मुंबई, दि.२३ : प्रतिनिधी : जगभरात ख्याती असणारी आणि भारतीय संस्कृतीत पौराणिक महत्व असणारी देवभूमी म्हणून ओळख असलेली उत्तराखंड नगरी होय. हे पाहता आयरसीटीसीने उत्तराखंड टुरिझमच्या सहकार्याने उत्तराखंडमधील विविध पर्यटन स्थळांसाठी आध्यात्मिक प्रवासाची मालिका सुरू केली आहे. या मालिकेत अविश्वसनीय शांत मंदिरे आणि नयनरम्य लँडस्केप्स पाहण्याची संधी मिळणार आहे.
उत्तराखंडच्या धार्मिक आणि सांस्कृतिक पैलू जिज्ञासू प्रवासी आणि यात्रेकरूंना इथल्या सौंदर्यातील आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेण्यास आकर्षित करण्यासाठी आयआरसीटीसी प्रयत्नशील आहे. म्हणूनच आयआरसीटीसीचे मानसखंड टूर पॅकेज उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाच्या सहकार्याने या पर्वतीय प्रदेशातील गूढ आकर्षण, भगवान शिव आणि देवी दुर्गा यांना समर्पित मंदिरांसह या अतुलनीय दिव्य वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी खास तयार केले आहे. यासह नयनरम्य भीमताल किंवा निसर्गरम्य नैनितालच्या टूर पॅकेजच्या शोधात असाल परवडणाऱ्या किमतीत उत्तराखंड दर्शनाचे पॅकेजही आयरसीटीसीने तयार केले आहे.
२२ मे २०२४ रोजी पुण्याहून पहिला दौरा नियोजित करण्यात आला. यामध्ये उत्तराखंडमधील विविध धार्मिक स्थळे अकरा दिवसांच्या प्रवासात दाखविण्यात येईल. ज्यामध्ये भीमताल, अल्मोरा, चौकोरी, चंपावत, नैनिताल यांसारख्या सुंदर आणि निसर्गरम्य स्थळांचा समावेश आहे. यामध्ये मानक श्रेणीसाठी पॅकेज ( एसी रेल्वे प्रवास, नॉन-एसी रोड प्रवास आणि नॉन-एसी निवास) ची किंमत २८०२० रुपये आहे तर डिलक्स श्रेणीची (एसी रेल्वे प्रवास, एसी रोड प्रवास आणि एसी निवास) किंमत ३५३४० रुपये आहे. या ट्रेनमध्ये पुणे, लोणावळा, कल्याण जंक्शन, वासल इन, वापी, सुरत, वडोदरा जंक्शन, रतलाम जंक्शन, उज्जैन जंक्शन, संत हिरडाराम नगर येथे बोर्डिंग/डिबोर्डिंग असेल.
उत्तराखंडच्या विस्मयकारक यात्रात तुम्ही ट्रेनच्या प्रवासात स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. पॅकेजमध्ये ऑनबोर्ड आणि ऑफबोर्ड जेवण, निवास, हस्तांतरण, स्थानिक प्रेक्षणीय स्थळे, प्रवास विमा,ऑनबोर्ड हाउसकीपिंग आणि सुरक्षा, लागू सरकारी कर आणि पूर्णवेळ टूर मार्गदर्शकांच्या सेवांचा समावेश आहे. उत्तराखंडमधील टनकपूर येथे रेड कार्पेट, फुले आणि स्थानिक सांस्कृतिक कलाकारांसह ट्रेनचे भव्य स्वागत होईल. २२ मे रोजी पुणे/मुंबई येथून उत्तराखंडसाठी निघालेल्या पहिल्या प्रस्थानाला २८० प्रवाशांनी प्रतिसाद दिला आहे.