विमा कंपन्यांशी निगडित मोठी अपडेट आता परवानगी.....

संचालक पदी निवड करताना IRDAI ची परवनागी आवश्यक !

    23-May-2024
Total Views | 95

Insurance sector
 
 
मुंबई: विमा क्षेत्राशी निगडीत मोठी अपडेट येत आहे. आता विमा (इन्शुरन्स)कंपन्यांना आपल्या कंपनीच्या संचालकपदी एखाद्या व्यक्तीची निवड करताना त्याची पूर्वपरवानगी Insurance Regulatory Authority of India (आयआरडीएआय) या विमा नियामक मंडळाकडून घ्यावी लागणार आहे.
 
यापूर्वी असा नियम अस्तित्वात नव्हता. परंतु विमा क्षेत्रात अधिक पारदर्शकता येण्यासाठी नियामक मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता संचालक अथवा अध्यक्ष निवडताना कुठलाही विवाद झाल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही याची पूर्वकल्पना देत नियामक मंडळाची परवानगी घेतच आता विमा कंपनीचा संचालकपदी योग्य माणसाची निवड करावी लागणार आहे.
 
तसा आदेश आयआरडीएफआयने पारित केला आहे त्याविषयी निवेदन देताना नियामक मंडळाने म्हटले आहे की, 'बोर्डाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व मंजुरीसाठी सादर केला जाईल. हे परिपत्रक जारी केल्याच्या तारखेपर्यंत विमा कंपनीच्या अध्यक्षांना ३१ मार्च २०२६ पर्यंत किंवा तो किंवा तिचा सध्याचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी असेल तोपर्यंत अध्यक्ष म्हणून राहण्याची परवानगी आहे.'
 
याशिवाय एकाहून अधिक पदावर संचालकाला बसता येणार नाही. त्यासाठीही नियामक मंडळाने तरतूद केली आहे. आरबीआयने देखील अशाच नव्या सुचना बँकिंग क्षेत्रासाठी याआधी दिल्या होत्या.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121