रोहिंग्यांनी जाळली पाच हजार हिंदूंची घरे! १८०० ओलीस

म्यानमारमध्ये सैन्यावर हिंसाचार घडविल्याचा आरोप

    21-May-2024
Total Views | 4307

Myanmar
 
 
नायपीडाव : म्यानमारच्या रखाईन भागात सैन्य आणि विद्रोही गटाच्या झडपेत धार्मिक हिंसाचार उफाळून आला आहे. या तणावामुळे रोहिंग्यांनी हिंदू आणि बौद्ध समाजाची ५ हजार घरे आगीत भस्मसात केली आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ बिगर मुस्लीमांची घरे लक्ष्य करण्यात आली. या सर्वांनी घरे सोडून पळून जावे, वाड्या वस्त्या रिकामी व्हाव्यात या मनसुब्याने रचलेला कट होता, अशीही प्रार्थमिक माहिती आहे. या संपूर्ण प्रकारला घुसखोर रोहिंग्या कारणीभूत आहेत, असे म्हटले जात आहे.
 

 
ही संपूर्ण घटना ११ एप्रिल ते २१ एप्रिलच्या दरम्यान बांग्लादेशच्या सीमेपासून केवळ २५ किमी दूर बिथिदौंग या भागात घडली. २०१८च्या जनगणनेनुसार, या भागात तीन हजार घरे होती. आता ही संख्या १० हजारांच्या पार केली आहे. तर या दहा हजारांपैकी ५० टक्के लोकवस्ती रोहिंग्या मुस्लीमांची आहे. ज्यांनी उर्वरित बिगर मुस्लीमांच्या घरांवर हल्ला चढवला, अशी माहिती आहे. रखाईन या राज्यात कुठल्याही प्रकारे धार्मिक हिंसाचाराची गोष्ट कुणी करत नाही. पण इथे हिंदुंचे पलायन केले जात आहे. यापूर्वी बुथिडुआंग या भागात १६००हून अधिक हिंदू आणि १२० बौद्ध समाजातील लोकांना बंधक बनवले आहे.
 
 
एका अहवालानुसार, म्यानमारच्या फौजांनीच इस्लामिक कट्टरपंथींना हे काम सुपूर्द केले होते. जनतेत अस्थिरता निर्माण करून धर्माच्या आधारे जनतेला लक्ष्य करण्यास सांगितले जात आहे. हिंदूंचा नरसंहार करण्यासाठी म्यानमारमध्ये हिंदूविरोधी शक्ती काम करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. शंभर जणांच्या रोहिंग्यांच्या समुहाला सैनिकी प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रे देऊन हा कट रचण्यात आल्याच्याही बातम्या आहेत.


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121