विरार अलिबाग कॉरिडोरसाठी कंत्राटदार ठरले !

११ बांधकाम पॅकेजसाठी ७ कंपन्याची सार्वधिक कमी बोली

    23-May-2024
Total Views | 25

virar alibaugh


मुंबई, दि.२३: प्रतिनिधी 
विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील ११ पॅकेजमधील कामांसाठी सात अभियांत्रिकी कंपन्यांनी आर्थिक बोली जिंकली आहे. मुंबई रस्ते विकास महामंडळातर्फे मंगळवार दि.२२ मे रोजी सात स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांना सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

विरार ते अलिबाग दरम्यान १२८ किमीचा बहुउद्देशीय वाहतूक मार्ग एमएसआरडीसी उभारणार आहे. मुंबईतील प्रवेश नियंत्रित असा हा पहिलाच महामार्ग असणार आहे. या मार्गामधोमध १३६ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारण्याचेही प्रस्तावित आहे. पहिला टप्पा नवघर-बाळवलीला रायगड, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून जोडेल. त्याचे काम ११ बांधकाम पॅकेजेस अंतर्गत केले जाईल. पहिल्या टप्प्यात वसईतील राष्ट्रीय महामार्ग ८ वरील नवघर येथून हा मार्ग सुरू होईल तो पेण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील बलावली गावादरम्यान उभारला जाईल. या महामार्गासाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये भूसंपादनाच्या सुमारे २२ हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे.

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाच्या टप्पा १ च्या १२६ किमीच्या ११ बांधकाम कंत्राटांसाठी एमएसआरडीसीने जानेवारी २०२४ मध्ये १८ कंपन्यांकडून ९०० दिवसांच्या बांधकाम मुदतीसह बोली आमंत्रित केल्या. एप्रिल २०२४ मध्ये १४ कंपन्यांकडून ३३ निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी सात स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांना सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले. विजेत्यांच्या यादीत लार्सन अँड टुब्रो (L&T), नवयुग अभियांत्रिकी कंपनी (NECL), ओरिएंटल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स (OSE), IRCON इंटरनॅशनल, जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स (JKIL), मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स (MEIL), आणि वेलस्पन एंटरप्रायझेस (WEL) यांचा समावेश आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121