"उबाठा हा मुस्लीमधार्जिनी आणि तुष्टीकरण करणारा पक्ष!"
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
15-May-2024
Total Views | 56
मुंबई : आज काँग्रेसपेक्षाही जास्त मुस्लीमधार्जिनी आणि तुष्टीकरण करणारा पक्ष हा उबाठा आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीच्या 'माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंबईमध्ये आज उबाठा गटाला लक्षात आलं की, पुर्वीसारखी मराठी मतं त्यांच्याकडे राहिलेली नाहीत. त्यामुळे या मतदाराची भरपाई आपण मुस्लीम मतांच्या भरवशावर करु शकतो, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून आज काँग्रेसपेक्षाही जास्त मुस्लीमधार्जिनी आणि तुष्टीकरण करणारा पक्ष हा उबाठा आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाएवढे अल्पसंख्यांकांकडे जाऊन पायघड्या घालून त्यांच्या पायावर लोळण घेणारा आता दुसरा कुठलाही पक्ष राहिलेला नाही. हे जेवढं वोट जिहाद सांगतील तेवढा इतर समाज हा मोदीजींना मतदान करेल.
"मतदारांमध्ये कोणतंही कन्फ्युजन नाही. आपल्याला मोदीजींना मतदान करायचं आहे हे त्यांनी ठरवलं आहे. कोणी कितीही म्हटलं तरी ओबीसी, कुणबी, मराठा आणि दलित समाज मोठ्या प्रमाणात आमच्यासोबत आहे. मविआची सगळी भिस्त ही अल्पसंख्यांक आणि त्यातही मुस्लीम समाजावर आहे. या मतांमध्ये भय तयार करुन आपण जास्त पुढे जाऊ शकतो असं ते म्हणतात. त्यामुळे त्यांनी संविधान बदलण्याचा खोटा प्रचार केला," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "ज्यावेळी आम्ही राष्ट्रवादीसोबत युती केली त्यावेळी आमच्या मतदारांच्या मनात काही कन्फ्युजन होतं. पण त्याचवेळी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांना कळलं. २०१९ मध्ये जर उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली नसती तर महाराष्ट्रात ही परिस्थिती तयार झाली नसती, हे त्यांना आता समजत आहे," असेही ते म्हणाले.