मुंबई : एकीकडे लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु असताना उबाठा गटाच्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. भांडूपमध्ये डमी मशीनचे प्रात्यक्षिक दाखवल्याप्रकरणी उबाठाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. दरम्यान, मतदानावेळीच भिवंडीमध्ये उबाठा गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी डमी मशीनचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. त्यामुळे त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.