मोठी बातमी: एनएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल USD 5 ट्रिलियन पार

कंपनीचा निफ्टी ५० निर्देशांक २२९९३.६० या विक्रमी पातळीवर

    23-May-2024
Total Views | 36

NSE
 
 
मुंबई: एनएसईत (NSE) मध्ये पहिल्यांदाच कंपन्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ५ ट्रिलियन डॉलरवर (४१६.५७ लाख कोटी )पोहोचले आहे. याच दिवशी कंपनीचा निफ्टी ५० निर्देशांक २२९९३.६० या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ५०० निर्देशांक देखील २१५०५.२५ या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. या वाढीतून इक्विटी बाजारात केवळ लार्जकॅप सम भागात होत नसून मिड व स्मॉल कॅपमध्ये देखील वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
 
जुलै २०१७ मध्ये एनएसईमधील कंपन्यांचे बाजार भांडवल २ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये हे ३ ट्रिलियन होण्यासाठी ४६ महिने लागले होते ज्यामध्ये बाजारात वाढ भांडवल मार्च २०२१ मध्ये ३ ट्रिलियन डॉलर झाले त्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये ३० महिन्यांनी कंपन्याचे बाजार भांडवल ४ ट्रिलियन झाले व आता पुढील सहा महिन्यांत एक ट्रिलियनने गुंतवणूक वाढत ५ ट्रिलियनवर बाजार भांडवल पोहोचले आहे.गेल्या १० वर्षात निफ्टी ५० निर्देशांकाने १३.४ टक्क्यांनी परतावा दिला आहे.
 
त्याचकाळात घरगुती म्युच्युअल फंडात (व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्तेत) (Asset Under Management) तब्बल ५०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ एप्रिल २०१४ मधील ९.४५ ट्रिलियनवरून एप्रिल २०२४ मध्ये ५७.२६ ट्रिलियनवर पोहोचले आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FPI) यांच्या व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्तेत एप्रिल २०१४ मधील १६.१ ट्रिलियन वरून वाढ होत एप्रिल २०२४ पर्यंत ७१.६ ट्रिलियन रुपयांवर वाढ झाली आहे.
 
बाजार भांडवलाबाबत केवळ मोठ्या नामांकित कंपन्याच नाही तर वेगवेगळ्या समभागात (Stocks) मध्ये वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एप्रिल २०१४ मध्ये बाजार भांडवलाचा ७४.९ टक्के तुलनेत निफ्टी १०० निर्देशांकातील घटक वाटा बाजारभांडवलाच्या ६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. प्राथमिक बाजारपेठेत लघु आणि मध्यम उद्योगांसह कॉर्पोरेट्सद्वारे संसाधनांची जमवाजमव उत्साहवर्धक आहे आणि निधी उभारणीच्या पारंपारिक पद्धतींव्यतिरिक्त एक प्रभावी पर्यायी यंत्रणा उपलब्ध करून दिल्याचे एकूण चित्र आहे.
 
कॅपिटल मार्केटमधील तरलता (Liquidty) वाढल्याचे चित्र आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये दैनंदिन सरासरी उलाढाल आर्थिक वर्ष २०१५ मधील ४.५ वेळा वाढून १७८१८ कोटींवर पोहोचले असताना मात्र आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत वाढत ८१७२१ कोटींवर पोहोचले आहे.या मैलाचा दगड साध्य करणे व मोठी कामगिरी हे भारतातील अमृत कालच्या दृष्टीकोनाचा एक पुरावा आहे ज्यामध्ये मजबूत सार्वजनिक वित्त आणि मजबूत आर्थिक क्षेत्रासह तंत्रज्ञान-चालित आणि ज्ञान-आधारित अर्थव्यवस्था समाविष्ट आहे.
 
एक्सचेंजने मध्यंतरी निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्सवर डेरिव्हेटिव्हदेखील सुरु केले होते. या लॉन्चसह, एक्सचेंजने निफ्टी ५० इंडेक्स, निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट इंडेक्स या 3 ब्रॉड मार्केट इंडेक्सवर डेरिव्हेटिव्ह प्रदान केले आहेत जे मार्केटच्या मोठ्या आणि लिक्विड मिड कॅपिटलायझेशन सेगमेंटचे योग्य प्रतिनिधित्व करतात.
 
याविषयी प्रतिक्रिया देताना श्रीराम कृष्णन मुख्य व्यवसाय अधिकारी एनएसई म्हणाले की, 'मी भारत सरकार, सिक्युरिटीज एक्स्चेंज ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांना प्रगतीशील नियामक फ्रेमवर्कसह भांडवल बाजार परिसंस्थेला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद करू इच्छितो. हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल मी सूचीबद्ध कंपन्यांचे, ट्रेडिंग सदस्यांचे, गुंतवणूकदारांचे आणि इतर सर्व भागधारकांचेदेखील अभिनंदन करतो.
 
सहा महिन्यांच्या कालावधीत बाजार भांडवलात नवीन १ ट्रिलियनने होणारी वाढ ही भारतीय अर्थव्यवस्थेवरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हिंदू धर्मात  घरवापसी

५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हिंदू धर्मात घरवापसी

Hinduism उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील स्वामी यशवीर महाराज यांनी एका कुटुंबातील १० मुस्लिम सदस्यांना हिंदू धर्मात घरवापसी केल्याची हिंदूंसाठी आनंदवार्ता आहे. स्वामी यशवीर यांनी शांती करत सर्व १० जणांची इस्लाममधून हिंदू धर्मात घरवापसी केली. ते ५० वर्षांपासून देवबंदमध्ये राहणाऱ्या कश्यप समुदायातील एका महिलेने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यावेळी त्या महिलेचा विवाह हा मुस्लिम व्यक्तीसोबत झाला होता. ती अनेकदा पालकांच्या घरीच वास्तव्य करायची. यामुळे तिच्या सासरच्यांना याबाबत मोठा आक्षेप असायचा. संबंधित..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121