समृद्धीच्या विदर्भातील विस्ताराला वेग

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गोंदिया आणि भंडारा ते गडचिरोली महामार्गच्या निविदा खुल्या

    25-May-2024
Total Views | 27

samrudhi


मुंबई, दि.२५ : 
महाराष्ट्राच्या समृद्धीची रेषा ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी राज्यातील वेगवान अशा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला नागपूरपासून पुढे गोंदियापर्यंत विस्तार करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गोंदिया आणि भंडारा ते गडचिरोली महामार्गच्या तांत्रिक निविदा खुल्या केल्यानंतर मंगळवारी ‘एमएसआरडीसी’ने या प्रकल्पांसाठीच्या आर्थिक निविदा खुल्या केल्या आहेत.

समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाचा भाग असलेल्या भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्गासाठी एका टप्प्यात, गोंदिया – नागपूर द्रुतगती महामार्गासाठी चार टप्प्यांत आणि नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्गासाठी सहा टप्प्यांत निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तीन प्रकल्पांसाठी ११ टप्प्यांत ४६ निविदा दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी जीआर इन्फ्रा, गवार कन्स्ट्रक्शन, बीएससीजीएल इन्फ्रास्ट्रक्चर, अॅफकॉन इन्फ्रा, पटेल इन्फ्रा आदी कंपन्यांनी बाजी मारली आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर संबंधित कंपन्यांना कंत्राटे दिली जातील. या वर्षातच या प्रकल्पांचे बांधकाम सुरू करण्याचे ‘एमएसआरडीसी’चे नियोजन आहे.

महाराष्ट्रातील पूर्व विभाग भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर हा भाग नैसर्गिक खनिजांची संपन्न आहे. राज्याच्या पूर्व आणि पश्चिम सीमा शीघ्र संचार मार्गाला जोडण्याच्यादृष्टीने समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नैसर्गिक खनिज साठ्यांनी समृद्ध मात्र अल्प विकसित भागांच्या विकासासाठी राज्य सरकारने हा भाग समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. या विस्तारित मार्गांमुळे गौण खनिजांची मालवाहतूक रस्तेमार्गे जलद गतीने होण्यास मदत होईल. तसेच, पूर्व भागातील अविकसित आणि आदिवासी क्षेत्र मुख्य प्रवाहाशी जोडले जाऊन त्या परिसराचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल. यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.


भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्ग

पटेल इन्फ्रा

गोंदिया-नागपूर द्रुतगती महामार्ग
१-अॅफकॉन इन्फ्रा
२-अॅफकॉन इन्फ्रा
३ एनसीसी
४-एनसीसी

नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्ग
१-जीआर इन्फ्रा
२-गवार कन्स्ट्रक्शन
३-गवार कन्स्ट्रक्शन
४-एचजी इन्फ्रा
५-एचजी इन्फ्रा
६-बीएससीजीएल इन्फ्रास्ट्रक्चर
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121