वाशीनाका येथे जलवाहिनी जोडणीचे काम

काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

    28-May-2024
Total Views | 27

vashinaka bmc

मुंबई, दि.२७:
मुंबई महानगरपालिकेकडून उद्या बुधवार, दि. २९ मे ते गुरुवार, ३० मे दरम्यान बी. डी. पाटील मार्ग, वाशी नाका येथे ४५० मिलीमीटर व ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांना बुधवार, दि. २९ मे रोजी सकाळी १०.०० वाजेपासून गुरुवार, दि. ३० मे सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. त्यामुळे या संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.
१) एम पूर्व विभाग (बीट क्रमांक १४७ ते १४८) – लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीराम नगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगरे पार्क, टाटा वसाहत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बी. पी. सी. एल.) वसाहत, एच. पी. सी. एल. वसाहत, गवाणपाडा, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एच. पी. सी. एल.) रिफायनरी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, बी. ए. आर. सी., वरुण बेवरेजेस (बुधवार, दि. २९ रोजी सकाळी १० ते गुरुवार, दि. ३० रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील).
२) एम पश्चिम विभाग (बीट क्रमांक १५४ ते १५५) - माहुलगाव, आंबापाडा, जिजामाता नगर, वाशी नाका मैसूर वसाहत, खाडी मशीन, आर. सी. मार्ग, शहाजी नगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लालडोंगर, सुभाषचंद्र बोस नगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक चेंबूर छावणी (बुधवार, दि. २९ रोजी सकाळी १० वाजेपासून गुरुवार, दि. ३० सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील).
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121