"...तरीही ठाकरेंचं रडगाणं सुरुच"; उपमुख्यमंत्री फडणवीसांची टीका

    20-May-2024
Total Views | 66
 
Thackeray & Fadanvis
 
मुंबई : मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. तरीही उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरुच आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. मुंबईसह राज्यात संथगतीने मतदान सुरु असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याप्रकरणाची दखल घेत फडणवीसांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
 
 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. ४ जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत."
 
हे वाचलंत का? -  शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल!
 
"माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. ६ वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका," असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121