"ते युवानेते, त्यांना आताच कशाला...;" उपमुख्यमंत्री फडणवीसांचा रोहित पवारांना टोला
15-May-2024
Total Views | 140
मुंबई : ते युवानेता आहेत. शरद पवारांसोबत उत्तम नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांना कशाला उघड करायचं, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवारांना लगावला आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीच्या 'माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र' या कार्यक्रमात ते बोलत होते.
रोहित पवार २०१९ मध्ये खरंच भाजपची उमेदवारी मागायला आले होते का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, "ते युवानेता आहेत. आता पवारसाहेबांसोबत जोरदार नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांना कशाला उघड करायचं. ते आपण माझ्यावर येणाऱ्या वेब सिरीजमध्ये बघूया."
ते पुढे म्हणाले की, "अजित पवारांनी आमच्या मैत्रीमुळे शरद पवारांचा पक्ष सोडला नाही तर यापुढे आपलं भविष्य आणि अस्तित्व नाही, असं त्यांना लक्षात आल्याने ते आमच्यासोबत आहे. शरद पवारांनी अनेकवेळा आमच्यासोबत एनडीएमध्ये येण्याची चर्चा केली. ती चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत नेली आणि शेवटी अजितदादांना समोर करुन ते मागे हटले. प्रत्येकवेळी अजितदादांना तोंडघशी पाडलं. त्यानंतर आता माझ्या लक्षात येतंय की, त्यांनी एकप्रकारे अजितदादांना व्हिलन बनवलं. कारण कोणालातरी हिरो बनवायचं असेल तर कोणीतरी व्हिलन बनला पाहिजे. अजितदादा व्हिलन बनले आणि हा वारसा सुप्रियाताईंकडे देणं त्यांना सोपं झालं. अजितदादांच्या जेव्हा लक्षात आलं की, आता आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह येत आहे, त्यावेळी ते बाहेर पडले," असेही त्यांनी सांगितले.