'शिवचरित्र अभ्यासवर्ग कार्यशाळा' आपल्या नवी मुंबईत!
22-May-2024
Total Views | 30
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Shivacharitra Abhasvarg Karyashala) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व शिवशंभु विचार मंच, कोंकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईत 'शिवचरित्र अभ्यासवर्ग कार्यशाळा' आयोजित करण्यात आली आहे. रविवार, दि. २६ मे रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत रेड मॅजीक सभागृह, युरो स्कुल समोर, से-१९, ऐरोली याठिकाणी सदर कार्यशाळा संपन्न होईल.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र अभ्यासक दृष्टीने पाहण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल या भागातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, मंडळ/संस्था प्रतिनिधी, इतिहास अभ्यासक इतर नागरिक यांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यशाळेचे प्रवेश शुल्क विद्यार्थ्यांसाठी १०० रु. व इतरांसाठी २०० रु. आहे. https://forms.gle/uMRxphCSmRJvPFfC8 या लिंकवर आपण आपले नोंदणी अर्ज भरू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : पंकज भोसले : ९८२१००९१३७