'वोट जिहाद'च्या नावाखाली मत मागणे लोकशाहीला धोक्याचे लक्षण!
02-May-2024
Total Views | 55
मुंबई (प्रतिनिधी) : जिहादचे (Vote Jihad) नवे प्रकार आणि कट्टरपंथीयांच्या नव्या कारस्थानांवरचे सेक्युलर ब्रिगेड आणि मुस्लीम संघटनांचे मौन देशासाठी धोकादायक असल्याचे सूचक विधान विश्व हिंदू परिषदेने केले आहे. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अखिल भारतीय प्रचार प्रसार प्रमुख विजय शंकर तिवारी यांनी यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. 'व्होट जिहाद'च्या नावाखाली मते मागणे हे लोकशाहीला धोक्याचे लक्षण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
विजय शंकर तिवारी यावेळी म्हणाले की, "दिल्लीतील शिक्षक, मुले आणि पालकांना घाबरवण्यासाठी १७८ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल पाठवण्यात आला, ज्याने केवळ दिल्लीच नाही तर संपूर्ण देश हादरला. याने दिवसभरात हजारो मुलं, त्यांचे पालक, शाळेतील शिक्षक, कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन व शासनही प्रचंड मानसिक आघाताचे बळी ठरल्याचे दिसले. या धमकीच्या मेलची भाषा पाहिल्यास हे स्पष्ट होते की अल्लाहच्या नावावर ज्या जिहादची चर्चा केली जात आहे, ती इस्लामच्या नावाखाली मानवी मूल्यांची हत्या करण्यापेक्षा जास्त आहे. गंभीर बाब म्हणजे या दोन्ही घटनांवर कोणत्याही मुस्लिम संघटनेच्या किंवा सेक्युलर ब्रिगेडच्या नेत्याने निषेधाचे दोन शब्दही उच्चारले नाहीत, ही सुसंस्कृत समाजासाठी घातक बाब आहे."
वोट जिहादचा नारा सुसंस्कृत समाज आणि लोकशाहीला मोठा धोका असल्याचे सांगत पुढे ते म्हणाले की, विश्व हिंदू परिषद सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा आणि दहशत पसरविण्याशी संबंधित घटनांचा तीव्र निषेध करते. भारतीय समाजाला अशा देशद्रोही आणि कट्टरपंथीयांच्या जाळ्यात पडू नये किंवा त्यांचा कोणताही दबाव स्वीकारू नये असे आवाहन करते. देशातील निवडणूक आयोग लोकशाहीचा भव्य उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यात व्यस्त आहे. समाजालाही या लोकांचे कुटील कारस्थान उघड करून शंभर टक्के मतदानाकडे वाटचाल करावी लागेल.