बनावट मतदान करत होता, सनाउल्ला अन् त्याच्या तीन बायका; पोलिसांनी पकडताच कट्टरपंथीयांचा पोलिस स्टेशनवर हल्ला

    23-May-2024
Total Views | 84
 Darbhanga
 
पाटणा : बिहारमधील मधुबनी लोकसभा मतदारसंघात दि. २० मे २०२४ रोजी पाचव्या टप्प्यात मतदान झाले. यावेळी बनावट मतदान टाकताना चार जणांना पकडण्यात आले आहे. त्याच रात्री सुमारे दीडशे लोकांच्या जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला करून चौघांचीही सुटका केली. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे.
 
जाले हा बिहारमधील दरभंगा जिल्ह्याचा एक भाग आहे, परंतु तो मधुबनी लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. मिळालेल्या माहितीनुसार, जाले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हक्कनिया मदरसा देवरा बंधौली या मतदान केंद्रावर चार जणांना बनावट मतदान करताना पकडण्यात आले. या चौघांना जाले पोलीस ठाण्यात आवारात ठेवण्यात आले होते, त्यावेळी सायंकाळी दीडशे जणांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला आणि बनावट मतदान करताना पकडलेल्या चौघांची सुटका केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिंग ऑफिसर निर्भय कुमार यांनी दि. २० मे २०२४ रोजी मतदानादरम्यान गस्त घालत असताना चार लोकांना पकडले होते. या चारही लोकांना त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी जाले पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०३/२४ दाखल करण्यात आला. या प्रकरणात १-सनाउल्ला. वडिलांचे नाव-परवेज आलम, २-सादिया शेख वडील-मो हसन, ३-सालेहा फातिमा वडील मो हसनैन आणि ४-झीनत परवीन वडील मो इजराह, सर्व रहिवासी देवरा बंधौली, ठाणे-जाले, जिल्हा दरभंगा हे बनावट मतदान करताना पकडले गेले. सेक्टर ऑफिसर निर्भय कुमार यांनी चौघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बनावट मतदानात पकडलेल्यांना सोडवण्यासाठी दीडशे लोकांनी पोलिस स्टेशनवर हल्ला केला आणि पोलिस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केले आणि चौघांची पोलिसांच्या ताब्यातून सुटका केली. आता पोलिसांनी एफआयआर क्रमांक १०४/२४ नोंदवला आहे, ज्यामध्ये २४ लोकांच्या नावासहित आणि शंभरहून अधिक अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये याच जमावाने पोलिस स्टेशनवर हल्ला केल्याचे बोलले जात आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघांना अटक केल्यानंतर लगेचच स्थानिक लोकांनी पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घातला, मात्र नंतर पोलिसांनी हे प्रकरण कसेतरी हाताळले. यानंतर रात्री दीडशे जणांनी दुसऱ्यांदा पुन्हा हल्ला केला. पोलिसांना काही समजण्यापूर्वीच जमावाने चारही आरोपींना पोलीस ठाण्यातून बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121