पोखर्णीत 'नृसिंह जन्मोत्सवा'ची' रंगत; भाविकांची मोठी गर्दी

    22-May-2024
Total Views |

Shri Nrusinha Kshetra Pokharni

मुंबई (प्रतिनिधी) :
श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी (Nrusinha Pokharni) हे परभणी येथील एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मंगळावार, दि. २२ मे रोजी याठिकाणी श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो भाविकांनी येथे सोहळ्यासाठी गर्दी केल्याने यात्रेचे स्वरूप येथे आले होते. यावेळी 'नरहरी शामराज की जय'चा जयघोषात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक जन्मोत्सवादरम्यान पोखर्णीत आले होते. नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केल्याने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. भविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

Shri Nrusinha Kshetra Pokharni