मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या क्षणी ओझरती घट झाली आहे. बाजारातील चढउतार मोठ्या प्रमाणात झाली असून आज वीआयएक्स निर्देशांक दिवसभरात ५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.अखेरीस तो २ टक्क्यांवर खाली आला आहे. अखेरच्या सत्रात बीएसई निर्देशांक २७.९५ अंशाने घसरत ७५३८२.४४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक २२.९५ अंशाने घसरण २२९३४.१५ पातळीवर पोहोचला आहे.
सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ३१३.३२ अंशाने वाढत ५६२३१.९२ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३३१.१५ अंशाने वाढत ४९३०२.८० पातळीवर पोहोचला आहे. आज अनुक्रमे सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात ०.५६ टक्क्यांनी व ०.६८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप ०.६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर बीएसई स्मॉलकॅपमध्ये ०.०७ टक्क्यांनी घट झाली आहे. एनएसईतील मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६५ व ०.८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Sectoral Indices) मध्ये सर्वाधिक वाढ पीएसयु बँक (१.३६%), प्रायव्हेट बँक (०.५४%), फायनांशियल सर्विसेस (०.५१%), रियल्टी (०.७१%) समभागात झाली आहे तर सर्वाधिक घसरण मिडिया (०.९१%), एफएमसीजी (०.३५%), तेल गॅस (०.५१%) समभागात झाली आहे.
बीएसईत आज ४१०० समभागात ट्रेडिंग झाले असताना त्यातील १६३३ समभागात वाढ झाली आहे तर २३२२ समभागात घसरण झाली आहे. २३६ समभागात ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक वाढ झाली आहे तर ४२ समभागातील मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण ३३५ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ३१४ सम भाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
एनएसईतील २८८६ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील ११२५ समभाग वधारले असून १५२९ समभागात घसरण झाली आहे. १४८ समभागात ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक वाढ झाली आहे तर ३३ समभागात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. आज एकूण १०५ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ११८ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
बीएसईवरील कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४२० लाख कोटींवर पोहोचले आहे तर एनएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल ४१६.०४ लाख कोटींवर पोहोचले आहे. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत वाढत अखेरीस ८३.१४ वर स्थिरावला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या खालावलेली किंमत आठवड्याच्या सुरूवातीला वधारल्या आहेत. मध्यपूर्वेतील दबाव व युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता इतक्यात धूसर झाल्याने सोन्याच्या मागणीत वाढ तर पुरवठ्यात घट झाल्याने बाजारात भाव वाढले आहेत. युएस गोल्ड स्पॉट दरात ०.४७ टक्क्यांनी वाढत किंमत २३४४.७३ टक्क्यांवर पोहोचली आहे तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.४९ टक्क्यांनी वाढत २३४५.९० पातळीवर सोने पोहोचले आहे.भारतातील एमसीएक्स (MCX) सोन्याच्या निर्देशांकात ०.६५ टक्क्यांनी वाढत ७१७२२.०० पातळीवर पोहोचले आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २५० तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २७० रुपयांनी वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी मागणी कमी असल्याने कच्च्या (क्रूड) तेलाच्या निर्देशांकात घट झाली होती. मात्र आगामी ओपेक राष्ट्रांच्या बैठकीत क्रूड तेलाचे आऊटपुट उत्पादन कमी करण्याची शक्यता असल्याने पुन्हा बाजारात क्रूडमध्ये वाढ होत आहे. WTI Future क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स क्रूड निर्देशांकात ०.६० टक्क्यांनी वाढ होत पातळी प्रति बॅरेल ६५१० रुपयांवर पोहोचली आहे.
आज शेअर बाजारातील निर्देशांकात घट झाली असली तरी बाजारातील चढउतार मोठ्या प्रमाणात वाढल्याने निर्देशांक घसरला आहे. सकाळच्या सत्रात मारलेली उसळी अखेरीस नियंत्रणात आली होती. बाजारातील सकारात्मकतेत वाढ होऊन प्रथमच सेन्सेक्स ७५००० ची पातळी गाठून आला आहे तर निफ्टी २३००० पर्यंत पोहोचला होता. भारतातील अर्थव्यवस्थेतील भरारी, तसेच जीडीपीतील आलेले आकडे, पीएमआयचा सेवा व उत्पादन क्षेत्रातील वाढ झाल्याचा निर्देशांकात वाढ, आगामी लोकसभा निवडणूक निकाल यामुळे बाजारात मोठ्या उत्साहाचे वातावरण कायम राहिले होते. बाजारातील तज्ञांचे पुन्हा भाजप परत येत असल्याचे सुतोवाच केले तरी मात्र निवडणूक निकाल लागेपर्यंत धाकधूक झाल्याने आजही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली देशातील गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता आहे. बीएसई स्मॉलकॅपमध्ये झालेली घसरण वगळता निफ्टी मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये तर बीएसई मिडकॅपमध्ये वाढ झाली होती.
बीएसईत इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, लार्सन, एचडीएफसी बँक, एचयुएल, कोटक महिंद्रा, एसबीआय, टेक महिंद्रा, एचसीएलटेक, इन्फोसिस, टाटा स्टील, टीसीएस, भारती एअरटेल या समभागात वाढ झाली आहे तर विप्रो, सनफार्मा, रिलायन्स, आयटीसी, एम अँड एम, बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्लू स्टील, मारूती सुझुकी, टायटन कंपनी, टाटा मोटर्स, पॉवर ग्रीड, आयसीआयसीआय बँक या समभागात घसरण झाली आहे.
एनएसईत डिवीज, एक्सिस बँक,अदानी पोर्टस, बजाज फायनान्स, लार्सन, एचडीएफसी बँक, हिंदाल्को, एसबीआय, एचसीएलटेक, टेक महिंद्रा, बजाज ऑटो, कोटक महिंद्रा, इन्फोसिस, टाटा स्टील, बीपीसीएल, डॉ रेड्डीज या समभागात वाढ झाली आहे तर अदानी एंटरप्राईज, विप्रो, ग्रासीम, ओएनजीसी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, आयशर मोटर्स, एनटीपीसी, सन फार्मा, कोल इंडिया, एम अँड एम, आयटीसी, सनफार्मा, कोल इंडिया, रिलायन्स, श्रीराम फायनान्स, हिरो मोटोकॉर्प, सिप्ला, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले, भारती एअरटेल, टायटन कंपनी, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लाईफ, एशियन पेंटस, टीसीएस , अल्ट्राटेक सिमेंट या समभागात घसरण झाली आहे.
बाजारातील वीआयएक्स (VIX Volatility Index) निर्देशांक ५ टक्क्यांवर पोहोचला होता. वर खाली झालेल्या समभागातील हालचालींमुळे या निर्देशांकात वाढ झाली होती. ही परिस्थिती निकालापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ब्लू चिप्स कंपन्यांच्या समभागात ०.१३ टक्क्यांनी घसरल्याने बाजारातील भिस्त बँक निर्देशांकात कायम राहिली होती. मोठ्या समभागात घसरण झाली तरी बँक निर्देशांकाने उसळी गाठल्याने बाजारात संतुलन राखले गेले होते.
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता जूनपर्यंत तरी शक्य नसल्याने व आगामी युएस वैयक्तिक खर्चाचा अहवाल लवरकच येण्याची शक्यता असल्याने अमेरिकन बाजारात सगळ्यांचे लक्ष त्यावर लागले आहे. ३१ मेपर्यंत हा डेटा प्रदर्शित करण्यात येणार आहे. विशेषतः महागाईचा अपेक्षित दर राखता येत नसताना अमेरिकन गुंतवणूकदारांनी आपले लक्ष या नवीन आकडेवारीवर केंद्रीत केल्याने तिन्हीही युएस शेअर बाजारात काल वाढ झाली होती.
भारतातील अर्थव्यवस्थेबाबत गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असल्याने बाजारात आगामी काळात रॅली होण्याची शक्यता असली तरी निकालापर्यंत चढ उताराचे आव्हान कायम राहण्याची शक्यता आहे. प्रथमच सेन्सेक्स ७६००९.६८ व निफ्टी २३११०.८० पातळीवर पोहोचला होता. निवडणूक निकालानंतर याहून अधिक रॅली होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आज अखेरीस रिलायन्स, आयटीसी, महिंद्रा, एक्सिस बँक ,एल अँड टी अशा समभागात घट झाल्याने बाजारातील पातळी अखेरीस खालावली होती. भारतातील आगामी काही दिवसांत वीआयएक्स महत्वाची भूमिका बजावू शकतो.
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'आज अपेक्षेनुसार ५०० अंक वर गेल्यावर बाजार खाली आला.स्टेट बँक,एक्सिस,आयसीआयसीआय, व एचडीएफसी दिवसभर बरेच वर होते पण शेवटच्या अर्ध्या तासात रिलायन्स आणि दिवसभर वर असलेल्यां बॅका थोड्या खाली आल्या.एकंदरीत बाजारात थोडी नफा वसुली अपेक्षेनुसार झाली व आजचे 500 अंक ही खाली आले.खाली येणारे शेअर्स आज जास्त आहेत याचाच अर्थ सर्व स्तरावर नफा वसुली झाली आहे. व्होलै टॅलीटी (VIX) चा निर्देशांक एक महिन्यात दुप्पटीपेक्षा जास्त झाला आहे. तो एक चिंतेचा विषय आहे. बाकी जागतिक पातळीवर खास काही नाही. निवडणूकपूर्व रॅली बाजारात दिसत आहे. पुढील चार दिवसात चित्र स्पष्ट होईल. जानेवारीपासून विदेशी संस्थां मार्फत विक्रीचा जोर सुरु आहेच. निवडणूक निकालानंतर कदाचित त्यात काही सकारात्मक अपेक्षित आहे. जून ५-७ किंवा ऑगस्टपर्यंत जर महागाई निर्देशांक चारच्या जवळ अपेक्षेनुसार येईल अशी आशा करू शकतो.आज हा निर्देशांक ४.८५ आहे.जर हे शक्य झाल्यास व्याज दर कपात भारतात आधी होउ शकेल.लांबलेल्या निवडणूक प्रक्रियेतुन पुढील आठवड्यात निश्चित दिशा मिळेल या आशेवर सर्व गुंतवणूकदार आहेत.'
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना, असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल व रिसर्च ऋषिकेश येडवे म्हणाले, 'इंडेक्स हेवीवेट्समध्ये जोरदार खरेदीमुळे निफ्टीने २३११०.८० ची विक्रमी-उच्च पातळी नोंदवली, परंतु ट्रेडिंगच्या शेवटच्या तासांमध्ये, निफ्टीने सर्व नफा गमावला आणि २२९३२ वर नकारात्मक नोटवर बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाला २३११० वर ट्रेंडलाइन रेझिस्टन्स दिसला आणि नफा बुकिंग दिसून आले, ज्यामुळे गडद ढगाचे आवरण तयार झाले. अशा प्रकारे,अल्पावधीत, २३११०-२३२०० प्रतिरोधक बिंदू म्हणून काम करतील. नकारात्मक बाजूने, २२८०० चा अलीकडील ब्रेकआउट पॉइंट निर्देशांकासाठी मुख्य आधार म्हणून काम करेल.'
बँक निफ्टी निर्देशांक सकारात्मक नोटवर उघडला आणि दिवसभर उत्साही राहिला, 49,282 स्तरांवर सकारात्मक नोटवर स्थिरावला. बँक निफ्टीने 49,688.85 चा उच्चांक नोंदवला, आमचे 49,500 चे लक्ष्य पूर्ण केले आणि नफा बुकिंग दिसले. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाने दैनिक स्केलवर शूटिंग स्टार कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे. जर निर्देशांक 49,051 स्तरांवर शूटिंग स्टार कॅन्डलच्या खालच्या पातळीच्या खाली टिकून राहिला तर कमजोरी आणखी वाढू शकते. आत्तापर्यंत, बँक निफ्टीचा कल वर आहे, परंतु वरच्या बाजूने, 49,690 आणि 50,000 हे बँक निफ्टीसाठी अल्पावधीत अडथळे राहतील.'
बाजारातील परिस्थितीविषयी व्यक्त होताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' ३ मे रोजी, आरबीआयने बँकांना सुचवले की त्यांनी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी राखीव तरतूद रक्कम वाढवावी जे अद्याप बांधकामाधीन आहेत.आज प्रसिद्ध झालेल्या केअर एजच्या अहवालानुसार, केंद्रीय बँकेकडून मसुदा प्रकल्प वित्त मार्गदर्शक तत्त्वांसाठी सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही भारतीय बँकांना १० ते २० बेस पॉइंट्सची अतिरिक्त तरतूद करणे आवश्यक आहे.
परिणामाची अपेक्षा खूपच जास्त होती, म्हणून आज निफ्टी पीएसयु बँका वर होत्या.पीएसयु बँका जास्त एक्सपोजर असल्यामुळे तरतुदीवर जास्त परिणाम करतात.संरक्षण आणि एरोस्पेस कंपनीने Q4FY24 मध्ये निव्वळ नफ्यात ४x पेक्षा जास्त वाढ नोंदवल्यानंतर Astra Microwave Products (Astra) ९.६८% ने बंद झाली. Astra चा जानेवारी-मार्च कालावधीसाठी एकत्रित निव्वळ नफा ५४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो कोणत्याही तिमाहीतील आतापर्यंतचा सर्वाधिक आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत १३ कोटी रुपयांनी वाढला आहे. महसुलात देखील वार्षिक आधारावर ३५४ कोटी रूपये Q4 FY23 मधील Q4 FY24 मध्ये २५८ कोटी पेक्षा जवळपास ३८% वाढ झाली आहे सर्व प्रमुख पॅरामीटर्सवर वितरीत करताना, कंपनीचे EBITDA मार्जिन देखील Q4FY23 मध्ये १३.३% च्या तुलनेत २२.८% पर्यंत वाढले आहे.'
बाजारातील परिस्थितीविषयी भाष्य करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की, ' गुंतवणूकदारांनी निवडणुकीच्या निकालापूर्वी बाजारात कोणतीही गुडघेदुखीची प्रतिक्रिया टाळण्यासाठी उच्च स्तरावर नफा बुक करणे सुरू केल्याने बुलांना २३००० स्तरांवर कडक प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे. कमाईची चांगली वाढ, खाजगी भांडवली बाजारातील पुनरुज्जीवनाची अपेक्षा आणि त्यात घट. FII ची विक्री तीव्रता हे बाजारातील प्रमुख सकारात्मक ट्रिगर आहेत.'
रुपयांच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी करन्सी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, ' रुपयाने ०.०२ % ने कमकुवत व्यवहार केला, ८३.१३ वर बंद झाला. डॉलर निर्देशांक १०४.५३ $ च्या जवळ सपाट राहिल्याने आणि अलीकडील खरेदीमुळे क्रूडच्या किमतीत किरकोळ सकारात्मक हालचालींमुळे बाजूच्या हालचालीवर परिणाम झाला. रुपयाचा कल अस्थिर असण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या अस्थिरतेमध्ये रुपयाची अपेक्षित श्रेणी ८३.०० आणि ८३.३० च्या दरम्यान आहे.'