मुंबई: श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीने आपला तिमाही निकाल केला आहे. कंपनीला जानेवारी ते मार्च तिमाहीत १२१ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला करोत्तर नफा (Profit After Tax) १५८ कोटी झाला आहे. मागील वर्षाच्या या तिमाहीत कंपनीला १५६ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
मार्च ३१,२०२४ पर्यंत कंपनीच्या प्रिमियम व्यवसायात ६२ टक्क्यांनी वाढत होत व्यवसाय १८७१ कोटींवर पोहोचला होता. मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीचा व्यवसाय ११५२ कोटींवर पोहोचला होता. वैयक्तिक व्यवसाय प्रिमियम ३९ टक्क्यांनी वाढत ९३८ कोटींवर पोहोचला होता. मागील वर्षाच्या तिमाहीत वैयक्तिक प्रिमियम व्यवसाय ६७५ कोटींवर पोहोचला होता.
कंपनीच्या व्यवस्थापनंतर्गत व्यवसाय (Asset Under Management) २०२४ मध्ये ११२८२ कोटींपर्यंत वाढले आहे, जे २५ टक्क्यांनी वाढले. मागील वर्षी हे उत्पन्न ९०१२ कोटी होते. कंपनीच्या एकूण प्रिमियम व्यवसायात मागील वर्षाच्या ९१२ कोटींच्या तुलनेत यावर्षी १२०५ कोटींवर पोहोचले आहे.'
श्रीराम लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कॅस्पेरस जे एच क्रोमहौट म्हणाले, 'श्रीराम लाइफची ग्रामीण आणि शहरी मध्यमवर्गासाठी जीवन विमा चालविण्याची वचनबद्धता नाविन्यपूर्ण धोरणे आणि तंत्रज्ञानाच्या संयोजनामुळे आहे. हे परिणाम आम्ही एक वर्षापूर्वी विक्रीला चालना देऊन आणि ग्रामीण भारतामध्ये आक्रमकपणे विस्तारित करून सुरू केलेले कार्य योग्यरित्या प्रतिबिंबित करतात. कव्हरेजची गरज आणि परवडणाऱ्या योजनांची उपलब्धता यातील अंतर कमी करून, आम्ही आमच्या ग्राहकांच्या विभागांसाठी सर्वात विश्वासार्ह विमा प्रदाता बनू आणि पोहोचत राहू.'