आता शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! पीएम कुसुम योजना लवकरच येणार

सरकारच्या पोर्टलमार्फत सौर पंप घेता येणार सरकारतर्फे ३० टक्के सबसिडीही मिळणार

    17-May-2024
Total Views | 67

pm kusum yojana
 
 
मुंबई: सरकारने आता शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसूम योजना आणण्याचे ठरवले आहे त्यासाठी कच्च्या मसुद्यावर सरकार काम करत आहे. या योजनेत आता शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप हाताळता यावा यासाठी सरकार काम करत आहे. सरकारच्या पोर्टलमार्फत पंप व्यापारी यांच्याशी शेतकरी थेट संपर्क करू शकतात. यापूर्वी सरकारने सोलार टॉप योजना आणली होती ज्या मध्ये घराघरात सौर ऊर्जेचे कनेक्शन देण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले होते. याच योजनेत आता सरकार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप प्रकल्पाचा आधार मिळावा यासाठी सरकारने ही नवी योजना आखली आहे.
 
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पात सौरऊर्जा पंप निवडीपासून व त्यांच्या वापरापर्यंत मदत या प्रकल्पामार्फत करण्यात येणार आहे. सध्या यांची चाचपणी प्राथमिक पातळीवर सुरू असल्याने सगळ्या गोष्टी नियोजनात आहे त्यामुळे याबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
 
यामध्ये सौर ऊर्जा पंप खरेदी विक्रीसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.आपली नोंदणी करुन आपल्याला हवा तसा पंप व आपली गरज ओळखून डीलरला ही ऑर्डर शेतकऱ्यांना देता येणार आहे. या योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के सबसिडी व राज्यांकडून ३० टक्के सबसिडी मिळू शकते.
 
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या आणि कृषी क्षेत्रात सिंचन आणि डिझेलीकरणाचे स्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कुसुम योजना सुरू करण्यात आली. ही योजना केंद्र सरकारने २०१९ मध्ये सुरू केली होती. हे अद्याप प्राथमिक अवस्थेत असून त्यावर चर्चा सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने वृत्तात नमूद केले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पीएम कुसुम योजनेच्या काही भागांमध्ये काही सुधारणांची गरज आहे. निविदा काढण्याशी संबंधित विलंबामुळे योजना अनेक मार्गांनी अडकून पडली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121