शेअर बाजार विश्लेषण: निकालांच्या धाकधूकीत बाजारात सावध पवित्रा सेन्सेक्स ५२.६३ अंशाने घसरला तर निफ्टीत २७.०५ अंशाने वाढ

मेटल, मिडिया, तेल गॅस समभागात वाढ तर एफएमसीजी, फायनांशियल सर्विसेस समभागात घसरण,मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये नवीन विक्रम !

    21-May-2024
Total Views | 47

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. अखेरच्या सत्रात सकाळप्रमाणेच मरगळ कायम राहत गुंतवणूकदारांनी पडझडीकडे अधिक कौल दिला आहे. एस अँड पी सेन्सेक्स अखेरीस ५२.६३ अंशाने घसरत ७३९५३.३१ पातळीवर स्थिरावला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक २७.०५ अंशाने वाढत २२५२९.०५ पातळीवर स्थिरावला आहे. मुख्यतः दोन्ही सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात घसरण झाल्याने बाजारात मरगळ कायम होती. सेन्सेक्स बँक निर्देशांक १२१.०७ अंशाने घसरत ५४९४२.०९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांकात १५१.३० अंशाने घसरण होत ४८०४८.२० पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसईतील मिडकॅप ०.३४ टक्क्यांनी वाढला आहे तर स्मॉलकॅपमध्ये ०.१८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. दुसरीकडे एनएसईत मिडकॅपमध्ये ०.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे तर स्मॉलकॅपमध्ये ०.४९ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये गुंतवणूकदारांचा संमिश्र प्रतिसाद ' समभाग विशेष ' राहिला आहे. मेटल (३.८८%) समभागात सर्वाधिक वाढ झाली असून त्याशिवाय मिडिया (१.२५%), तेल गॅस (०.५९%), हेल्थकेअर (०.४३%) समभागात मोठी वाढ झाली असून एफएमसीजी (०.४५%), फायनांशियल सर्विसेस (०.३०%),0 फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.२७%), बँक (०.३१%) समभागात मोठी घसरण झाली आहे.
 
बीएसईत आज एकूण ४०८७ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १६२१ समभाग वधारले असून २३१४ समभागात घसरण झाली आहे. ५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकन २९६ समभागाचे कायम राहिले आहे तर ३३ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. ३६२ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर २५४ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
एनएसईत आज २७८८ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील ११३६ समभाग वधारले असून १५४६ समभागात घसरण झाली आहे. त्यातील २०२ समभाग ५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकनात राहिले आहेत तर २५ समभागाचे मूल्यांकन आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरले आहेत. एकूण १४९ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १०३ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
आज जागतिक पातळीवर मध्य आशियातील घडामोडीनंतर बाजारात क्रूड तेलाच्या मागणीत घट झाली आहे. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रैयसी यांच्या निधनानंतर व सौदीतील मागणीत घट झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे.
 
संध्याकाळपर्यंत WTI Future क्रूड निर्देशांकात १.२९ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर ब्रेंट क्रूड निर्देशांकात १.३१ टक्क्यांनी घसरण झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.५३ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे एमसीएक्सवर क्रूड तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने प्रति बॅरेल किंमत ६५४४ रुपयांवर पोहोचली आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉलरच्या किंमतीत घसरण झाल्यानंतर आज भारतीय रुपया वधारला होता. अखेरीस रुपया प्रति डॉलर ८३.३२ रुपयांवर पोहोचला आहे.या घटनेनंतर सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या युएस गोल्ड स्पॉट दरात ०.३८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.७४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. भारतातील एमसीएक्स निर्देशांकात सोने ०.५४ टक्क्यांनी घसरत ७३९६९.०० पातळीवर पोहोचले आहे.
 
बीएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation)४१४.५८ लाख कोटी होते तर एनएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल ४१०.९८ लाख कोटी होते. शनिवारपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बीएसईत १५२.८७ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती. तर एनएसईतील परदेशी गुंतवणूकदारांनी ९२.९५ कोटींची गुंतवणूक काढून घेतली होती.
 
आज शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक काढून घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. निवडणूकीचा पाचवा टप्पा पार पडल्यानंतर निकालातील अनिश्चितता कायम राहिल्याने ही गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता आहे.आज बाजारातील नकारात्मक प्रतिसाद सकाळपासून कायम राहिला होता. प्री ओपनिंग ट्रेडिंग सत्रापूर्वीच गिफ्ट निफ्टी ४० अंकांनी घसरल्याने बाजारातील अनिश्चितता कायम राहिली होती.
 
दुसरीकडे कालपर्यंत DoW Jones NASDAQ या युएस शेअर बाजारात उच्चांक प्रस्थापित झाल्याने आशियाई बाजारातील दबाव वाढला होता. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यताही नोव्हेंबरमध्ये पुढे ढकलली गेल्याने बाजारात उच्चांक होण्यासाठी आवश्यक ती कुठलीही मोठी घडामोड झालेली नाही. आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला बहुमत मिळेल की नाही याची चाचपणी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी सावधतेने गुंतवणूक केली होती. दुसरीकडे काही तिमाही निकालावर संमिश्र प्रतिसाद येत असतानाच व आगामी काही कंपन्यांचा तिमाही निकाल बाकी असतानाच बाजारात चढ उतार अपेक्षित आहे. आज VIX Volatility निर्देशांक ३.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
मुख्यतः लार्जकॅप निर्देशांकापेक्षा मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण झाल्याने बाजारात रॅली होऊ शकली नाही. याशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता लांबल्याने व अमेरिकन नव्या बैठकीत फेडरल रिझर्व्ह बँक उपाध्यक्ष फिलिप जेफरसन यांनी 'महागाई दर घसरला तरी तो सातत्याने राहिलं की नाही याची शाश्वती नसल्याने इतक्यात रेट कट होणाची शक्यता नाही' असे विधान केल्याने बाजारात तितकासा उत्साह राहिलेला नाही. किंबहुना युरोपातील व आशियाई बाजारात शेअर बाजारात घसरण झाली होती.
 
अखेरीस युएस S& P 500, NASDAQ या बाजारात वाढ झालेली असून Dow Jones मध्ये किंचित घसरण झाली होती. तर युरोपातील FTSE 100, CAC, DAX 40 बाजारात घसरण झाली आहे तर आशियाई बाजारातील SHANGHAI, NIKKEI, HANG SENG या तिन्ही बाजारात घसरण झाली आहे. मुख्यतः हेवी वेट शेअर्समध्ये टाटा स्टील, हिंदाल्को, कोल इंडिया या समभागात वाढ झाली असून आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टीसीएस समभागात घसरण झाल्याने व मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण झाल्याने बाजारात घसरण कायम राहिली आहे.
 
आज अखेरच्या सत्रात बीएसईत व एनएसईत घसरण झाली असली तरी ट्रेडिंग दरम्यान बीएसईतील बाजार भांडवल विक्रमी अंकांनी वाढत ५ ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचले आहे. तसेच बीएसई मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ४३२२३.६९ व स्मॉल कॅपमध्ये ४८०९९.२९ पातळीवर पोहोचल्याने हा नवा विक्रम प्रस्थापित झाला होता.एका सत्रात गुंतवणूक २ लाख कोटींनी कमाई केली परंतु अखेरच्या टप्प्यात मात्र बाजारात घट होत निर्देशांक घसरला आहे.
 
बीएसईत आज टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील,पॉवर ग्रीड,एनटीपीसी, एसबीआय, सनफार्मा, एशियन पेंटस, टेक महिंद्रा, एम अँड एम, एचसीएलटेक, कोटक महिंद्रा, भारती एअरटेल, रिलायन्स, विप्रो, टाटा मोटर्स या समभागात वाढ झाली आहे तर नेस्ले, मारूती सुझुकी, टीसीएस, एचयुएल,आयसीआयसीआय बँक, लार्सन, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत हिंदाल्को, कोल इंडिया, टाटा स्टील, अदानी पोर्टस, पॉवर ग्रीड, अदानी पोर्टस, पॉवर ग्रीड, सिप्ला, डिवीज, अदानी एंटरप्राईज, ब्रिटानिया, एनटीपीसी, टेक महिंद्रा, एसबीआय, एम अँड एम, सनफार्मा, ग्रासीम, ओएनजीसी, एचसीएलटेक, श्रीराम फायनान्स, कोटक महिंद्रा, बजाज फायनान्स या समभागात वाढ झाली आहे. तर नेस्ले, हिरो मोटोकॉर्प, मारूती सुझुकी, आयसीआयसीआय बँक,टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, एचयुएल, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयटीसी, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, अपोलो हॉस्पिटल या समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'अमेरिकन बाजार डाउ जोन्सने उच्चांक दाखवत थोडाफार नफा वसुली केलेली आपल्याला पहायला मिळाली. आपल्याकडेही आज मागील आठवड्या तील कमाईची वसूली होत बाजार फ्लॅट बंद झाला आहे. कच्चे तेलही आज कमी झालं आहे. निवडणूकीचे पाच टप्पे पूर्ण झालेले आहे.स्थिर सरकार येणार म्हणून बाजार बर्‍यापैकी वाढला आहे. सरकारी कंपन्या जोरात आहेत.
 
एकंदरीत बाजारासाठी वातावरण आज तरी पोषक आहे.परंतू रविवारी इराणचे राष्ट्रपती व परराष्ट्र मंत्री यांचे हेलीकॉप्टरच्या अपघातात झालेले मृत्यू मनात शंका निर्माण करत आहेत.परत युद्धाचे ढग जमतात की काय अशा शंका यायला लागल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर ईराणला बाहेर पडुन काही कारवाई करणे करीता निश्चितच खुप वेळ लागेल. अपघात आहे का घातपात आहे हे नक्की तपासावे लागेल. तसेच या घटनेचे परिणाम बाकी बाजारावर काय होतात त्यावर लक्ष ठेवावे लागेल. थोडक्यात थोडे सावध रहावे लागेल. 4 जूनपर्यंत बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील. '
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च निरज शर्मा म्हणाले, 'निफ्टी मंगळवारी खाली घसरणीसह उघडला, परंतु सुरुवातीच्या घसरणीनंतर,निर्देशांकाने तेजीच्या पूर्वाग्रहासह एकत्रीकरण पाहिले आणि दिवसाला २२५२९ स्तरांवर सकारात्मक नोटवर सेट केले. तांत्रिक दृष्टीकोनातून, निर्देशांकाने वर मजबूत पकड राखली आहे. ३४-दिवस एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज (३४-DEMA), जे २२३३५ स्तरांवर आहे, तथापि, आम्ही हळूहळू २२८०० च्या मागील प्रतिकारापर्यंत पोहोचत आहोत, याशिवाय, २१.८१ पर्यंत,भारत VIX ६.२६% वर आहे. परिणामी वाढीव अस्थिरता, व्यापाऱ्यांना उच्च पातळीवर सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.
 
बँक निफ्टी कमकुवत नोटेवर उघडला, परंतु सुरुवातीच्या अस्वस्थतेनंतर, निर्देशांकाने गती मिळवली परंतु ती टिकवून ठेवण्यात अपयशी ठरला आणि शेवटी ४८०४८ वर किरकोळ नकारात्मक नोटवर स्थिरावला. अल्पकालीन दृष्टीकोनातून बँक निफ्टी ४८५०० -४८७०० पर्यंत वाढेल.'
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, 'यूएस फेडच्या अधिका-यांच्या सावध टिप्पण्यांमुळे गुंतवणूकदारांच्या भावनेवर तोल गेल्याने देशांतर्गत बाजाराने एका बाजूचा कल अनुभवला आणि आज तीन दिवसांच्या नफ्याचा सिलसिला थांबवून एका सपाट नोटेवर निष्कर्ष काढला. जसजशी सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात येत आहे, तसतसे अस्थिरता उंचावत राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, सतत अस्थिरता असूनही, बाजाराने मागील शिखरावरील नुकसान जवळपास भरून काढले आहे. वस्तूंच्या किमती वाढल्याने धातूच्या समभागात तेजी दिसून आली, तर मिडकॅप निर्देशांकाने नवीन उच्चांक गाठला.'
 
बाजारावर विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले,' आज निफ्टी सकारात्मक नोटवर ०.१२% ने २२५२९ वर बंद झाला तर सेन्सेक्स ०.०७ % नी ७३९५३ वर बंद झाला.निफ्टी मेटल,पीएसयू बँक अनुक्रमे ३.८८% आणि १.५१% ने सर्वोच्च कामगिरी करणारे क्षेत्रीय निर्देशांक होते.
 
BSE वेबसाइटवरील माहितीनुसार, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज $5 ट्रिलियनच्या नवीन उच्चांकावर पोहोचले आहे, जे या वर्षी प्रथमच $5 ट्रिलियनचा टप्पा ओलांडले आहे आणि या वर्षाच्या सुरूवातीपासून $६३३ अब्ज पेक्षा जास्त वाढले आहे.BSE मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांक नवीन उच्चांकावर पोहोचले आहेत, जरी फ्लॅगशिप सेन्सेक्स निर्देशांक अजूनही त्याच्या शिखराच्या १.६६ % मागे आहे.
 
भारतीय रोखे जूनमध्ये JPMorgan च्या जागतिक निर्देशांकात समाविष्ट केले जातील. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीच्या (FPI) प्रवाहाच्या अप्रत्याशित स्वरूपामुळे उद्भवलेल्या बाँड बाजारातील अस्थिरतेबद्दल चिंता. तथापि, वित्त मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा असा दावा आहे की "हॉट मनी" बद्दल चिंता गंभीर नाही कारण विदेशी गुंतवणूकदारांनी एफएआर (फुल ॲक्सेसिबल रूट स्टँड) अंतर्गत तुलनेने कमी गुंतवणूक केली आहे.
 
क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) कडील डेटा दर्शवितो की २० मे पर्यंत, FAR अंतर्गत गुंतवणूक १.६३ लाख कोटी रुपये होती.नेस्ले, हीरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक आणि टीसीएस हे निफ्टीमध्ये सर्वाधिक तोट्यात आहेत, तर हिंदाल्को, कोल इंडिया, जेएसडब्लू स्टील, टाटा स्टील आणि अदानी पोर्ट हे फायदेशीर आहेत.'
 
बाजारातील रुपयांच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, 'रुपयाने सकारात्मक व्यवहार केला, ०.०६ रुपये वाढून ८३.३१ वर बंद झाला. या ताकदीचे श्रेय सध्याच्या सरकारच्या सार्वत्रिक निवडणुका जिंकण्याच्या भाकितांमुळे आहे, ज्यामुळे स्थिरता वाढली आहे. याव्यतिरिक्त, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) सक्रियपणे भांडवली बाजारात खरेदी करत आहेत. सॉफ्ट क्रूडच्या किमती आणि स्थिर डॉलर निर्देशांकानेही रुपयाला आधार दिला आहे.'
 
बाजारातील सोन्याच्या दराविषयी एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले,' अलिकडच्या काही दिवसांत सोन्याच्या किमतींनी व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे, उच्च दरांकडे दीर्घ कालावधीनंतर यूएस चलनवाढीच्या आकडेवारीत घट झाल्यामुळे या शिफ्टमुळे फेडरल रिझर्व्ह दर कमी करू शकेल अशी अटकळ निर्माण झाली आहे. याव्यतिरिक्त, इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाच्या भीतीमुळे सोमवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे अस्थिर राहण्यासाठी, नजीकच्या काळात किंमती ७१०००आणि ७५०००च्या दरम्यान असू शकतात.'
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121