ऐकावं ते नवलचं! काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी केली खर्गेंच्या फोटोवर शाईफेक

    20-May-2024
Total Views | 42
Kharge

नवी दिल्ली
: पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या पोस्टरवर त्यांच्याच राष्ट्रीय अध्यक्षांच्या चेहऱ्याला शाई लावत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यात काँग्रेसला आघाडीत सहभागी करून घेतले नाही. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. त्यात पक्षाच्या पोस्टरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या चेहऱ्यावर काळी शाई फेकली. याच होर्डिंगवर माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचेही फोटो लावण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आलेली नाही. कोलकाता येथील विधान भवनासमोरील काँग्रेस पक्षाच्या पोस्टर्सवर या दिग्गजांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. ही बाब काँग्रेसच्या इतर स्थानिक नेत्यांना समजताच त्यांनी तातडीने शाई लावलेले होर्डिंग आणि बॅनर हटवले.
 
तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना म्हटले होते की, जर सरकार स्थापन झाले तर त्या I.N.D.I आघाडीला बाहेरून पाठिंबा देऊ. त्यावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी ममता बॅनर्जी या इंडी आघाडीसोबत असल्याचा दावा केला होता. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या डाव्या पक्षांशी काँग्रेसची युती आहे. केरळमध्ये काँग्रेस पक्ष या डाव्या पक्षांशी लढत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि राहुल गांधी यांनी एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले केले आहेत.

दरम्यान अज्ञात लोकांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या फोटोखाली 'TMC एजंट' असेही लिहिले. काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनीच हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. अधीर रंजन चौधरी सध्या बहारमपूर येथे त्यांच्या निवासस्थानी आहेत आणि त्यांनी कार्यकर्त्यांना या प्रकरणाची तक्रार करण्यास आणि एफआयआर नोंदविण्यास सांगितले. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते की, आघाडीचे स्वरूप काय असेल हे अधीर रंजन चौधरी हे ठरवणार नाहीत.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121