पाकव्याप्त काश्मिर परत मिळवणारच - एस. जयशंकर

    16-May-2024
Total Views | 165
S. Jaishankar on PoK

नाशिक :
पाकव्याप्त काश्मिर भारताचे अंग आहे. मागच्या सरकारमधील लोकांच्या चुकीमुळे ते आपल्यातून काही काळासाठी गेले आहे. पण संसदेच्या सर्वसंमतीने ते निश्चित परत मिळवले जाईल, यात काही शंका घेण्याची गरज नाही, असा विश्वास केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी गुरूवार, दि. 16 मे रोजी व्यक्त केला. नाशिकच्या कॉलेज रोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉल येथे श्वास फाऊंडेशनतर्फे विश्वबंधू भारत हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. जयशंकर यांची ज्येष्ठ विचारवंत व लेखक विजय चौथाईवाले आणि कोक्यूयो कॅमलिन लि.चे व्हाईस चेअरमन श्रीराम दांडेकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी एस. जयशंकर बोलत होते.

चीनमध्ये राजदूत असताना तिथे वारंवार सांगितले की हा आमचा भाग आहे. परंतु पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांनी पाकव्याप्त काश्मिर हा आमचा भूभाग आहे हे कधी सांगितलेच नाही. १९६३ साली पाकिस्तानने ५ हजार किलोमीटरचा भूभाग चीनला देऊन टाकला. पण चीनलाही माहीत आहे की कायदेशीरदृष्ट्या त्यांची बाजू कमजोर आहे. लोकांना माहीत आहे ३७० कलम जसे रद्द झाले, तसे पाकव्याप्त काश्मिर कधी आपण आपल्या ताब्यात घेऊ हे पाकिस्तानला कळणार पण नाही, असेही यावेळी एस. जयशंकर म्हणाले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील

देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील 'वक्फ'चा मालकी हक्क संपणार!

Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121