महाराष्ट्रात आज योगींच्या सभांचा झंजावात!

    18-May-2024
Total Views | 65

Yogi Adityanath 
 
मुंबई : लवकरच लोकसभा निवडणूकीच्या पाचवा टप्पातील निवडणूका होणार असून राज्यात सभांचा धडाका सुरु आहे. यातच शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या वेगवेळ्या ठिकणी सभा होणार आहेत. महायूतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत.
 
शनिवार, १८ मे रोजी धुळे लोकसभेचे महायूतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ मालेगाव कॅम्प येथे योगी आदित्यनाथ यांची पहिली सभा होईल. यावेळी राज्यसभा खासदार अजित गोपछडे आणि जिल्हाध्यक्ष निलेश निंबा कचवे हे उपस्थित राहणार आहेत.
 
त्यानंतर दुपारी १.३० वाजता पालघर लोकसभेचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ सभा घेणार आहेत. नालासोपारा येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
 
दुपारी ३ वाजता कुर्ला येथे योगी आदित्यनाथांची सभा होणार आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभेचे उमेदवार उज्ज्व निकम यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे. येत्या २० मे रोजी लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे. त्याआधी राज्यभरात प्रचार सभा सुरु आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121