पश्चिम उपनगरात उद्या मुंबईत पाणीबाणी

मुलुंड (पश्चिम) येथे हाती घेण्यात येणार जलवाहिनी जोडण्याचे काम

    23-May-2024
Total Views | 26

watercut


मुंबई, दि.२१: प्रतिनिधी 
मुंबईकरांना पुढील काही दिवस पाणीबाणीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. येत्या दोन दिवसांत जलवाहिन्यांच्या कामांसाठी मुंबईतील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करुन ठेवावा, तसेच पाणी जपून वापरा असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे दोन ठिकाणी १२०० मिलीमीटर X १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम शुक्रवार, दि. २४ मे रोजी सकाळी ११.३० वाजेपासून शनिवार दि. २५ मे रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत (एकूण २४ तासांसाठी) मुलुंड (पश्चिम) मध्ये गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, मुलुंड (पश्चिम) येथे हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत एन, एस व टी विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
प्रभावित होणारे क्षेत्र

एन विभाग - विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज रुग्णालय. (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्रीनंतर ३.३० ते सकाळी ११.३०) – दिनांक २५ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

एस विभाग - नाहूर (पूर्व), भांडुप (पूर्व), कांजूर (पूर्व) चा संपूर्ण परिसर, टागोर नगर संपूर्ण परिसर, कन्नमवार नगर विक्रोळी (पूर्व) येथील इमारत क्रमांक १ ते ३२ व २०३ ते २१७ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्रीनंतर ३.३० ते सकाळी ११.३०) – दिनांक २५ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

एस विभाग – मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (ऐशफोर्ड टॉवर, रुणवाल टॉवर, फोर्टिस रुग्णालय ते सोनापूर वाहतूक दिव्यापर्यंतचा परिसर), सीएट टायर मार्ग लगतचा परिसर (सुभाषनगर, एम. एम. आर. डी. वसाहत), गाव रोड, दत्त मंदीर मार्ग, अंजना इस्टेट, शास्त्री नगर, उषा नगर, लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (भांडुप पश्चिम), सोनापूर, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग, लेक मार्ग, द्राक्ष बाग, काजू टेकडी, जनता मार्केट, टँक रोड परिसर, महाराष्ट्र नगर, कोकण नगर, सह्याद्री नगर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्ग लगतचा परिसर इत्यादी (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ५.०० ते सकाळी १०.००) – दिनांक २५ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
टी विभाग – मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), जे. एन. मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी मार्ग (डम्पिंग रोड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, एम. जी. मार्ग, एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदन मोहन मालविय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव इत्यादी (दैनंदिन पाणीपुरवठा २४ x ७ तास ) – दिनांक २४ मे २०२४ रोजी सकाळी ११.३० ते दिनांक २५ मे २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121