मुंबई,दि.२८: मुंबईकरांना तात्काळ वीज जोडणी मिळावी यासाठी टाटा पॉवरने संपूर्ण डिजिटलाईज्ड सेवा सुरु करून ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्याच्या प्रक्रियेत क्रांती घडवून आणली आहे. या नव्या प्रक्रियेमुळे आता नवीन वीज जोडणी केवळ ७ दिवसांमध्ये मिळू शकते. ऑनलाईन ग्राहक पोर्टलवर ऍप्लिकेशन फॉर्म, ओळख पुरावा आणि मालकी पुरावा हे तीन कागदपत्र सादर करून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. केवळ तीन कागदपत्रांच्या आधारे नवीन वीज जोडणी अधिक सहजपणे व अधिक लवकर मिळवता येते.
प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहावी यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म सादर केल्यानंतर साईट व्हिजिट करून ग्राहकांना अंदाजे खर्च कळवला जातो. यामध्ये अर्ज शुल्क, सेवा जोडणी शुल्क आणि सुरक्षा ठेव रक्कम यांचा समावेश असतो. या शुल्काचा भरणा करण्यासाठी सुरक्षित ऑनलाईन पेमेंट पर्याय उपलब्ध करवून देण्यात आले आहेत. व्हेरिफिकेशन आणि पेमेंट प्रोसेसिंग झाल्यानंतर सात दिवसांमध्ये टाटा पॉवरचा इंजिनीयर ग्राहकांच्या जागी येऊन नवीन जोडणी करतात.
माय टाटा पॉवर मोबाइल ॲप, ग्राहक पोर्टल, व्हॉट्सॲप सारख्या युजर्सना वापरायला सहजसोप्या पर्यायांद्वारे कंपनीच्या सेवासुविधांचा लाभ घेता येतो. याव्यतिरिक्त, कस्टमर पोर्टल व माय टाटा पॉवर मोबाईल ऍपवर क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग, डिजिटल वॉलेट्स आणि ई-वॉलेट्स, एनईएफटी/आरटीजीएस, बीबीपीएस, एनएसीएच, ई-एनएसीएच मार्फत डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करवून देण्यात आली आहे. ग्राहकांना सर्व सेवांचा आनंददायी अनुभव मिळवून देणे हा टाटा पॉवरचा उद्देश आहे. आज, मुंबई वितरणातील टाटा पॉवरच्या ५३% पेक्षा जास्त ग्राहकांनी पेपरलेस बिलिंग स्वीकारले आहे आणि ८८% पेक्षा जास्त बिलांचा भरणा डिजिटल पद्धतीने केले जात आहे. टाटा पॉवर कंपनीने मुंबईतील ३६५४३ हून अधिक घरांमध्ये शाश्वत ऊर्जा पोहोचवली आहे. यामध्ये ३४० दशलक्ष युनिट्स हरित ऊर्जेचा वापर केला जात आहे, त्यामुळे दरवर्षी २०० किलो टन कार्बन उत्सर्जन ऑफसेट केले जात आहे.
नवीन जोडणी घेण्यासाठी पाच टप्पे
1. पोर्टल/सीआरसीवर ग्राहकाकडून नवीन वीज जोडणी अर्ज
• ऍप्लिकेशन फॉर्म
• ओळख पुरावा आणि मालकी पुरावा सादर करणे
2. टाटा पॉवर टीम साईट व्हिजिट करेल.
3. टाटा पॉवर टीम ग्राहकाला खर्चाची अंदाजे रक्कम कळवेल.
4. ग्राहक शुल्क भरणा करेल.
5. जोडणी केली जाईल.