मुंबईच्या मध्यवर्ती भागात उद्या पाणीबाणी

पहाटेचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

    23-May-2024
Total Views | 29

bmc


मुंबई, दि.२३ : प्रतिनिधी 
महालक्ष्मी रेसकोर्स आवारातील १२०० मिलिमीटर व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हला बुधवार दि. २२ मे रात्री मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे निदर्शनास आले. मुंबई महानगरपालिका जल अभियंता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कार्यरत राहून ही गळती थोपवून धरली आणि पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरळीत केला आहे. त्यामुळे जी दक्षिण आणि जी उत्तर विभागात गुरुवार, दि. २३ मे २०२४ रोजी दुपारी आणि सायंकाळी नियमित वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे.
मात्र, या गळती दुरुस्तीचे काम गुरुवार, दि. २३ मे रोजी रात्री १० वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम शुक्रवार दुपारपर्यंत पूर्ण होईल .परिणामी,शुक्रवार, दिनांक २४ मे रोजी जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागाचा पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० दरम्यानचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संबंधित विभागातील नागरिकांनी कृपया पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
रेसकोर्स आवारातील बटरफ्लाय व्हॉल्व्हच्या टेलपीस सॉकेट जॉइंटमधून दि. २२ मे रोजी रात्री मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे आढळले. खालच्या बाजूचा लीड जॉइंट पूर्णपणे बाहेर आल्याचे निदर्शनास आले. जल अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत त्याची पाहणी केली. सदर व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम दि. २३ मे रोजी रात्री युद्ध पातळीवर हाती घेण्यात येत आहे. त्यापूर्वी, जी दक्षिण आणि जी उत्तर विभागात दि. २३ मे रोजी दुपारी आणि सायंकाळी नियमित वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे.
 
पाण्याच्या उच्च दाबामुळे व्हॉल्वच्या सांध्यामध्ये शिसे (लीड जॉइंट) ओतणे शक्य नाही. त्यासाठी जलवाहिनीचे अलगीकरण केले जाणार आहे. परिणामी शुक्रवार, दि. २४ मे रोजी जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ,डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागाला पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० या वेळेत नियमित दिला जाणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन करण्‍यात येत आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121