोल्यूशन्स क्षेत्रातील एक महत्त्वाचा खेळाडू, ला एक सन्माननीय सूची किंमत मिळण्याची अपेक्षा आहे. GMP सध्या अशा १०३ वर बसला आहे, किंवा इश्यू किमतीपेक्षा जवळपास २६%.होती. १०८ पट जास्त गुंतवणूकदारांनी IPO चे सदस्यत्व घेतले होते.'
 
रुपयांच्या पडझडीवर प्रतिक्रिया देताना, एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च कमोडिटी व करंसी जतीन त्रिवेदी म्हणाले' रुपयाने कमजोर व्यवहार केला, ०.१३ ने घसरून,८३.३५ वर बंद झाला. डॉलरचा निर्देशांक सकारात्मक ते सपाट होता,१०४.६५ $ च्या जवळ व्यवहार करत होता. क्रूडच्या किमती जास्त व्यापार करत आहेत ज्यामुळे रुपयाचा दबाव वाढला आहे कारण क्रूडची किंमत ७६.२५ $ वरून ८०.२५ $ वर गेली आहे.व्यापार सत्रात भारतीय भांडवली बाजारातील विक्रीमुळे रुपयावर दबाव वाढला, ज्याला ८३ च्या जवळ कडक प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रमुख घटनेच्या दरम्यान, कमकुवत कामगिरीमुळे रुपयाला विक्रीचा अनुभव आला. भांडवली बाजारात आणि क्रूडच्या किमती ८३.१० आणि ८३.४५च्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.'
 
सोन्याच्या हालचालींवर प्रतिक्रिया एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, 'कॉमेक्समध्ये सोन्याच्या किमतीला 2355-2360$ वर प्रतिकाराचा सामना करावा लागला, आणि MCX सोन्याला सुमारे ७२४५० रुपये विक्रीचा सामना करावा लागला. डॉलरची किरकोळ वाढ आणि शुक्रवारी आगामी PCE किंमत निर्देशांक डेटा जो महागाईच्या अंदाजाकडे सूचित करेल अशा प्रकारे सकारात्मक नंतर सोन्यात नफा बुकिंग दिसून आले. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये ७१२५० ते ७२४५० पर्यंत वाढल्याने सोन्याला ७१००० च्या जवळ समर्थन मिळेल आणि PCE किंमत निर्देशांकाचा डेटा बाहेर येईपर्यंत ७२६०० च्या जवळ प्रतिकार होईल.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव एनालिस्ट ऋषिकेश येडवे म्हणाले,'देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक कमकुवत नोटेवर उघडले, कमकुवत जागतिक संकेतांमुळे तोलले गेले आणि परिणामी, निफ्टी २२७०५ स्तरांवर नकारात्मक नोटवर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाने गडद क्लाउड कव्हर कँडलस्टिक पॅटर्नची पुष्टी केली आणि नफा बुकिंग पाहिली. डाउनसाइडवर, २१-DEMA २२५६७ जवळ आणि ३४-DEMA २२४८० च्या जवळ ठेवला आहे. अशाप्रकारे २२५६७आणि २२४८० निर्देशांकासाठी समर्थन बिंदू म्हणून काम करतील, तर २२८०० आणि २३११० हे अल्पावधीत एक प्रमुख अडथळा म्हणून काम करतील.
 
बँक निफ्टी निर्देशांक नकारात्मक पातळीवर उघडला आणि दिवसभर कमजोर राहिला. परिणामी, निर्देशांक ४८५०१ वर नकारात्मक पातळीवर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, बँक निफ्टीने शीर्षस्थानी शूटिंग स्टार कॅन्डलची पुष्टी केली आहे आणि शूटिंग स्टार कँडलच्या खालच्या पातळीच्या खाली ४९०५१ स्तरांवर टिकून आहे, जे कमकुवतपणा दर्शवते. नकारात्मक बाजूने, अल्पावधीत ४८००० बँक निफ्टीला चांगला आधार म्हणून काम करतील. वरच्या बाजूने, ४९६८० आणि ५०००० हे अल्पावधीत बँक निफ्टीसाठी अडथळे राहतील.'
 
अग्रलेख
जरुर वाचा
मेधा पाटकरांना अटक, २३ वर्ष जुनं प्रकरण पुन्हा चर्चेत!

मेधा पाटकरांना अटक, २३ वर्ष जुनं प्रकरण पुन्हा चर्चेत!

नर्मदा बचाओ आंदोलनातील सहभागामुळे प्रकाशझोतात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली न्यायालयाने बुधवारी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॅारंट जारी केले होते. त्यानुसार आज त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली असून साकेत न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. २०२४ मध्ये न्यायलयाने २३ वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दीर्घकाळ चाललेल्या खटल्यात त्यांना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121