शेअर बाजार विश्लेषण: निवडणूकीपूर्व शेअर बाजारात चढता गिअर ! सेन्सेक्स २६७.७५ अंशाने व निफ्टी ९३.२० अंशाने वाढला

बँक निर्देशांकात घसरण कायम! तर मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये संमिश्र प्रतिसाद, रियल्टी , एफएमसीजी समभागात वाढ तर मेटल, फायनांशियल सर्विसेसमध्ये घसरण

    22-May-2024
Total Views | 27

Stock Market
 
मोहित सोमण: सकाळप्रमाणे आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. बाजारातील सकारात्मकता कायम राहत आज सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांक २६७.७५ अंशाने (०.३६%) वाढत ७४२२१.०६ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी निर्देशांक ९३.२० अंशाने वाढत (०.४१ %) वाढत २२६२२.२५ पातळीवर पोहोचला आहे. आज मात्र सेन्सेक्स निफ्टी बँक निर्देशांकात घसरण कायम राहिली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक २४३.७७ अंशाने घसरण होत ५४६९८.३२ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक १३७.०५ अंशाने घसरत ४७९१११.१५ पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसई मिडकॅपमध्ये ०.०१ टक्क्यांनी घसरण झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये ०.१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईत मिडकॅपमध्ये ०.२२ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये ०.३० टक्क्यांनी घसरण झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात
(Sectoral Indices) मध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सर्वाधिक वाढ एफएमसीजी (१.४३%), रियल्टी (१.४१%), आयटी (०.७०%) समभागात वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.६१%), मेटल (०.६२%), फायनाशियल सर्विसेस (०.५२%) समभागात घसरण झाली आहे.
 
आज बीएसईत एकूण ३९४८ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १९०६ समभाग (Shares) वधारले असून १९२३ समभागात घसरण झाली आहे. २५२ समभागातील मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक घसरण ३० समभागात झाली आहे. २९४ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर २५० समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
एनएसईत आज २७२६ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १३१९ समभागात वाढ झाली आहे तर १२९५ समभागात आज घसरण झाली आहे. १४५ समभागात ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक वाढ झाली आहे तर १७ समभागातील ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण १३० समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ७१ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४१६.०२ लाख कोटींवर पोहोचले आहे तर एनएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल ४१०.९८ लाख कोटींवर पोहोचले आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वधारल्याने भारतीय रुपया ८३.५२ रुपयांवर स्थिरावला होता.
 
याशिवाय आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रूड तेलाच्या निर्देशांकात सकाळी घट झाल्याने बाजारात क्रूड तेलाची किंमत घसरली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मध्य आशियातील इराणच्या अध्यक्ष इब्राहिम रैयसी यांच्या निधनानंतर बाजारात अस्थिरता होती. मात्र ओपेक राष्ट्रांनी १ जूनपर्यंत क्रूड (कच्च्या) तेलाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी महत्वाची बैठक बोलावली होती. दुसरीकडे आकडेवारीनुसार जगातील कच्च्या तेलाच्या साठ्यात वाढ होऊन मागणीत घट झाल्याने सकाळीच तेलाची किंमत घसरली होती. याशिवाय डॉलरची घसरण व अमेरिकन महागाई व्याज दर कपात होण्याची अपेक्षा लांबणीवर पडल्याने क्रूड स्वस्तच राहिले आहे.
 
संध्याकाळपर्यंत WTI Future क्रूड निर्देशांकात ०.६६ टक्क्यांपर्यंत घसरण होत निर्देशांक ७८.१३ पातळीवर पोहोचला आहे तर Brent निर्देशांकात ०.६६ टक्क्यांनी घसरण होत निर्देशांक ८२.३३ पातळीवर पोहोचला आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात ०.७८ टक्क्यांनी घसरण होत ६५१७.०० प्रति बॅरेलवर तेलाचे दर पोहोचले आहेत.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या दरात देखील संध्याकाळपर्यंत घसरण झाली आहे. युएस ल्ड स्पॉट दरात ०.१९ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२३ टक्क्यांनी घट होत सोने २४२०.५० प्रति बॅरेलवर पोहोचले होते. भारतातील एमसीएक्स निर्देशांकात सोन्याच्या निर्देशांकात ०.१७ टक्क्यांनी घसरण होत सोने दर ७३८९२.०० पातळीवर पोहोचले आहेत. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतातील २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम कुठलाही बदल न होता सोने ६८३०० रुपयांवर कायम राहिले आहे तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम दरात कुठलाही बदल न होता सोने ७४५१० रुपयांवर कायम राहिले आहेत. मुंबईतील सोन्याच्या दरातही कुठलाही बदल झालेला नाही.
 
आंतरराष्ट्रीय बाजारातील संमिश्र प्रतिसाद कायम असताना आज भारताने मात्र सकारात्मक संकेत दिले आहेत. येणाऱ्या तिमाहीत निकालाबाबत गुंतवणूकदार सकारात्मक व यापूर्वी जाहीर झालेल्या निकालावर समाधानी दिसत आहेत परिणामी भारतातील गुंतवणूकदारांमध्ये विश्वास दिसला आहे. याशिवाय आज दिवसांच्या अखेरीस फेडरल रिझर्व्ह व्याजदर बैठकीबाबत मिनिटं जाहीर होण्याची शक्यता असल्याने बाजाराने अधिक सकारात्मकता दाखवली आहे. काल युएस शेअर बाजारातील Dow Jones, NASDAQ, S & P 500 या तिन्ही बाजारात वाढ झाली आहे तर युरोपातील शेअर बाजारात FTSE 100, DAX, CAC 40 या समभागात घसरण झाली आहे. आशियाई बाजारातील NIIKEI, HANG SENG बाजारात घसरण झाली आहे तर SHANGHAI बाजारात वाढ झाली आहे.
 
आज विशेषतः ब्लू चिप्स कंपनीच्या समभागात वाढ झाली असली तरी मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरलेल्या निर्देशांकानंतर ठराविक पातळीवर निर्देशांक पोहोचला आहे. बँक निर्देशांकात मात्र घसरण झाल्याने निवडणूक निकालापर्यंत बँक निर्देशांक वाढू शकतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ब्लू चिप्समध्ये वाढलेल्या समभागात ८ ते १३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे तर घसरलेल्या समभागात ५ ते ८.२० टक्क्यांपर्यंत समभागात घसरण झाली आहे. युरोप बाजारात घसरण झाल्यामुळे युरोपातील यील्डमध्ये घट झाली आहे.आशियाई बाजारात दबाव कायम राहिला असला तरी देखील भारतातील बँक निर्देशांकात आगामी काळात सुधारणा झाल्यास बाजारात वाढ होऊ शकते हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना, जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, ' यूएस फेड मिनिटांपूर्वी जागतिक बाजारातील संमिश्र भावना असूनही,भारतीय बाजारांनी सूक्ष्म सकारात्मक कल दर्शविला. स्थिर Q4 कमाई आणि पूर्वी वाढलेली अस्थिरता कमी करणाऱ्या निवडणुकीतील गोंधळ कमी करण्याबद्दल गुंतवणूकदार आशावादी आहेत. FMCG क्षेत्रातील स्वारस्य वाढले आहे. मॉन्सून लवकर सुरू झाला तरीसुद्धा, FII बाजूला राहून, निवडणुकीच्या निकालाची वाट पाहत असल्याने बाजारांची कामगिरी कमी होऊ शकते.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले, 'बाजार दुसऱ्या सत्रासाठी अस्थिर राहिले परंतु माफक नफ्यासह समाप्त झाले. सपाट सुरुवात झाल्यानंतर, निफ्टी बहुतांश सत्रात एका अरुंद श्रेणीत चढ-उतार झाला, तो २२५८६ वर बंद झाला. एफएमसीजी आणि रियल्टीने चांगला नफा दाखवल्याने क्षेत्रातील ट्रेंड मिश्रित होते, तर मेटल आणि बँकिंग मागे राहिले. व्यापक निर्देशांक समान पॅटर्नचे प्रतिबिंबित करतात, परिणामी बाजाराची रुंदी सपाट होते.
 
सर्व प्रमुख क्षेत्रे निर्देशांकाच्या पुनर्प्राप्तीमध्ये योगदान देत आहेत, परंतु बँकिंग क्षेत्राची कामगिरी कमी असल्यामुळे गती मर्यादित आहे. बाजारातील घसरगुंडी दरम्यान, निफ्टी निर्देशांक लवकरच त्याच्या विक्रमी उच्चांकाची पुनरावृत्ती करेल असा आम्हाला अंदाज आहे. दर्जेदार स्टॉक जमा करण्यासाठी घट किंवा एकत्रीकरणाचा कालावधी वापरून आम्ही स्टॉक-विशिष्ट दृष्टिकोनाची शिफारस करत आहोत.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना,असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव एनालिस्ट हृषिकेश येडवे म्हणाले, 'देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक एका अंतराने उघडले आणि दिवसभर स्थिर राहिले. परिणामी निफ्टी २२५९८ वर सकारात्मक पातळीवर बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांक ३४-दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज (३४-DEMA) च्या वर आहे, जो २२३४० च्या जवळ आहे, आणि अपेक्षेप्रमाणे त्याची वरची वाटचाल सुरू ठेवली आहे. तथापि, २२८०० च्या आसपास, निर्देशांकाने पूर्वी एक मंदीची गुंफणारी मेणबत्ती तयार केली आहे. त्यामुळे अल्पावधीत निर्देशांक २२३००-२२८०० च्या बँडमध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी उच्च पातळीवर सावध राहावे.
 
बँक निफ्टी निर्देशांक एका अंतराने उघडला परंतु उच्च स्तरावर टिकू शकला नाही,परिणामी नफा बुकींग झाला आणि दिवसाचा दिवस नकारात्मक 47,782 वर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या,बँक निफ्टी 48,040 पातळीच्या त्याच्या 21-दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज (21-DEMA) खाली बंद झाला आणि त्याच्या खाली टिकून राहिला, जे कमकुवतपणा दर्शवते. नकारात्मक बाजूने, 100-दिवसांची घातांकीय मूव्हिंग सरासरी (100-DEMA) 47,180 च्या जवळ आहे. अशा प्रकारे,अल्पावधीत निर्देशांक 47,180-48,260 च्या श्रेणीत एकत्र येण्याची आम्हाला अपेक्षा आहे'
 
सोन्याच्या हालचालीवर व्यक्त होताना जे एम फायनांशियल सर्विसेसचे ईबीजी कमोडिटी व करंसी रिसर्च प्रणव मेर म्हणाले 'खरेदी समर्थनावर सुरुवातीच्या घसरणीतून आणि त्याच्या अंतर्निहित सकारात्मक प्रवृत्तीच्या अनुषंगाने सोने सावरले, फेडच्या सप्टेंबरच्या बैठकीत दर कपातीच्या अपेक्षेने यूएस मौद्रिक धोरणावरील मत भिन्नतेने समर्थित, तर फेड अधिकाऱ्यांचे मत आहे की महागाई २% च्या खाली येईपर्यंत दर अधिक काळ जास्त राहावेत. सराफाला आणखी समर्थन जोडणे म्हणजे जागतिक स्तरावर ETF शोधकांमध्ये नवीन खरेदी आणि मध्य-पूर्व तणावामुळे सुरक्षित-आश्रय खरेदी, तथापि, सध्याच्या किमतींवर भौतिक मागणी कमकुवत राहण्याची अपेक्षा आहे. तांत्रिकदृष्ट्या, ७३७००/७३५८० च्या वरपर्यंत कल सकारात्मक राहील, वरच्या किमती ७४२००-७४५००० ची चाचणी घेऊ शकतात.'
 
रुपयांच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, 'रुपयाने सकारात्मक व्यवहार केला, ०.०५ रुपये वाढून ८३.२७ वर बंद झाला. सध्याच्या सरकारच्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्याच्या भाकितांनी रुपयाच्या स्थिरतेला आणि मजबूतीला हातभार लावला आहे, ज्याला भांडवली बाजारातील DII च्या खरेदीच्या उत्साहाने पाठिंबा दिला आहे. याव्यतिरिक्त, मऊ क्रूडच्या किमती आणि स्थिर डॉलर निर्देशांक यामुळे रुपयाला बळ मिळाले आहे. रुपयाची अपेक्षित श्रेणी ८३.०० आणि ८३.५० दरम्यान आहे, दररोज अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.'
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121