डाव्यांच्या भोंगळ कारभारामुळे डबघाईला आलेल्या 'केरळ'ला वाचवण्यासाठी मोदी सरकार सरसावले

    27-May-2024
Total Views | 85
 narendra modi
 
कोची : केरळला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने २१,२५३ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर केले आहे. शनिवारी एक्स वरील एका पोस्टमध्ये, चंद्रशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "केरळच्या आर्थिक संकटात मदत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने डिसेंबर २०२४ पर्यंत २१,२५३ कोटी रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले आहे." अशी माहिती दिली.
 
 
डाव्यांच्या भोंगळ कारभारामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या केरळच्या राज्य सरकारकडे सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध नव्हता. केंद्र सरकारची ही आर्थिक मदत केरळसाठी फायद्याची ठरणार आहे. मदतीची घोषणा करताना मंत्री चंद्रशेखर यांनी केरळ्चाय डाव्या सरकारला निधीचा कार्यक्षमतेने आणि पारदर्शकपणे वापर करण्याच्या सल्ला दिला.
 
आर्थिक मदतीव्यतिरिक्त, मंत्री चंद्रशेखर यांनी केरळ सरकारला राज्याच्या आर्थिक आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी प्रमुख उपक्रमांवर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले. केरळ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KSRTC) कर्मचाऱ्यांसह सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनच्या देयकांना विलंब झाल्यामुळे आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. पण आता केंद्र सरकारकडून मिळालेल्या कर्जामुळे केरळला मोठा दिलासा मिळणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121